विरामचिन्हे व त्यांची नावे | मराठी व्याकरण | Viram Chinh in Marathi Grammar

विरामचिन्हे व त्यांची नावे | मराठी व्याकरण | Viram Chinh in Marathi Grammar

 

 

विरामचिन्हे व त्यांची नावे | मराठी व्याकरण
विरामचिन्हे व त्यांची नावे | मराठी व्याकरण

 

मित्रांनो आजच्या या पोस्टच्या माध्यमातून मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आलो आहे. म्हणजेच आजचा लेख च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मराठी भाषेतील व्याकरणातील विरामचिन्हे त्यांची नावे ,प्रकार यावर उदहरणासाहित माहिती सांगणार आहोत .  तसेच  Viram Chinh in Marathi Grammar सांगणार आहोत चला तर मग पाहूया…

 

टीप : विरामचिन्हे इंग्रजी भाषेकडून मराठी भाषेला मिळालेली देणगी आहेत.

  •  आपण जेव्हा बोलतो, संभाषण करतो, तेव्हा आपल्याला मधूनमधून थांबावे लागते. या थांबण्याला ‘विराम’ असे म्हणतात. बोलण्यातील विराम निरनिराळ्या चिन्हांनी दाखवले जातात. अशा चिन्हांना ‘विरामचिन्हे’ असे म्हणतात. विरामचिन्हांमुळे वाक्य कोठे संपले, कोठे सुरू झाले की अपूर्ण आहे? अशा विविध गोष्टी कळतात. म्हणून विरामचिन्हांना लेखनात महत्त्व असते. अशा चिन्हांचा वापर केव्हा व कोठे करावा हे समजून घ्यावे लागते. जर उद्गारातील भाव सौम्य प्रकारात असेल तर स्वल्पविराम द्यावा.

विरामचिन्हे दोन प्रकारची आहेत.

1) विराम दर्शविणारी : पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम इ.

2) अर्थबोध करणारी : प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह

 

क्र.

 

चिन्ह

 

चिन्ह

 

केव्हा वापरतात ?

 

उदाहरण

1)

पूर्णविराम

.

1)   विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी

2)   शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी अद्याक्षरांपूढे

1)   तो घरी गेला .

2)   बी. ए. शिंदे

2)

अर्धविराम

;

दोन छोटी वाक्ये, उभयान्वयी अव्ययानी जोडलेली असतात तेव्हा . त्याने खूप अभ्यास केला; परंतु चांगले गुण मिळाले नाहीत .
3)

स्वल्पविराम

,

1) एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास अवतरणातील वाक्य व बाहेरील वाक्ये वेगळी दाखविण्यासाठी, संबोधन वेगळे दाखविण्यासाठी ,अनेक छोट्या घटना वेगळ्या दाखविण्यासाठी. 1) मला कथा,नाटके , कादंबऱ्या आवडतात.

2) मधू म्हणाला, “इकडे ये”.

3) गुरुजी आले    माझ्याकडे बघितले, किंचित हसले, खुर्चीत बसले .

4)

अपूर्ण विराम

:

वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले : 1,8,14,27,40
5)

प्रश्नचिन्ह

?

प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी. तू केव्हा आलास ?
6 )

उद्गारचिन्ह

!

उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या/वाक्याच्या शेवटी . 1) अरेरे ! तो नापास झाला .

2) शाबास ! छान खेळलास .

7)

अवतरण चिन्हे

“   “

‘   ‘

(दुहेरी) बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्याकरीता.

(एकेरी) एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असल्यास, दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना.

1) तो म्हणाला “मी येईन.”

 

2) मूलध्वनिना ‘ वर्ण ‘ असे म्हणतात .

8)

संयोगचिन्ह

1) दोन शब्द जोडताना .

2) ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास

1) विद्यार्थी – भांडार

2) पुढील कार्यक्रम शाळेच्या खेळा-

च्या मैदानावर होतील .

9)

आपसारण चिन्ह (डॅश)

(स्पष्टीकरणचिन्ह)

_

1) बोलता बोलता विचारमालिका तुटलयास.

2) स्पष्टीकरण द्यायचे असल्यास .

1) मी तिथे गेलो, पण-

2) तो मुलगा – ज्याने बक्षीस मिळविले- आपल्या शाळेतील शाळेतील आहे .

10)

विकल्प चिन्ह

/

पर्याय दाखविणे मी चहा/कॉफी घेतो.

 

विरामचिन्हे व त्यांची नावे | मराठी व्याकरण | Viram Chinh in Marathi Grammar
विरामचिन्हे व त्यांची नावे | मराठी व्याकरण | Viram Chinh in Marathi Grammar

 

आपले विचार, भावना आपण लिहून व्यक्त करतो. तसेच आपण अन्य व्यक्तींनी व्यक्त केलेल्या भावना, विचार वाचतो. हे वाचन कधी मनातल्या मनात असते, तर कधी कधी आपण हे वाचन प्रकटपणानेही करतो.

कथा, कादंबरी, नाटक इत्यादी साहित्यप्रकारांत अनेकदा संवाद, संभाषणे यांचा समावेश असतो. या व अशा सर्व ठिकाणी आपल्याला विरामचिन्हांचा खूप उपयोग होतो. आपल्या लेखनात वाक्यरचनेचे जसे महत्त्व आहे, तसेच विराम चिन्हाणचे महत्व आहे .

विरामचिन्हे व त्यांची नावे विडिओ माध्यमातून :

Video Credit : pravin muralidhar shahane Youtube Channel 

 

खालील माहितीसाठी हीच पोस्ट पुन्हा वाचा :

विरामचिन्हे व त्याचे प्रकार | Punctuation Mark In Marathi
मराठी विरामचिन्हे व त्यांची नावे | Viram Chinh In Marathi
मराठी व्याकरण विरामचिन्हे | Punctuation Marks in Marathi
Viram chinh in Marathi || विरामचिन्हे व त्याचे प्रकार
विरामचिन्हे सर्व प्रकार व्याख्या व उदाहरणांसह

 

आमचे इतर काही व्याकरण पोस्ट : 

विरुद्धार्थी शब्द मराठी । Opposite Words In Marathi

प्रयोग मराठी व्याकरण ,कर्तरी ,कर्मणी ,भावे

नाम म्हणजे काय ? नामाचे किती प्रकार आहेत ? 

वर्ण म्हणजे काय ? संधी म्हणजे काय ?

रसग्रहण म्हणजे काय ? What is the Rasagrahan

 


मित्रांनो या माहिती  मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद .

 

 

2 thoughts on “विरामचिन्हे व त्यांची नावे | मराठी व्याकरण | Viram Chinh in Marathi Grammar”

Leave a Comment