जनसेवा हीच ईश्वर सेवा निबंध मराठी । Janseva Hich Eshwar Seva Nibandh Marathi

जनसेवा हीच ईश्वर सेवा निबंध मराठी । Janseva Hich Eshwar Seva Nibandh Marathi 

 

जनसेवा हीच ईश्वर सेवा निबंध मराठी । Janseva Hich Eshwar Seva Nibandh Marathi
जनसेवा हीच ईश्वर सेवा निबंध मराठी । Janseva Hich Eshwar Seva Nibandh Marathi

 

मित्रानो , या पोस्ट मध्ये जनसेवा हीच ईश्वर सेवा निबंध मराठी लेखन / Janseva Hich Eshwar Seva Nibandh Marathi 100 ते 400 शब्दात निबंध लेखन करणार आहोत . हा निबंध 7 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्याना परीक्षेत वैचारिक निबंध म्हणून विचयाराला जातो त्यामुळे निबंध नीट वाचा.  आज आपण Janseva Hich Eshwar Seva Nibandh Marathi या विषयावर निबंध बघणार आहोत.

मागच्या रविवारची गोष्ट. आमच्या गावाजवळ सुमारे दहा किलोमीटरच्या अंतरावर एक मालवाहू टेंपो, प्रवाशांसह उलटा झाला. वीस पंचवीस प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले गेले. काहीना तातडीने पुण्याला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. दवाखान्यात ही गढ़ी लोटली होती.

गावकरीही स्वयंस्फूर्त मदतीचा हात देऊ करीत होते. मानवतेचे जण पुजारीच ! या स्वयंसेवकांत सगळ्या धर्माचे, जातीचे, राजकीय पक्षांचे लहान मोठे. गरीब-श्रीमंत लोक जमतील ती मदत करीत होते. कुणी स्वतःची गाडी पुण्याला पाठवायला तयार होते, कुणी कापसाची बंडल, बँडेजेस, डेटॉलच्या बाटल्या आणत होते तर कुणी खांद्यावरून अपघातग्रस्तांची वाहतूक करीत होते, कुणी रक्तदानासाठी रंग लावीत होते.

खरंच ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ म्हणतात ह्याचा अनुभव मीही प्रत्यक्ष घेतला त्यादिवशी. बाबांचाही पूर्ण दिवस त्यातच खर्ची पडला. आमच्या घरची सत्यनारायणाची पूजा त्यादिवशी रात्री आठ वाजता झाली. कारण बाबा अडकले होते ‘नरनारायणाच्या’ पूजेत ! दुसऱ्याला मदत करणाऱ्या माझ्या बाबांचा मला खूप खूप अभिमान वाटला.

वरोड्याला डॉ. बाबा आमट्यांनी तर कुष्ठरोग्यांच्या उपचारासाठी त्यांच्या पुनर्वसनासाठी रात्रीचा दिवस करून आनंदवन उभारले. कुष्ठरोग्यांच्या हातांनी तेथे शेतमळे फुलवले. भाजीपाला, मोत्यांची कणसे पिकवली. रोग्यांमधील न्यूनगंड पुसून, त्यांच्यात आत्मसन्मान व आत्मविश्वास जागवला. मदर तेरेसांनी दीनदुबळ्या दलितांची, पीडितांची, तहहयात सेवा शुश्रुषा केली. फार फार वर्षांपूर्वी ज्या थोर शास्त्रज्ञाने देवीची लस शोधून काढली, तो लसींचा जनक लुई पाश्चर ह्याने संशोधनाच्या निष्कर्षांसाठी वेगवेगळ्या रोगजंतूंचे इंजेक्शन स्वतः टोचून घेऊन, त्याचे शरीरावर होणारे परिणाम अभ्यासले. लुई पाश्चरच्या अथक प्रयत्नांमुळे देवीसारख्या असाध्य रोगांचे निर्मूलन झाले नी लुई पाश्चर अमर झाला आगळी वेगळी मानवसेवा करून!

वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस, काव्हर ह्यांनी शेतीमध्ये अभिनव प्रयोग व संशोधन करून कृषीक्षेत्रात क्रांती घडवली. मानवी विकासाला हातभार लावला. और समाजसेवक म. फुले, ह्यांनी स्त्रीशिक्षणाची सुरुवात केली. अस्पृश्याना, , दलितांना पिण्याच्या पाण्याचा हौद खुला करून दिला. आपल्याच मरणाची वाट पाहणाऱ्या विधवांच्या पुनर्विवाहांचा आग्रह धरून कित्येक बालविधवांना जगण्याची उमेद दिली. महर्षी कव्यांनी स्त्रियांसाठी अनाथाश्रम, शिक्षणकेंद्रे काढली. ते म्हणत, ‘ईश्वराने आपल्याला दोन हात दिलेत, बुद्धी दिलीय ते काही घेण्यासाठी सरसावण्यापेक्षा, देण्यासाठी वापरले जावेत.’

‘कुणी नाही वाली भार पेलण्यास, फाटके आभाळ भेगा धरतीस’ अशीच. अवस्था असलेल्या निराधार, अनाथ बालकांना छप्पराची सावली नि ममतेचा पदर दिला सिंधुताई सपकाळ या मातेन! मरेपर्यंत रुग्णसेवा करणाऱ्या डॉ. कोटणीसांची कहाणी तर अमरत्वाला पोहाचली. प्रतिकूल परिस्थितीत ह्या प्रभृतींनी माणसातल्या ईश्वराची मनोभावे पूजा केली.

हल्ली तर जग जवळ आलंय. ग्लोबलायझेशन झालंय. इंटरनेट सुरू केलं की कळतं, जग व जगातली माणसं एकाच संगणकात मावू शकतात. साऱ्या जगातल्या मानवाचा धर्मही एकच मानवता. ‘हे विश्वचि माझे घर’ म्हणणाऱ्या ज्ञानोबांना सातशे वर्षांपूर्वीच ग्लोबलायझेशनचा अर्थ बहुधा कळला होता म्हणूनच त्यांनी विश्वासाठी मागणे मागितले ‘पसायदाना’तून! त्यागाची मूर्ती सानेगुरुजींनी जनसेवेसाठीच जन्म अन् ती करता करताच मृत्यू यावा असं म्हटलंय. ते म्हणतात,

“हे कंकण करी बांधियले

जनसेवे जीवन दिधले

देशार्थ प्राण हे उरले

मी सिद्ध मरायाला हो,

बलसागर भारत होवो.

आपण सारे भारतीय संस्कृतीत रुजलो, वाढलो, बंधुभाव, एकोपा आपल्या रक्तातच भिनलाय. जणू काही, ‘तू हाक मार मी प्रतिसाद देईन, तू मदत माग मी धावत येईन’ असं आश्वासक शब्दात सांगणारे आम्ही सारे बांधव,

आमच्या शाळेत मकरसंक्रांत ते रथसप्तमी ह्या काळात एक अभिनव उपक्रम राबवला, या दिवसात प्रत्येकाने ‘जे आपल्यापाशी आहे’ त्याचा विनियोग दुसऱ्यासाठी करण्याचा. अर्थात स्वतःची सेवा, कष्ट, मदत गरजूंना देण्याचा उपक्रम. आम्ही विद्यार्थी-विद्यार्थिनी हॉस्पिटलमध्ये गेलो. पेशंटची सेवा केली, एड्सग्रस्त, कॅन्सरग्रस्त मुलांची करमणूक केली. पाच पन्नास घरांमधून जुने कपडे गोळे केले, ते गरीब गरजू अनाथ मुलांच्या वसतीगृहात नेऊन दिले, श्रमदान करून परसबागा, रस्ते स्वच्छ केले. वृद्धाश्रमांना भेटी दिल्या.

वृद्ध, आजी-आजोबांशी गप्पा मारल्या. त्यांना गाणी म्हणून दाखवली. एक प्रेमळ आजी तर आमच्या तोंडावरून हात फिरवीत म्हणाल्या, ‘बाळांनो, कल्याण होवो तुमचं यशवंत व्हा. कीर्तीवंत व्हा. त्यांच्या तोंडभरून आशीर्वादानं वाटलं, ‘कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी ?” खरा भगवंत तर माणसाच्या हृदयातच वसतो आहे. भगवंत भावाचा भुकेला आहे. नैवेद्याचा नाही. गूळखोबरं, पुरणपोळी भुकेल्या मानवाच्या मुखी घातलं तरच भगवंत तृप्त होतो नि विश्वकल्याणी वर देतो हे नक्की.

