Pradushan Ek Samasya Marathi Nibandh। प्रदूषण एक समस्या निबंध मराठी

Pradushan Ek Samasya Marathi Nibandh। प्रदूषण एक समस्या निबंध मराठी

 

Pradushan Ek Samasya Marathi Nibandh
Pradushan Ek Samasya Marathi Nibandh

 

 

मित्रानो , या पोस्ट मध्ये प्रदूषण एक समस्या निबंध मराठी लेखन / Pradushan Ek Samasya Marathi Nibandh 100 ते 400 शब्दात निबंध लेखन करणार आहोत . हा निबंध 7 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्याना परीक्षेत वैचारिक निबंध म्हणून विचयाराला जातो त्यामुळे निबंध नीट वाचा.  आज आपण Pradushan Ek Samasya Marathi Nibandh या विषयावर निबंध बघणार आहोत.

… 

वाहत्या रहदारीच्या रस्त्यातून जाताना अचानक वाहतूक ठप्प झाली. कचकन ब्रेक दाबत, पुढे मागे… मोटारी थांबल्या. विचारपूस केल्यावर कळले की पाच- सहा मोटार चालकांकडे (PUC) पी. यू.सी. चा परवाना नसल्याने त्यांना पोलिसांनी रोखले होते. जिथे आधीच धोक्याची पातळी वायू प्रदूषणाने ओलांडली होती, तिथे या मोटारी वातावरणात प्रचंड धूर सोडत वायू प्रदूषण वाढवित होत्या.

सध्या २१ व्या शतकाकडे वाटचाल करताना मानवाच्या प्रगतीचा वार बेलगाम चौखूर उधळलाय, असं नाही वाटत. वैज्ञानिक प्रगती, आण्विक संशोधन, अंतराळात भरारी, ग्रहगोलांवर स्वारी, नित्य नवे शोध…. नवी नवी क्षितिजे पादाक्रांत करण्याची धडपड ! निसर्गावर मात करण्याचा बालीश अट्टाहास, खोट्या अहंभावाची जोपासना करता करता मानवाला अनेक संकटांना सामोरं जावं लागत आहे. भ्रष्टाचाराचा कॅन्सर, लोकसंख्येचा भस्मासूर नि प्रदूषणाचा महाभयंकर राक्षस! …. यानं ह्याचं दैनंदिन जीवन पार झाकोळून टाकलंय.

माणसाच्या आजच्या हव्यासापायी हवा, पाणी, अन्न, जमीन, धान्य सारं सारं प्रदूषित झालंय. औद्योगिक क्रांतीपूर्वीच प्रदूषणाचा जन्म झाला, परंतु निसर्गाच्या कुंपणानं माणसाच्या जीवनात धुमाकूळ घालणाऱ्या या उन्मत्त दैत्याला थोपवून धरला होता. पण तो तरी कुठवर साहेल हा स्वैराचार ? सूर्य, वायू, पाणी या समर्थ घटकांवर नैसर्गिक चक्रांवरच तर या पृथ्वीतलावरचं पर्यावरण अबाधित राहतं. पण प्रगतीच्या नावाखाली ‘किती घेशील दो कराने’ ह्या भूमिकेतून आपण हा निसर्ग लुबाडला, ओरबाडला नी पर्यायाने प्रदूषणाने पाऊल पुढे टाकले. निर्भेळ जीवनासाठी निसर्गाची साथ हवी त्यासाठी काय करावे सांगताना ज्ञानोबा म्हणतात ह्र

नगरेचि रचावी । जलाशये निर्मावी ।

महावने लावावी । नानाविधे ।। 

वृक्षांना त्यांनी कर्मयोगी म्हटलं आहे. पर्यावरण रक्षणात वृक्षांचा सिंहाचा वाटा! पण लोकसंख्येच्या भस्मासुराने प्रचंड वृक्षतोड केली. सिमेंटची जंगले उभी राहिली. वातावरणातील थंडपणा नष्ट झाला, तापमान वाढू लागले. कारण प्रदूषणाने पृथ्वीभोवतालच्या ओझोन थराला छिद्र पडले. वातावरणीय थरांमधील वॉर्मिंग मुख्य कार्बनडायऑक्साइड अधिकाधिक तापून राहू लागला. ग्लोबल राहिले. दोन्ही ध्रुव वितळू लागले, पाऊस कमी झाला, कृत्रिम पावसाच्या ढगांसाठी वारेमाप खर्च सुरू झाला. जमीन पुरेनाशी झाल्यावर मानवाने नद्या, तळी समुद्रात भरी घातल्या त्यात इमारती, इमले उभारले. नद्यांचे प्रवाह बदलले …. मग समुद्राने निषेध नोंदविला – केरळला त्सुनामी लाटांनी शहरे गिळंकृत केली. न्यूयॉर्कला कॅतरिना व रीटा ही वादळे येऊन ठेपली.

