१००+ मराठी आलंकारिक शब्द | मराठी व्याकरण | Alankarik Shabd for Competitive Exam
आलंकारिक शब्द व्याख्या :
मराठी भाषेमध्ये असे काही शब्द आहेत की ज्याच्यामुळे भाषेला साज चढतो ,आशा शब्दांना मराठी व्याकरणाच्या भाषेत “आलंकारिक शब्द” असे म्हणतात . आलंकारिक शब्द भाषेतील रंजकता वाढवतात .
आलंकारिक शब्द-
- खुशालचेंडू – चैनखोर माणूस
- अकरावा रुद्र – अतिशय तापट माणूस.
- खेटरावी पूजा – अपशब्दाने खरडपट्टी काढणे
- अकलेचा कांदा – मूर्ख
- गर्भश्रीमंत – जन्मापासून श्रीमंत
- अकलेचा खंदक – अत्यंत मूर्ख माणूस
- गंगा-यमुना – अश्रू
- अरण्यरुदन – ज्याचा उपयोग नाही असे कृत्य
- गंडांतर – भीतिदायक संकट
- गाजरपारखी – कसलीही पारख नसलेला, मूर्ख
- अळवावरचे पाणी – फार काळ न टिकणारे
- गुरूकिल्ली – मर्म रहस्य
- गुळाचा गणपती – मंद बुद्धीचा
- अक्षरशत्रू – निरक्षर, अडाणी
- गोगलगाय – गरीब निरुपद्रवी मनुष्य
- ओनामा – सुरुवात, प्रारंभ
- उंटावरचा शहाणा – मूर्खपणाचा सल्ला देणारा घराबाहेर न पडणारा
- घरकोंबडा – घराबाहेर न पडणारा
- उंबराचे फूल – दुर्मिळ वस्तू, क्वचित भेटणारा
- चर्पटपंजरी – निरर्थक बडबड
- कर्णाचा अवतार – उदार मनुष्य
- चौदावे रत्न – मार
- कळसूत्री बाहुले – दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा
- छत्तीसचा अकडा – शत्रुत्व
- जमदग्नीचा अवतार – रागीट
- कळीचा नारद – कळ लावणारा
- टोळभैरव – कामात नासाडी करणारे लोक
- काडीपहिलवान – हडकुळा
- कुंभकर्ण – अतिशय झोपाळू
- ताटाखालचे मांजर – दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागणारा
- कूपमंडूक – संकुचित वृत्तीचा
- कोल्हेकुई – निरर्थक लोकांची बडबड
- त्रिशंकू – धड ना इकडे, धड ना तिकडे
- खडाजंगी – मोठे भांडण
- दगडावरची रेघ – कधीही न बदलणारे
- खडाष्टक – जोरदार भांडण
- देवमाणूस – चांगला सज्जन
- धोपट मार्ग – सरळ, नेहमीचा मार्ग
- नवकोट नारायण – खूप श्रीमंत
- नंदीबैल – हो ला हो म्हणणारा
- पर्वणी – अतिशय दुर्मिळ योग
- पाताळयंत्री – कारस्थान करणारा
- पांढरा कावळा – निसर्गात नसलेली वस्तू
- पांढरा परीस – लबाड
- पिकले पान – म्हातारा
- पोपटपंची – अर्थ न कळता पाठांतर करणारा
- बृहस्पती – बुद्धिमान
- तुरुंग – बिनभाड्याचे घर
- बोकेसंन्यासी – ढोंगी मनुष्य
- बोलाचीच कढी – केवळ शाब्दिक वचने
- भगीरथ प्रयत्न – आटोकाट प्रयत्न
- भाकडकथा – बाष्कळ गोष्टी
- भीष्मप्रतिज्ञा – कठीण प्रतिज्ञा
- मंथरा – दुष्ट स्त्री
- मायेचा पूत – पराक्रमी मनुष्य, मायाळू
- मारुतीचे शेपूट – लांबत जाणारे काम
- अष्टपैलू – सर्वगुणसंपन्न
- सोन्याचे दिवस – चांगले दिवस
- शकुनी मामा – वाईट वृत्तीचा माणूस
- सूर्यवंशी – उशिरा उठणारा
- श्रीगणेशा – सुरुवात , प्रारंभ
