Vinanti Patra Lekhan in Marathi । विनंती पत्र लेखन मराठी ९ वी व १० वी

 Vinanti Patra Lekhan in Marathi । विनंती पत्र लेखन मराठी ९ वी व १० वी

Contents hide
1 Vinanti Patra Lekhan in Marathi । विनंती पत्र लेखन मराठी ९ वी व १० वी
1.1 विनंती पत्र म्हणजे काय ?
1.1.3 विनंती पत्र लेखन माइना कसा असावा ?

 

 Vinanti Patra Lekhan in Marathi । विनंती पत्र लेखन मराठी ९ वी व १० वी
Vinanti Patra Lekhan in Marathi । विनंती पत्र लेखन मराठी ९ वी व १० वी

 

 

नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात विनंती पत्र लेखन मराठी याबद्दल जाणून घेणार आहोत.आज या लेखात आपण  Vinanti Patra Lekhan in Marathi विनंती पत्र लिहिताना कोणकोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजे, विनंती पत्राचे  काही महत्त्वाचे नियम तसेच, विनंती पत्राचे  सर्वोत्तम नमुने या ठिकाणी बघणार आहोत.

 

विनंती पत्र म्हणजे काय ?

एखाद्या व्यक्तिला किंवा संस्थेला लिहलेले कोणत्याही स्वरुपातील मदत करण्याची विनंती करणारे पत्र म्हणजे विनंती पत्र होय |  विनंती पत्रामध्ये, आपणास मदत मिळावी ही आपली इच्छा असते मात्र मदत करायची की नाही हे संपूर्णपणे समोरच्या व्यक्तीवर अवलंबून असते.

 

विनंती पत्र लेखन मराठीत कसे लिहावे ?

विनंती पत्र लिहायला सुरुवात करताना पत्राच्या उजव्या कोपऱ्यात आपले संपूर्ण नाव, पत्ता, आणि मोबाईल नंबर लिहावा.

त्याच्या खाली डाव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला ज्यांना पत्र पाठवायचे आहे त्यांचे नाव म्हणजेच स्वीकारण्याचे नाव , त्यांचे पद नाव, संस्थेचे नाव इत्यादी माहिती लिहावी.

त्याच्या खाली पत्राचा विषय आणि संदर्भ लिहावा.

यानंतर नवीन ओळीवर महोदय किंवा महोदया असे लिहून पत्राची सुरुवात करावी.

औपचारिक पत्रामध्ये लिहिलेला मजकूर मुद्देसूद आणि विषयाला धरुन असावा.

पत्राची भाषा आकर्षक असावी.

त्याच्या खाली उजव्या कोपऱ्यामध्ये आपला / आपली असे लिहून आपली नाव लिहून सही करावी.

काही वेळा पत्रासोबत काही कागदपत्रे जोडावी लागतात. त्यांची माहिती सुद्धा सोबत असे लिहून लिहावी.

काही पत्रे वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या कार्यवाहीसाठी पाठवली जातात. त्यामुळे अशा पत्रांमध्ये प्रत माहितीसाठी असे सुद्धा लिहावे.

 

विनंती पत्र लेखन मराठीत कसे लिहावे ? याचे नमुने 

 

 Vinanti Patra Lekhan in Marathi । विनंती पत्र लेखन मराठी ९ वी व १० वी
Vinanti Patra Lekhan in Marathi । विनंती पत्र लेखन मराठी ९ वी व १० वी

 

विनंती पत्र लेखन माइना कसा असावा ?

विनंती पत्र लेखन मराठीत किंवा इतर कोणत्याही भाषेत लिहावे, त्यासाठी खास ध्यानाचे आवश्यकपणे घेतले पाहिजे. त्यामुळे, तुमचं विनंती पत्र उदाहरणारूप खाते तुमच्या विनंतीसाठी योग्य राहिलं ते सुनिश्चित करणारं महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी, तुमच्या विनंती पत्रात खास विवेचन, विनंती केंद्रित भावना, आणि सुसंगत भाषेत लिहावं हे आवश्यक आहे.

येथील उदाहरणारूप, तुमचं किंवा तुमच्या गरीब कुटुंबाचं विनंती पत्र लेखन्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे:

 

 

[तुमचं पूर्ण नाव]
[तुमचा पत्ता]
[तारीख]

[पत्ता]
[केंद्रीय विमोचन अधिकारीचं नाव]
[केंद्रीय विमोचन अधिकारीचं पत्ता]

प्रिय सर,

सुप्रभात! मी [तुमचं पूर्ण नाव] आहे आणि माझं पत्ता आहे [तुमचा पत्ता]. माझं विचार [विवेचनाचं किंवा विनंतीसंबंधितं] तुमच्याकडून मदत करण्यात आलंय.

[विवेचन/विनंतीचं विवेचन]

मला योग्य सहाय्य मिळवावी लागतं, कृपया मला [आवश्यक सहाय्याचं विवेचन] द्या. माझं विश्वास आहे की तुमचं आशीर्वाद मिळवून माझं क्षेत्र उत्कृष्टपणे प्रगट होईल.

