Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh। मला पंख असते तर मराठी निबंध

Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh। मला पंख असते तर मराठी निबंध

 

Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh
Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh

 

मित्रानो , या पोस्ट मध्ये मला पंख असते तर मराठी निबंध लेखन / Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh100 ते 400 शब्दात निबंध लेखन करणार आहोत . हा निबंध 7 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्याना परीक्षेत वर्णनात्मक निबंध म्हणून विचयाराला जातो त्यामुळे निबंध नीट वाचा.  आज आपण Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh  या विषयावर निबंध बघणार आहोत.

 

अकरावीत कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून मला घरापासून दूर शहरात राहावे लागले आहे. आता वर्ष दीड वर्ष झाले तरी घराची ओढ कमी होत नाही. त्यांत अचानक दोन दिवस महाविद्यालयाला सुट्टी मिळाली. रविवार जोडून आल्याने तीन दिवस मिळणार होते. घरी जावे असे वाटत होते. पण त्यासाठी गाडीभाडे खर्च करणे परवडणारे नव्हते.

तेव्हा मनात आले. आता मला पंख असते तर… तर मी पंख पसरून क्षणात भरारी मारली असती आणि उडत उडत घराच्या अंगणातील झाडावर जाऊन बसले असते. आईला आश्चर्याचा धक्का दिला असता. पण मला पंख असते तर मी घर सोडून कशाला येथे आले असते ? खरे तर रोज उडत उडत महाविद्यालयात आले असते, नाही का ?

यांग हे केव्हा शक्य झाले असते ? मला पंख असते तर ना! मला प्रवासाची खूप आवड आहे. नवीन नवीन ठिकाण पाहावीत, असे मला वाटते. पण आज तरी ते मला परवडणारे नाही. मग माझी ही आवड मी दुधाची तहान ताकावर भागवावी या रितीने पूर्ण करते.

दूरचित्रवाणीवर प्रवासाच्या वाहिन्या आहेत. त्यांवरील कार्यक्रम आवर्जून पाहते मी भरपूर प्रवासवर्णने वाचले आणि जणू त्या स्थळांना भेट दिल्याचा आनंद उपभोगते, मला पंख असते तर मात्र मी मनाला येईल, तेव्हा काश्मीरला भेट दिली असती.

कन्याकुमारीला जाऊन विवेकानंद स्मारक पाहून आले असते. पंख असते तर प्रवासाचा खर्च वाचला असताच पण त्याचबरोबर प्रवासातील इतर अनेक कटकटी गर्दी, आगाऊ तिकिटे काढणे, जागा राखून ठेवणे या गोष्टी टळल्या असत्या

मला पंख असते तर पासपोर्ट, व्हिसा या कटकटी टळल्या असत्या. परदेशातील विविध स्थळांना भेटी देऊन मी लेखिका मीना प्रभू यांच्याप्रमाणे विविध स्थानांचे वर्णन करणारी पुस्तके लिहिली असती व प्रसिद्धी मिळवली असती. मला पंख असते तर, अनेक गिर्यारोहकांना मी साथ दिली असती. सप्तसागरांची मुशाफिरी केली असती.

पंख मिळाल्यावर माझा प्रवास होणार तो आकाशातून म्हणजे वाहनांच्या गर्दीचा त्रास मला चुकवता येणार! पण माझ्याप्रमाणे अनेकांना असे पंख लाभले, तर मात्र पुढे आकाशमार्गावरही गर्दी उसळायची!!

मला पंख लाभले, तर लहान मुले माझी गणना पऱ्यांमध्ये करू लागतील. कारण त्यांनी वाचलेल्या परीकथांतील पन्यांना पंख असतात. मग माझा भाव वाढेल आणि मला पाहण्यासाठी गर्दी उडेल.

म्हातारपणात या पंखांचा खरा उपयोग होईल. कारण बहुतेक म्हातान्यांचे गुडघे वय झाल्यावर दुखायला लागतात आणि त्यांना चालणे कठीण होते. पण म्हातारपणी माझ्या या पंखांत तरी शक्ती राहील का ?

आज मात्र या पंखांमुळे मला झोपणे जरा अवघडच होईल. मग काही काळापुरते हे पंख काढून ठेवण्याची सोय असेल ना! नाहीतर वाटेल, नको बाबा हे पंख! त्यापेक्षा आपले पाय बरे! हवे तेव्हा पोटाजवळ घेता येतात.

 

Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh। मला पंख असते तर मराठी निबंध
Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh। मला पंख असते तर मराठी निबंध

 

Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh । मला पंख असते तर मराठी निबंध

 

मला पंख असते तर… निबंध 10 ओळी 

 

खरंच, मला पंख असते तर मी स्वच्छंदी झालो असतो. वाटेल तेथे जाऊ शकलो असतो. समजा असे पंख मला एकट्यालाच मिळाले असते, तर मी एक प्रेक्षणीय व्यक्ती झालो असतो.

दूरचित्रवाहिन्यांच्या फोटोग्राफरचे कॅमेरे माझ्यावर रोखले गेले असते. पंख असलेला माणूस पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक झाले असते. केवळ पंखांमुळे मला खूप प्रसिद्धी मिळाली असती.

मला पंख मिळाले तर मी माझी प्रवासाची हौस भागवून घेईन. देशातील प्रेक्षणीय स्थळे मी पाहून घेईन.

मला लाभलेल्या या संधीचा मी समाजाची सेवा करायला उपयोग करीन. समजा एखाद्या ठिकाणी अपघात झाला, तर मला असलेल्या पंखांमुळे मी तेथे लवकर जाऊन पोहोचेन आणि अपघातग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करू शकेन.

शहरात अनेकदा आपण वाहनांच्या कोंडीत अडकतो. अशा वेळी आपण काहीही करू शकत नाही. आपण रेल्वेने प्रवास करीत असतो, पण काही कारणाने प्रवास थांबतो.

आपण अगतिक होतो. अशा वेळी आपल्याकडे पंख असले, तर आपण सहज आकाशातून उडत उडत हव्या त्या स्थळी जाऊ शकू.

सर्वांनाच पंख मिळाले, तर आकाशात गर्दी होईल. पण अशा वेळी मनात येते की, मग पक्षी आपल्यावर आपटतील ?

आकाशातील पक्ष्यांनी धडक दिल्याने विमानाला अपघात झाल्याच्या बातम्या आपण वाचतोच. मग काय उपयोग या पंखांचा ? त्यापेक्षा आपले पायच बरे.

 

मला पंख असते तर मराठी निबंध विडियो माध्यमातून 

Video credit : VINUSHREE Erandoli Youtube channel

 

वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता :

जर मला पंख असते तर मराठी निबंध
mala pankh aste tar marathi nibandh lekhan
मला पंख असते तर – मराठी निबंध
Jar Mala Pankh Aste Tar Marathi Essay

 

आमच्या इतर निबंध पोस्ट :

 

माझी शाळा निबंध मराठी। Majhi Shala Nibandh Marathi

माझा आवडता कवी निबंध मराठी । Majha Avadata Kavi Nibandh Marathi

जनसेवा हीच ईश्वर सेवा निबंध मराठी । Janseva Hich Eshwar Seva Nibandh Marathi

संगणक काळाची गरज निबंध मराठी । Sanganak Kalachi Garaj Nibandh In Marathi

गुरु शिष्य परंपरा निबंध । Guru Shishya Paranpara Essay 

 

टीप :

1 ) मला पंख असते तर मराठी निबंध हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0 वी व ११ वी १२ वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 


 

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद.

Leave a Comment