 

जनसेवा हीच ईश्वर सेवा निबंध मराठी । Janseva Hich Eshwar Seva Nibandh Marathi
जनसेवा हीच ईश्वर सेवा निबंध मराठी । Janseva Hich Eshwar Seva Nibandh Marathi

 

जनसेवा हीच ईश्वर सेवा १० ओळी निबंध 

 

मानवी आणि समाजाच्या विकासात जनसेवा अत्यंत महत्वाची आहे. “जनसेवा हीच ईश्वर सेवा” ह्या उक्तीने यात्रा करणाऱ्या असंख्य लोकांचे आधार केंद्रीत ठेवणे आवडतंय. ही उक्ती नक्कीच वास्तविक आहे कारण जनसेवेचे कार्य मानवी आत्म्यातल्या दिव्यतेचे व्यक्तींचे काम करते.

जनसेवेचे महत्व आपल्या समाजाच्या सुधारणेत आणि प्रगतीत महत्वपूर्ण आहे. आपल्या ताणांत राहाणारे आणि जीवनातील विविध समस्यांना सुलभतेने सोडवणारे लोकांच्या सेवेची आवश्यकता आपल्या समाजाला असते. तरीही, जनसेवा करणे अनुभवणारे व्यक्तींना ईश्वरीय स्पर्शाची अनुभूती होते.

जनसेवेचे कार्य विविध रूपांतराने होऊ शकतात. या विधानांमध्ये तपासणी, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक क्षेत्र, आर्थिक सहाय्य, वृत्ती सेवा इत्यादी आढळतात. जनसेवेचे कार्य अशा विविध क्षेत्रांमध्ये असताना, आपल्या जीवनाला अर्थपूर्णता आणि उद्दिष्टांसाठी योग्यतेनुसार वापरले जाऊ शकते.

जनसेवा करण्याची प्रेरणा सार्वजनिक हिताची भावना, सामाजिक न्यायाची आणि सहानुभूतीची प्राधान्यपूर्ण आणि सुसंस्कृत भावना म्हणजे. जनतेला असे व्हावे, त्यांना ईश्वरीयतेची अनुभूती होते.

संपूर्ण माणसांनी जनसेवेच्या माध्यमातून एकत्रीत होणे आवडते, अनेक लोकांनी जनसेवेच्या माध्यमातून जीवनात एक आदर्श महसूसले आहे. ह्या प्रकारे, “जनसेवा हीच ईश्वर सेवा” असं वाटतंय की, जनतेच्या सेवेमुळे आपल्या जीवनातील ईश्वरीय स्पर्श वाटतो आणि त्याची महत्वाची मान्यता आपल्या हृदयात स्थानांतरित करते.

या प्रकारे, जनसेवेच्या महत्वाची आपल्या नोंद घेतल्याने आपण आपल्या समाजाला सुधारित करण्यात मदत करण्यास सक्षम होऊ शकता, आणि आपल्या जीवनाला आदर्श आणि पूजनीय बनवू शकता.

“जनसेवा हीच ईश्वर सेवा” निबंध (10 ओळी )

जगभरातील विविध संस्था, समाजसेवा केंद्र आणि स्वयंसेवींच्या उद्योगांमुळे जनसेवा ह्या जगातील अत्यंत महत्वाची गोष्ट झाली आहे. म्हणजे जनसेवा हीच ईश्वर सेवा असलेल्या व्यक्तीची अद्याप अनोखी प्रामाणिकता असते. ईश्वराच्या वाटेल अत्यंत महत्वपूर्ण कार्यांपैकी एक आहे जी जनतेला सेवेची प्रेरणा देते.

जनसेवेची महत्वाची आवश्यकता विविध क्षेत्रांमध्ये आपल्या समाजाला सापडते. विविध क्षेत्रांमध्ये निर्मित असणाऱ्या संस्थांनी आपल्या समाजातल्या तात्पुरत्या विचारांना अंमलात आणून त्यांच्यासोबत सहभागी बनवावे. असे केल्याने आपल्या समाजात उपलब्ध असणाऱ्या साधनांची मात्रा वाढते व त्यांचा सापडता फायदा सामाजिक जीवनात असतो.