माझं हृदयपूर्वक आभारी आहे आणि माझं आशीर्वाद तुमच्यासाठी आहे.

धन्यवाद,
[तुमचं पूर्ण नाव]

उदा :

 Vinanti Patra Lekhan in Marathi । विनंती पत्र लेखन मराठी ९ वी व १० वी
Vinanti Patra Lekhan in Marathi । विनंती पत्र लेखन मराठी ९ वी व १० वी

 

 

 


 

उदा : 

 

प्रश्न: पुढील जाहिरात वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

आदर्श मैदान, वरळी (पूर्व) ,एडवर्ड रोड, मुंबई – ४०० ०१८ , १ डिसेंबरपासून मैदान भाड्याने उपलब्ध होणार! खेळाचे सामने, खेळ सराव, लग्नसमारंभ, सभा, संमेलन इत्यादींसाठी , संपर्क साधा : ई-मेल- adarshmaidanixyz.com  , संपर्क क्रमांक : ९८xxxxxxxx , क्रीडास्पर्धेसाठी शाळेला सवलतीच्या दरात मैदान उपलब्ध व्हावे म्हणून विनंतीपत्र तयार करा.

उत्तर :

दि. १० डिसेंबर २०२०

प्रति,

माननीय व्यवस्थापक, आदर्श मैदान, वरळी (पूर्व),

एडवर्ड रोड, मुंबई – ४०० ०१८.

विषय : सवलतीच्या दरात मैदान मिळण्यासाठी विनंती.

महोदय,

मी, समिधा वाळके नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यालय, गिरगाव या शाळेची विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने पत्र लिहीत आहे. काही दिवसांपूर्वी आपण दिलेली मैदानाबाबतची जाहिरात माझ्या वाचनात आली होती. डिसेंबरच्या अखेरीस आमच्या शाळेचा वार्षिक क्रीडामहोत्सव साजरा होणार आहे. आमच्या शाळेतील दोन हजार विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होऊ इच्छितात. परंतु आमच्या शाळेचे मैदान खूपच अपुरे पडते. यासाठी आपले मैदान आमच्या शाळेला सवलतीच्या भाड्यात उपलब्ध करून दयावे, ही विनंती.

आमच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील आहेत. खेळांच्या स्पर्धांसाठी आमची शाळा विद्यार्थ्यांना कोणतीही फी आकारू इच्छित नाही. विदयार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहन मिळावे आणि अधिकाधिक विद्यार्थी खेळांच्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हावेत, ही शाळेची इच्छा आहे. म्हणून शाळेतर्फे आपणांस विनंती करीत आहे की, मैदानाच्या भाड्यात सवलत द्यावी. कळावे,

आपली नम्र

समिधा वाळके

(विद्यार्थी प्रतिनिधी)

नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यालय,

वि. प. रोड, मुंबई – ४००००४,

ई-मेल : :sam@XXXX.com

 


 

प्रश्न. पुढील घटनेमागील विचार समजून घ्या आणि दिलेल्या सूचनेनुसार पत्रलेखन करा :

चिन्मयौच्या बहिणीने स्वतःच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका सर्वांना व्हॉट्सअॅपवर पाठवली. लग्नपत्रिका न छापल्यामुळे वाचलेले पैसे तिने ‘आदर्श विद्यालय, वरोरा’ या शाळेला वृक्षारोपणासाठी देणगी म्हणून दिले. चिन्मयीने अभिमानाने ही हकिगत आपल्या मैत्रिणीला व्हॉट्सअॅपवर कळवली. सोबत बहिणीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिकाही पाठवली.

विदयार्थिनी या नात्याने तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना, चिन्मयीने पाठवलेले पत्र काचफलकात प्रदर्शित करण्याची विनंती करणारे पत्र लिहा.

उत्तर.

 

दिनांक : १५-१-२०२२

प्रति,

मा. मुख्याध्यापक,

प्रगत विद्यामंदिर महात्मा गांधी मार्ग,

वर्षा- ४४२००१.

 

विषय : सध्याच्या काळात आवश्यक असा विचार देणारे एक पत्र शाळेच्या काचफलकात लावणे.

महोदय,

माझ्या मैत्रिणीने व्हॉट्सअॅपवर मला पाठवलेल्या पत्राची प्रत मी सोबत जोडत आहे. त्या पत्रातील विचार अनेकांपर्यंत पोहोचावा असे मला वाटते. म्हणून हे पत्र शाळेच्या काचफलकात लावण्यास परवानगी दयावी, ही विनंती.

माझ्या मैत्रिणीच्या बहिणीच्या लग्नाचे हे निमंत्रण आहे. ते तिने मला व्हॉट्सअॅपवर पाठवले आहे. या पद्धतीने लग्नाचे निमंत्रण व्हॉट्सअॅपवर दिल्यास कागद वाचेल, त्यामुळे झाडे वाचतील. पर्यावरणाची हानी टळेल. यात आणखीही फायदे आहेत. सध्याचे मोबाइल तंत्रज्ञान सर्व माणसांना अवगत आहे. कोणीही कोणत्याही प्रसंगी हे तंत्रज्ञान वापरू शकतो.. त्यामुळे निमंत्रण क्षणार्धात व विनामूल्य पोहोचते. आपला वेळ, श्रम व पैसा यांची बचत होते.

