Abhinandan Patra Lekhan – अभिनंदन पत्र

Abhinandan Patra Lekhan – अभिनंदन पत्र

 

Abhinandan Patra Lekhan - अभिनंदन पत्र
Abhinandan Patra Lekhan – अभिनंदन पत्र

 

 १ प्रश्न : कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत तुमच्या मित्राला प्रथम पारितोषिक मिळाले आहे. त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

 

 

नारायण निवास,

शनवार पेठ,

सातारा शहर,

सातारा

दि. ३-१०-१४,

प्रिय अमोल,

सप्रेम नमस्कार.

‘अजिंक्यतारा’ वृत्तपत्राच्या आजच्या अंकात वक्तृत्व स्पर्धेतील तुझ्या यशाचे वृत्त वाचले. सातारा जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती साजरी झाली. त्या निमित्ताने झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत तुझा पहिला क्रमांक आला, हे वाचून अतिशय आनंद झाला. खरोखर अभिनंदनाची गोष्ट आहे हं ही !

तू रयत संस्थेच्या शाळेचा विद्यार्थी असल्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी तुला आदर वाटणे स्वाभाविकच आहे. पण आम्हांलाही रयत शिक्षण संस्थेविषयी आणि भाऊरावांविषयी नितांत आदर आहे; कारण ते खरेखुरे कर्मवीर होते.

अमोल, मला माहीत आहे की खूप मेहनतीने तू आपल्या वक्तृत्वकलेचा विकास केला आहेस. वेळोवेळी तू सभांतून भाषण करत असतोस. यामुळेच आज तू शंभरसव्वाशे विदयाध्यात पहिला आलास. दुसरे असे की, भाषणाचा विषय देखील तुझ्या जिव्हाळ्याचाच होता.

मला माहीत आहे, तू खूप कष्टाने शिक्षण घेत आहेस. घरात शिक्षणासाठी अनुकूल वातावरण नसताना तू सतत प्रगती करत आहेस. त्याबद्दल तुझे मनापासून अभिनंदन.

यापुढेही तुला वेळोवेळी असेच यश मिळत जावो, अशा सदिच्छा व्यक्त करून हे पत्र पूर्ण करत आहे.

तुझ्या ती. स्व. आईबाबांना सप्रेम साष्टांग नमस्कार.

 

 

तुझा दोस्त, क्ष

 

 २ ) प्रश्न : साखळी चोर पकडून दिले बद्दल मैत्रिणीला अभिनंदन करणारे पत्र लिहा . 

 

दि. :- १० ऑगस्ट, २०१०

प्रिय,

सोनाली काय, कशी आहेस आणि तुझे आई-बाबा कसे अहित ? मी बरी ‘आहे आणि आशा करते की तुम्ही सगळे देखिल उत्तम असावात. अभिनंदन ! आज सकाळी वर्तमानपत्रात आलेली तुझी बातमी वाचली की, तू साखळी चोचांस चोरांस पकडायला पोलिसांची मदत केलीस आणि म्हणून तुझा जाहिर सत्कार करण्यात आला. खर सांगू तर ही बातमी 3 एकल्यानंतर माझा आनंद गगनात मावेना असा झालाय, मी काय करू आणि काय नको अशी झालीए, सकाळपासून माझ्या मैत्रिणी मला विचारताय” ही तुझीच मैत्रिण आहे ना! मला खूप छान वाटतय.

अभिमानाने छाती भरून येते. खरच मला तुझा खूप अभिमान वाटतोय आणि तुझ आय. पी. एस. ऑफिसर होण्याचं स्वप्न पूर्ण करायच्या तयारी ला लागलीस हे पण जाणवतय. काहीही असो, खूप बरं वाटतय तुझी बातमी ऐकून, आजचा दिवस उत्तम जाणार माझा मला खात्री आहे काका, काकूंना पण तितकाच आनंद झाला असणार. त्यांना माझा नमस्कार बोल.

मी आता इथेच थांबते नाहीतूर दिवस कमी पडायचा मला बोलायली. चल बाथ, काळजी घे, पून्हा एकदा अभिनंदन.

 

तुझीच मैत्रीण

अ. ब. क.

Abhinandan Patra Lekhan अभिनंदन पत्र

अधिक माहितीसाठी. 

Leave a Comment