समूहदर्शक शब्द | मराठी व्याकरण | Samuhdarshak Shabd

समूहदर्शक शब्द | मराठी व्याकरण | SamuhDarshak Shabd

समूहदर्शक शब्द | मराठी व्याकरण | SamuhDarshak Shabd
समूहदर्शक शब्द | मराठी व्याकरण | SamuhDarshak Shabd

 

 

मित्रांनो आजच्या या पोस्टच्या माध्यमातून मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आलो आहे. म्हणजेच आजचा लेख च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मराठी भाषेतील व्याकरणातील समूहदर्शक शब्द यावर उदहरणासाहित माहिती सांगणार आहोत .  तसेच SamuhDarshak Shabd in Marathi Grammar सांगणार आहोत चला तर मग पाहूया…

        समूहदर्शक शब्द म्हणजे काय ?

एकापेक्षा जास्त वस्तू,घटक यांना दर्शविण्यासाठी ज्या शब्दाचा उपयोग केला जातो त्या शब्दांना ” समूहदर्शक शब्द “  ( SamuhDarshak Shabd )असे म्हणतात.

किंवा

ज्या शब्दातून आपल्याला समूह असल्याचा बोध होतो त्या शब्दांना समूहदर्शक शब्द | SamuhDarshak Shabd असे म्हणतात.

जसे ,

  1. आंब्यांच्या झाडांची – राई
  2. प्रश्नपत्रिकांचा – संच
  3. उंटांचा – तांडा
  4. पालेभाजीची – गड्डी/जुडी
  5. पोत्यांची, नोटांची – थप्पी
  6. करवंदांची – जाळी
  7. फुलझाडांचा – ताटवा
  8. खेळाडूंचा – संघ
  9. भाकऱ्यांची, रुपयांची – चवड
  10. गवताचा – भारा
  11. यात्रेकरूंची – जत्रा
  12. जहाजांचा – काफिला
  13. वाद्यांचा – वृंद
  14. द्राक्षांचा – घड, घोस
  15. नोटांचे – पुडके
  16. माणसांचा – जमाव
  17. मेंढ्यांचा – कळप
  18. वेलींचा –कुंज
  19. हरिणांचा – कळप
  20. पक्ष्यांचा – थवा
  21. उपकरणांचा – संच
  22. प्रवाशांची – झुंबड
  23. पुस्तकांचा, वह्यांचा – गठ्ठा
  24. केळ्यांचा – लोंगर/घड
समूहदर्शक शब्द | मराठी व्याकरण | SamuhDarshak Shabd
समूहदर्शक शब्द | मराठी व्याकरण | SamuhDarshak Shabd

 

  1. फळांचा – घोस
  2. किल्ल्यांचा  – जुडगा
  3. बांबूचे – बेट
  4. गुरांचा – कळप
  5. महिलांचे – मंडळ
  6. चोरांची/दरोडेखोरांची – टोळी
  7. वस्तूंचा – संच
  8. तारकांचा – पुंज
  9. विद्यार्थ्यांचा – गट
  10. धान्याची – रास
  11. मुंग्यांची – रांग
  12. नारळांचा – ढीग
  13. हत्तींचा – कळप,
  14. सैनिकांचे / ची – पथक/तुकडी /फलटण
  15. उतारूंची – झुंबड
  16. पाठ्यपुस्तकांचा – संच
  17. केसांचा – झुबका, पुंजका
  18. केसांची – बट, जट
  19. पिकत घातलेल्या आंब्यांची – अढी
  20. काजूंची, माशांची – गाथण
  21. फुलांचा – गुच्छ
  22. गाईगुरांचे – खिल्लार
  23. मडक्यांची – उतरंड
  24. गवताची – गंजी, पेंढी
  25. लाकडांची, उसांची – मोळी
  26. ताऱ्यांचा – पुंजका
  27. विटांचा, कलिंगडांचा – ढीग
  28. दुर्वांची – जुडी
  29. मुलांचा – घोळका
  30. नाण्यांची – चळत
  31. विमानांचा – ताफा
  32. साधूंचा – जथा

समूहदर्शक शब्द विडिओ माध्यमातून :

Video Credit : MPSC Swayam Youtube Channel 

 

खालील माहितीसाठी हीच पोस्ट पुन्हा वाचा :

100+ समूहदर्शक शब्द मराठी | Samuh Darshak Shabd
समूहदर्शक शब्द – Lists of Collective Nouns in Marathi
भाकरीचा समूहदर्शक शब्द
Collective Words समूहदर्शक शब्द (Samuhdarshak Shabd)
List Samuh Darshak Shabd PDF Download | सर्व समूहदर्शक …

 

आमचे इतर काही व्याकरण पोस्ट : 

विरामचिन्हे व त्यांची नावे | मराठी व्याकरण | Viram Chinh in Marathi Grammar

विरुद्धार्थी शब्द मराठी । Opposite Words In Marathi

प्रयोग मराठी व्याकरण ,कर्तरी ,कर्मणी ,भावे

नाम म्हणजे काय ? नामाचे किती प्रकार आहेत ? 

वर्ण म्हणजे काय ? संधी म्हणजे काय ?

रसग्रहण म्हणजे काय ? What is the Rasagrahan

 


मित्रांनो या माहिती  मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद .

 

 

Leave a Comment