असा हा बहुगुणी विचार खूप लोकांपर्यंत पोहोचावा, म्हणून हे पत्र शाळेच्या काचफलकात लावण्याची कृपया परवानगी दयावी, अशी पुन्हा एकदा नम्र विनंती करते.

आपली आज्ञाधारक,

अ. ब. क.

विद्यार्थिनी

२०, कामगार वसाहत,

महात्मा गांधी मार्ग, वर्धा – ४४२००१.

ई-मेल : abe@xxxx.com


 

प्रश्न. पुढील चौकटीतील बातमी वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा :

प्रथमेश सुलाखे याचे घवघवीत यश दिनांक १३ डिसेंबर, औरंगाबाद राज्यस्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथमेशने प्रथम क्रमांक पटकावून औरंगाबादची पताका महाराष्ट्रभर फडकवली. तुमच्या शाळेत बुद्धिबळाचे मार्गदर्शनपर वर्ग भरवावेत, अशी विनंती करणारे पत्र मुख्याध्यापकांना लिहा.

उत्तर :

दि. १५ डिसेंबर २०२०

मा. मुख्याध्यापक,

ज्ञानेश्वर विद्यालय,

सयानी मार्ग, महात्मा नगर,

औरंगाबाद-४३१००५.

विषय: बुद्धिबळ या खेळाचे मार्गदर्शनपर वर्ग घेण्याची विनंती.

महोदय,

मी आपल्या शाळेत इयत्ता ९ वी अ मध्ये शिकत आहे. मला बुद्धिबळ हा खेळ आवडतो आणि तो खेळावासा वाटतोही. मात्र या खेळाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळत नाही. त्यामुळे मन खट्टू होते. माझ्याप्रमाणेच आपल्या शाळेतील अनेक विद्याथ्र्यांची अवस्था आहे. आम्ही मित्रांनी अनेक वेळा खेळण्याचा प्रयत्न केला. पण अडथळे खूप येतात. एकदा आमच्या चाळीतील बुद्धिबळ खेळणाऱ्या खेळाडूंचा खेळ बघत बसलो होतो. त्यांच्यापैकी एकाला ‘कोणते प्यादे महत्त्वाचे?’ एवढेच विचारले. तर दोघेजण ‘घोडा महत्त्वाचा’ की ‘उंट महत्त्वाचा’ यावरच भांडत बसले. सांगण्याचा मुद्दा एवढाच की बुद्धिबळ शिकवणारे। चांगले प्रशिक्षक दिसत नाहीत.

आपल्या औरंगाबादच्या प्रथमेशचा पराक्रम पाहून आम्हा अनेक विदयार्थ्यांना आपणही बुद्धिबळाचा आनंद घ्यावा, असे वाटू लागले आहे. आपल्या शाळेत कबड्डी, क्रिकेट व व्हॉलीबॉल यांचे प्रशिक्षण दिले जाते. सरावही करून घेतला जातो. त्याप्रमाणेच बुद्धिबळाचेही प्रशिक्षण दिले जावे, अशी आमची विनंती आहे. मी अनेक विदयाथ्र्यांची ही इच्छा माझ्या विनंती अर्जाद्द्वारे आपल्यासमोर व्यक्त करीत आहे. कृपया या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, ही विनंती.

 

आपला नम्र,

य. र. ल.

ज्ञानेश्वर विद्यालय, सयानी मार्ग,

महात्मा नगर,औरंगाबाद-४३१ ००४.

ई-मेल : yrl.123@x xxx.com

 


उदा :

 Vinanti Patra Lekhan in Marathi । विनंती पत्र लेखन मराठी ९ वी व १० वी
Vinanti Patra Lekhan in Marathi । विनंती पत्र लेखन मराठी ९ वी व १० वी१०

Video Credit : Giri Tutorials Youtube channel

 


 

  • वरील माहिती ही इयात्ता ९ वी व १० वी साठी महात्वाची आहे . 
  • ९ वी आणि १० वी साठी उपयुक्त पत्रलेखन . 

 

आमचे इतर पत्र लेखनाचे पोस्ट : 

Abhinandan Patra Lekhan In Marathi – अभिनंदन पत्र

Abhinandan Patra Lekhan  अभिनंदन पत्र उदाहरण

मराठी पत्र लेखन कसे करावे ?

Magni Patra Lekhan । मागणी पत्र कसे लिहावे ?

Letter Writing In Marathi। मराठी पत्र लेखन कसे करावे ?

 


 

मित्रांनो या माहिती  मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद .

 

1 thought on “Vinanti Patra Lekhan in Marathi । विनंती पत्र लेखन मराठी ९ वी व १० वी”

Leave a Comment