या लोकसंख्या वाढीमुळे शेतकऱ्यांनी रासायनिक खते, संकरित बी बियाणे शोधली. ‘हरितक्रांती’ झाली. पण त्यात धान्याचा कस गेला नि जमिनीचा पोत गेला. जमीन दूषित झाली, खारवली. धान्य, भाज्या सर्वांवर कीटकनाशके फवारून अन्न अंतर्बाह्य विषारी झाले.

तुकोबाराय म्हणतात, ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी.’ जंतुनाशके मिश्रित अन्नसेवनाने माणसे पोखरली, नाना व्याधींनी जखडली. औषधांमुळे आयुर्मान वाढले, पण आयुष्याची प्रत खालावली. वाहनांच्या धुराने, छातीचे पिंजरे धुरकटले. फुफ्फुसे निकामी होऊ लागली. कॅन्सरसारखे रोग बळावले. पक्षाघात, हार्ट अॅटॅक २०व्या वर्षीच मुलांना येऊ लागला.

जीवघेणी स्पर्धा, मानसिक ताणतणाव, दुरावलेले नातेसंबंध, विभक्त कुटुंबसंस्था हेही सामाजिक मानसिकतेतील प्रदूषणच नव्हे काय ? वाढणारी गुन्हेगारी, -हास पावलेले मूल्यसंस्कार, भ्रष्टाचार, वशिलेबाजी, अंधश्रद्धा, भोंदूगिरी बुवाबाजी ही तर युवा पिढीला लागलेली कीडच आहे. याला उपाय आहे. निर्मळ मन. चांगल्या विचारांचं मन ! मनाचे प्रदूषण सर्वात घातक, सुसंगती, सुवाचन, सत्संग ह्यांची कांस धरून मनाचं प्रदूषण प्रथम घालवायला हवं.

मग गणेशोत्सव असला तरी आपण लाऊडस्पीकरवर कर्णकर्कश्य गाणी, सिनेमा गीते, डिस्को लावणार नाही. ज्याने कानाचे विकार निर्माण होतात. भोपाळसारखी वायुगळती, अणुभट्टीतील स्फोट काळजीपूर्वक थांबवू शकू. Clean air act तंतोतंत पाळू. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ अशा नुसत्याच घोषणा देणार नाही तर मोहिमा राबवू.

निसर्गसंगती सदा घडो

मंजूळ पक्षीगान कानी पडो

कलंक प्रदूषणाचा झडो

वृक्षतोड सर्वथा नावडो.

टाकाऊपासून टिकाऊकडे वाटचाल करू. मळीपासून स्पिरीट, बगॅसपासून खत, कागद, पालापाचोळ्यातून कंपोस्ट खत, मलमूत्रातून बायोगॅस इत्यादी इत्यादी.

शासनही जागरूक झालंय, पण शासकीय योजना ‘प्रदूषित’ न होता प्रत्येकापर्यंत पोचल्या पाहिजेत अशी काळजी घेऊ.

आशा आहे …. आजच्या बालकांकडून! उद्याच्या नागरिकांकडून म्हणूनच

ध्यास घेऊया सारे मिळूनी

प्रदूषणावर मात करू।

वने जगवू, सृष्टी फुलवू

वृक्षांचा सन्मान करू ।।

५ जून…! जागतिक पर्यावरण दिन! आगळा वेगळा साजरा करू! वसुंधरेला नटवूनच!

समाप्त

 

Pradushan Ek Samasya Marathi Nibandh। प्रदूषण एक समस्या निबंध मराठी
Pradushan Ek Samasya Marathi Nibandh। प्रदूषण एक समस्या निबंध मराठी

 

 

प्रदूषण एक समस्या १० ओळी निबंध

 

प्रदूषण ही एक गंभीर समस्या आहे ज्यामुळे आपल्या प्राकृतिक वातावरणाला धीरे-धीरे नष्ट होत आहे. प्रदूषणाचं मुख्य कारण मानवी गतिविधींमुळे आहे, जसं की वाहतुकींचं प्रवास, कारखान्यांचं उत्पादन, ध्वनीकेंद्रांचं वापर व विद्युत उत्पादन. हे विकासाच्या नियमांचं व तंत्रज्ञानाचं असंगत वापर होण्याने झालं आहे.

