रसग्रहण म्हणजे काय व ते कसे लिहावे संपूर्ण माहिती ? What is the Rasagrahan
कवितेचा सर्व बाजूंनी, पूर्णांगाने आस्वाद घेणे म्हणजे कवितेचे रसग्रहण करणे होय. कवितेचा छंद, प्रकार, भाषिक वैशिष्ट्ये, शब्दकळा, आशयाची मांडणी, सहजता, आवाहकता या घटकांची विस्ताराने मांडणी करणे रसग्रहणात आवश्यक असते.
कवितेतील प्रतीके व प्रतिमा उलगडून दाखवणे, त्यातील भावसौंदर्य, अर्थसौंदर्य समजावून सांगणे हे रसग्रहणात महत्त्वाचे असते. कवितेतून मिळणारी शिकवण, संदेश किंवा मौलिक विचार नेमकेपणाने सांगणेही आवश्यक असते. कवितेतून होणारी रसांची निष्पत्ती व त्याचे ग्रहण (आस्वाद) करणे, म्हणजेच कवितेचे सर्वांगाने रसग्रहण होय.
रसग्रहणाची कृती सोडवण्यासाठी अभ्यास कसा कराल ?
- कवीचे/कवयित्रीचे नाव, संदर्भ, प्रस्तावना, वाड्मयप्रकार या रसग्रहणातील मुद्द्यांसाठी पाठ्यपुस्तकातील कवितेच्या सुरुवातीला दिलेला परिचयात्मक मजकूर बारकाईने वाचावा.
- कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना, संदेश, भाषिक वैशिष्ट्ये, आवडनावड यांसाठी मार्गदर्शकातील कवितेचा भावार्थ नीट अभ्यासावा.
- कवितेतील आवडणाऱ्या ओळी यासाठी तुम्हांला आवडलेली कवितेची ओळ / ओळी पाठ कराव्याच लागतील.
दिलेल्या पदय पुस्तकात कविता सोडून कोणत्याही एका कवितेतील रसग्रहणास अनुकूल अशा कोणत्याही दोन पंक्ती देऊन, त्यांचे रसग्रहण करा असा प्रश्न विचारला जाईल.
दिलेल्या पंक्तींचे रसग्रहण करताना पुढील तीन मुद्दयांना अनुसरून तीन परिच्छेदांत रसग्रहण करणे अपेक्षित आहे :
(१) आशयसौंदर्य :
यामध्ये कवीचे/कवितेचे नाव, कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना, संदेश, उपदेश, मूल्य, कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव आदी मुद्द्यांना धरून माहिती लिहावी. प्रत्येक कवितेतील कोणत्याही दोन पंक्तींसाठी हे मुद्दे सर्वसाधारणपणे सारखेच राहतील..
(२) काव्यसौंदर्य :
यामध्ये दिलेल्या पंक्तीतील अर्थालंकार, रस, विविध कल्पना, प्रतिमा, विविध भावना यांविषयी लिहावे. ही माहिती दिलेल्या पंक्तींना अनुसरून लिहावी लागणार आहे. त्यासाठी कवितेचा भावार्थ बारकाईने अभ्यासावा.
(३) भाषिक वैशिष्ट्ये :
यामध्ये कवीची भाषाशैली कोणत्या प्रकारची आहे (ग्रामीण, बोलीभाषा, संवादात्मक, निवेदनात्मक, चित्रदर्शी यांपैकी कोणती), आंतरिक लय, नादमाधुर्य, अलंकार आदी मुद्द्यांना धरून माहिती यावी. हे मुद्देही प्रत्येक कवितेसाठी साधारणपणे सारखेच असतील.
वरील मुद्दयांना अनुसरून प्रस्तुत कवितेसाठी सर्वसाधारण रसग्रहणाचा ढाचा कसा असावा, हे पुढे मार्गदर्शनार्थ दिले आहे. तो अभ्यासून कवितेतील अन्य कोणत्याही दोन पंक्तींसाठी रसग्रहण लिहिण्याचा सराव विदयाथ्र्यांनी करावा.
रसग्रहण करा :
उदा :
( १ ) अपकीर्ति ते सांडावी । सत्कीर्ति वाडवावी ।
विवेकें दृढ धरावी । वाट सत्याची।।’
उत्तर :
आशयसौंदर्य :
संत रामदासांनी उत्तमलक्षण या कवितेत आदर्श गुणवान व्यक्तीची वैशिष्ट्ये सांगताना या ओळींम सद्वर्तन कशा प्रकारे करावे, याची शिकवण दिली आहे.
काव्यसौंदर्य :
संत रामदास म्हणतात लोक आपल्याला दूषणे देतील व निंदा करतील असे वर्तन कदापिही करू नये. ज्या वागण्यान आपली अपकीर्ती होईल, असे वागणे टाळावे. उलट आपल्या व्यक्तिमत्त्वाची कीर्ती पसरेल, अशी वागणूक करायला हवी. स्वतः चांगले वागून सत्कीर्ती वाढवायला हवी. त्यासाठी बुद्धीचा विवेक महत्त्वाचा ठरतो. सद्विचाराने, विवेकाने सत्याचा मार्ग ठामपणे आचरावा. विवेकबुद्धी ठोस असणे गरजेचे आहे.
भाषिक वैशिष्ट्ये :
सन्मार्गाचे लक्षण सांगताना जनसामान्यांन समजतील असे तीन मुद्दे या ओळीत सहजपणे सांगितले आहेत अपकीर्ती व सत्कीर्ती तसेच सांडावी व वाढवावी या विरोध शब्दांमुळे ओवीची खुमारी वाढली आहे. दृढ धरणे हा वाक्प्रचा चपखलपणे उपयोगात आणला आहे. जनमानसावर तत्त्व ठसवण्याच समर्थांची हातोटी समर्थपणे व्यक्त झाली आहे.
रसग्रहण म्हणजे काय व ते कसे लिहावे ?? संपूर्ण माहिती
Video credit : चला शिकुया Youtube channel
खालील माहितीसाठी हीच पोस्ट पुन्हा वाचा :
कवितांचे रसग्रहण कसे करावे ?
Rasagrhan in marathi 10th,9th class
कवितेच रसग्रहण ,रसग्रहण प्रश्न कसा सोडवावा
rasagrhan in marathi 10th class
कवितेचे रसग्रहण कसे करायचे?
आमचे इतर काही व्याकरण पोस्ट :
विरामचिन्हे व त्यांची नावे | मराठी व्याकरण | Viram Chinh in Marathi Grammar
विरुद्धार्थी शब्द मराठी । Opposite Words In Marathi
प्रयोग मराठी व्याकरण ,कर्तरी ,कर्मणी ,भावे
नाम म्हणजे काय ? नामाचे किती प्रकार आहेत ?
वर्ण म्हणजे काय ? संधी म्हणजे काय ?
मित्रांनो या माहिती मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.
धन्यवाद
Nice information