जनसेवेचे कार्य विविध आहेत. स्वयंसेवींनी विविध धार्मिक, सामाजिक, वैज्ञानिक, विद्यार्थी आणि आर्थिक विभागांमध्ये उपलब्ध असणार्या कार्यांमध्ये जनतेचा मदत करणे असते. वैदिक मंदिर, गुरुद्वारे, मस्जिदे, चर्चे, आश्रमे आणि बौद्ध विहारे जसे स्थान आपल्या समाजातल्या धार्मिक आणि आध्यात्मिक आत्माविश्वासाला आत्मनिर्भरता आणि संतुष्टी देतात.

जनसेवेचे कार्यांमध्ये शिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका असते. विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा व योग्यता देण्यासाठी शिक्षकांची संख्या वाढते. विविध शिक्षण संस्थांनी विविध विद्यार्थींसाठी विविध प्रकारच्या शिक्षण सुविधा उपलब्ध करण्यास सहाय्य करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेतल्यास आपल्या समाजाला वैज्ञानिक विकासात सहाय्य मिळतो.

आरोग्याची क्षेत्रे विविध आरोग्य सेवा केंद्रांची योजना व कार्यात घेणे असे स्वयंसेवींनी करणे आवडते. आरोग्याच्या क्षेत्रात तज्ञ डॉक्टर, नर्स, आरोग्य सहाय्यकांची अपेक्षित किंमत आपल्या समाजासाठी कमी करण्यास सहाय्य करतात.

जनसेवेच्या क्षेत्रामध्ये आर्थिक विकासाची महत्त्वपूर्ण भूमिका असते. व्यापार, उद्योग, शेती, सौर ऊर्जा योजना, स्वच्छता अभियान, सामाजिक क्षेत्रातील कंपन्यांच्या सामाजिक उत्पादनाची सुरुवात करणे जनसेवेचे महत्त्वपूर्ण आणि आवश्यक कार्य असते.

सर्व जण जनसेवेच्या क्षेत्रामध्ये सहभागी असताना अपूर्ण आहेत. अवकाश, समय व शक्ती संबंधित असलेल्या कारणांमुळे अनेक लोक जनसेवेच्या क्षेत्रात सहभागी नाहीत. त्यामुळे जनसेवेचे कार्य एकटाच्या हातात होते तर त्यात समावेश असलेल्या सर्वांच्या सहभागाने ज्या प्रमाणात होते, ती महत्वाची व्हावी.

जनसेवा हीच वास्तविकतेची एक उच्च मान्यता असलेल्या भावना आहे. ह्या भावनेच्या माध्यमातून जनसेवेचा कार्य सुस्थितीपासून अधिक महत्वपूर्ण बनतो आणि समाजाला उद्धार देतो. जनसेवा हीच एक उद्दिष्टांसाठी अद्याप अनिवार्य आणि आपल्या व्यक्तिमत्वाची उच्चतम प्रकटी असते.

 

टीप : हा निबंध व्यक्तिमत्वाच्या विचारांचे आवलंब करतो. आपला व्यक्तिमत्व आणि अनुभव निबंधाच्या निवड असलेल्या वाचनार्यांना भिन्न असणारा असा असू शकतो.

जनसेवा हीच ईश्वर सेवा मराठी निबंध विडियो माध्यमातून 

Video Credit : Alvisha youtube Channal 

 

वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता :

  • जनसेवा हीच ईश्वर सेवा निबंध
  • जनसेवा हीच ईश्वरसेवा या ओळींचा अर्थ स्पष्ट करा
  • जनसेवा हीच ईश्वर सेवा मराठी निबंध
  • जनसेवा हीच ईश्वर सेवा कल्पनाविस्तार
  • मानव सेवा हीच ईश्वर सेवा मराठी निबंध 

 

आमचे इतर निबंध पोस्ट : 

संगणक काळाची गरज निबंध मराठी

गुरु शिष्य परंपरा निबंध । Guru Shishya Paranpara Essay 

हुंडा एक सामाजिक समस्या / एक अनिष्ट प्रथा निबंध 

एकीचे बळ मराठी निबंध। Ekiche Bal Essay In Marathi

माझी आजी निबंध मराठी । Majhi Aaji Nibandh In Marathi

 

टीप :

1 ) जनसेवा हीच ईश्वर सेवा  हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0 वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 


 

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद. 

 

 

Leave a Comment