प्रदूषणाच्या विविध प्रकारं आहेत, जसं की वायुप्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, ध्वनिप्रदूषण, जमिनीचं प्रदूषण आणि वन्यजीवनाचं प्रदूषण. वायुप्रदूषणाचं कारण वाहतुकींचं इमिशन आणि उष्मांचं पारखालण असतं, ज्यामुळे वातावरणात वायुविषाणू, धूळ, धुवा व उष्मांचं प्रमाण वाढतं.

पाण्याचं प्रदूषण प्रमुखतः औद्योगिक अपशिष्ट, नगरीचं अपशिष्ट आणि शेतीचं वापर होतं, ज्यामुळे पाण्याच्या नियमित वापरात वाष्टव्य व विषाक्त पदार्थ येतात. ध्वनिप्रदूषणामुळे उच्च शब्दस्तराचं कारण लोकांचं शारीरिक व मानसिक आरोग्य प्रभावित होतं.

जमिनीचं प्रदूषण म्हणजे भूमीची उपजाऊता कमी होणे, ज्यामुळे शेती आणि फळांमध्ये कमी येते. वन्यजीवनाचं प्रदूषण म्हणजे जंगलांचं कापून टाकणं, ज्यामुळे प्राकृतिक जीवनधर्मांचं विलीन होतं.

प्रदूषणाच्या परिणामस्वरुप वन्यजीवनात कमी, वायुमण्डळीय तापमानात वाढ, पाण्याच्या स्तरात वाढ, भूकंप, चक्रवात आणि इतर प्राकृतिक आपदा येऊन आहेत. तसेच, लोकांच्या स्वास्थ्यावरही खराब परिणाम दिसतो, ज्यात श्वासन संबंधी आजारे, वृद्धावस्थेचे आजारे आणि स्वास घेण्याच्या समस्या शामिल आहेत.

प्रदूषणाच्या समस्येचं संधीच समाधान संबंधित सरकारी नियमांमुळे होईल. आपल्याला नवीन आणि स्वच्छ ऊर्जा स्रोतांचं वापर करावं लागेल, जसं की सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा.

वाहतूकींच्या प्रकारांमध्ये सुधारणा करावा लागेल, जसं की जलद्रव्याचं वापर कमी करणं, पर्यावरणसाठी साठी नके वापर करणं आणि वाहनांमध्ये विद्युत चालक वापरणं. प्रदूषणाचं विरोध करण्यात सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे, कारण एकटे होण्याने ह्या समस्येचं नियंत्रण केलं जाऊ शकतं.

तसेच, विविध शैक्षणिक अभ्यासांतून लोकांना प्रदूषणाच्या परिणामांची जागरूकता व त्याचा नियंत्रण कसा करावा याबद्दलचं जाणे आवश्यक आहे.

सर्वांना सामाजिक जिम्मेवारी म्हणजे प्रदूषणाचं संघर्ष करावं आणि स्वच्छ आणि स्वस्थ वातावरण जगण्याचं प्रयत्न करावं, ज्यामुळे आपल्या भविष्यासाठी एक अचूक अधिकारी वाचता येईल.

 

प्रदूषण एक समस्या निबंध विडियो माध्यमातून 

Video credit : Adhiradeck Youtube channel

 

वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता :

प्रदूषण एक समस्या
प्रदूषण एक समस्या मराठी निबंध
प्रदूषण एक समस्या व उपाय
 प्रदूषण : एक गंभीर समस्या
प्रदूषण की समस्या पर निबंध
Pradushan ki samasya par nibandh.

 

आमच्या इतर निबंध पोस्ट :

Mobile Che Manogat Marathi Nibandh। मोबाईलचे मनोगत मराठी निबंध

Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh। मला पंख असते तर मराठी निबंध

माझी शाळा निबंध मराठी। Majhi Shala Nibandh Marathi

माझा आवडता कवी निबंध मराठी । Majha Avadata Kavi Nibandh Marathi

संगणक काळाची गरज निबंध मराठी । Sanganak Kalachi Garaj Nibandh In Marathi

गुरु शिष्य परंपरा निबंध । Guru Shishya Paranpara Essay 

 

टीप :

1 ) प्रदूषण एक समस्या निबंध मराठी हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0 वी व ११ वी १२ वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 


 

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद.

 

Leave a Comment