- रामबाण औषध – अचूक गुणकारी
- वाहती गंगा – आलेली संधी
- शेंदाड शिपाई – भित्रा मनुष्य
- रुपेरी बेडी – चाकरी
- मृगजळ – केवळ अभ्यास
- दुपारची सावली – अल्प काळ टिकणारे
- गप्पीदास – गप्पा मारणारा
- वाटण्याच्या अक्षता – नकार
- सांबाचा अवतार – अतिशय भोळा माणूस
- सुळावरची पोळी – जीव धोक्यात घालण्यासारखे काम
- स्वल्प विराम – क्षणभर विश्रांती
- नंदनवन – आनंदाचे ठिकाण
- ताकापुरते रामायण – कामपूर्ते शिखामत
- टांगती तलवार – सतत भीतीची जाणीव
- बत्तिशी – दाताची कवळी
- गळ्यातील ताईत – अतिशय आवडती व्यक्ती
- काळा बाजार – खोटा व्यवहार
- सोंगाड्या – वग नाट्यात विविध भूमिका करणारा
- सारथी – रथ चालवणारा
- तारेवरची कसरत – सावधगिरीने करावयाचे काम .
- सांडणीस्वार – उंटावरून टपाल पोहचवणारा
- हिंगाचा खडा – त्रासदायक माणूस
- हरिश्चंद्र – सत्यवचनाचा माणूस
- पाण्यातील बुडबुडा – क्षणभंगुर गोष्ट
- वैष्णव – विष्णूची उपासना करणारा
- हरिचा लाल – विशेष व्यक्ती
- शैव – शंकराचा उपासक
- योगिनी – योग अभ्यास करणारी स्त्री
- मुक्ताफळे – वेडेवाकडे बोल
- नखशिखांत – सर्व शरीर भर
- जागल्या – रात्री पहारा करणारा
- सिकंदर – भाग्यवान
- अंधेर नगरी – अव्यव्स्तीत पानाचा कारभार
- बोकेसंन्याशी – ढोंगी मनुष्य
- स्मशान वैराग्य – तात्कालिक वैराग्य
- सव्यसाची – डाव्या व उजव्या दोन्ही हाताने काम करणारा मनुष्य
- लंबकर्ण – बेअकली / बेअकल
- बोलघेवडा – वाचाळ, वटवट करणारा
- मनमिळाऊ – सर्वांशी मिळून मिसळून वागणारा
- अंगावरचे बाळ – आईच्या अंगावर पिणारे बाळ
- इडापीडा – सर्व प्रकारची दुख , संकटे
- इजा बिजा तिजा – त्रिवार प्रयत्न
- ओली आग – महापूर
- अकबरी प्रथा – चांगली प्रथा
मराठी आलंकारिक शब्द विडिओ माध्यमातून :
Video Credit : Snehankur Deshing Youtube Channel
खालील माहितीसाठी हीच पोस्ट पुन्हा वाचा :
अलंकारिक शब्द
अलंकारिक शब्द-मराठी व्याकरण, Download Study Notes PDF
आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ | Alankarik Shabd V Tyanche …
आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ | Alankarik Shabd V Tyanche …
“बोलघेवडा” या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा.
आमचे इतर काही व्याकरण पोस्ट :
विरुद्धार्थी शब्द मराठी । Opposite Words In Marathi
प्रयोग मराठी व्याकरण ,कर्तरी ,कर्मणी ,भावे
नाम म्हणजे काय ? नामाचे किती प्रकार आहेत ?
भाषा अलंकार व त्याचे प्रकार | Alankar in Marathi Grammar
रसग्रहण म्हणजे काय ? What is the Rasagrahan
समास व त्याचे प्रकार | Samas in Marathi Grammar | Marathi Grammar
मित्रांनो या माहिती मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.
धन्यवाद .