Susangati Sada Ghado Lyrics – सुसंगती सदा घडो कवितेचा अर्थ

Susangati Sada Ghado Lyrics – सुसंगती सदा घडो कवितेचा अर्थ

Susangati Sada Ghado Lyrics - सुसंगती सदा घडो कवितेचा अर्थ
Susangati Sada Ghado Lyrics – सुसंगती सदा घडो कवितेचा अर्थ

 

सुप्रसिद्ध कवी “मोरोपंत” यांची ही कविता, यात ते कवी “सुसंगती सदा घडो” या कविता मध्ये  संगीताचे महत्त्व सांगताना म्हणतात की , माणसाला चांगली संगत लाभली आणि त्याच्या कानावर सुसंस्कारित असे चार शब्द पडले तर त्याची आदर्श व्यक्ती म्हणून जडण-घडण व्हायला नक्कीच उपयोग होईल. त्याला समाजात योग्य ते स्थान मिळेल . (Susangati Sada Ghado Lyrics ) त्यामुळे व्यक्तीने योग्य ती संगत धरावी .

जीवनात संगतीचे फार महत्त्व आहे. चांगल्या संगतीने माणसाची समाजात किंमत वाढते आणि वाईट संगतीने समाजात किंमत कमी होत असते. त्यासाठी काही क्षण साधू वृत्तीच्या माणसाच्या संगतीत घालवले तर आपल्या जीवनाचे सार्थकता साधू शकतो. संगत ही चांगल्याची केली पाहिजे. म्हणून कवी सुसंगती सदा घडो या कविते मार्फत आपल्याला संगतीचे म्हहत्व सांगत आहे .

 

सुसंगती सदा घडो कवितेचा अर्थ .

 

“सुसंगती सदा घडो
सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतिचा झडो
विषय सर्वथा नावडो
सदंघ्रिकमळी दडो
मुरडिता हटाने अडो
वियोग घडता रडो
      मन भवच्चरित्री जडो”.   

।। १ ।। 

मला निरंतर सत्संग लाभो सज्जनाचेंच भाषण माझ्या कानावर येवो, मनाचा पापदोष झडून जावो, ऐहिक सुखोपभोगाचा सर्वस्वी वीट येवो. साधुसंतांच्या कमलासारख्या निर्मळ व कोमल चरणांचा आसरा माझ्या मनाला मिळो, त्यांनी दूर ढकलिलें असतां हट्टानेंच त्यानें तेथें अडून राहावें आणि इतकें करूनही त्या सधुचरणांचा वियोग झालाच तर त्यानें (पोटभर) रडावें, (तरीपण) त्यानें तुमच्या चरित्रांच्या पवित्र कथेंत निहमी रंगून जावे.

 

“न निश्‍चय कधी ढळो
कुजनविघ्नबाधा टळो
न चित्त भजनी चळो
मति सदुक्त मार्गी वळो
स्वतत्त्व हृदयां कळो
दुरभिमान सारा गळो
पुन्हा न मन हे मळो
दुरित आत्मबोधे जळो”

।। २ ।। 

माझे मन कधीही डळमळीत न होवो. दुष्टांनीं केलेल्या विघ्नांचा उपद्रव दूर होवो. चित्त तुमच्या भजनांत निश्चळ राहो. साधूंनीं सांगितलेल्या मार्गाकडे अन्तःकरण लागो. हृदयाला आत्मज्ञान लाभो. खोटा अभिमान साफ नाहींसा होवो. एकदा स्वच्छ होऊन भक्तिमार्गाला लागलेले मन पुन्हा विषयलालसेने मलीन न होवो आणि खर्या आत्मज्ञानाने सर्व पापाचे भस्म होवो.

 

“नजे प्रियस दोष ते
प्रियस दोषही चांगले
स्वतोक पितरा रुचे
जरी हि कर दमी रांगले
तुलाची धरी पोटीशी
कशी तदा यशोदा बरे
जरी मळवीशी रजो
मलीन काय तू अंबरे”

।। ३ ।। 

जे नावडत असेल ते नेहमीच आपल्या दृष्टीला सदोष दिसते. उलट जे आवडते असेल ते जरी सदोष असेल तरीहि चांगलेच वाटते. चिखलात जरी रांगले तरी आपले मूल आईबापांना आवडतेच. लहानपणी धुळीने अंग लडबडून घेऊन तुम्ही कपडे मळवीत असां तरी पण माता यशोदा तुम्हाला आपल्या पोटाशी कवटाळीत असेच की नाही.

“पिता जरी विटे
विटोन जननी कुपित्री विटे
दया मृतर सार्धधी
नकुल क:जले त्या किटे
प्रसादपट झाकिती
परीपरा गुरुचे थीटे
म्हणोनी म्हणती
भले न ऋण जन्मदेचे फीटे”

।। ४ ।। 

बाप चरी करंट्या पोराला विटला तर विटो. परंतु आई मात्र कधीहि विटत नाही. कुळाच्या कीर्तीला काळ्या काजळीप्रमाणे लागलेल्या त्या करंट्या पोरामुळे दयामृताचा ओलावा जिच्या अंतरंगात निरंतर आहे अशी ती माउली कधीहि (रागाने किंवा तिरस्काराने) गढूळ होत नाही. इतर गुरूंचे कृपावस्त्र झाकते खरे पण ते एकंदरीत अपुरेच पडते. (आईचे कृपावस्त्र मात्र बाळाला भरपूर पुरेसे होते) याच कारणास्तव सज्जन म्हणतात की जन्मदात्या मावलीचे ऋण कधीही फिटत नसते.

 

“कृतात्त कटका
मल ध्वज जरा दिसो लागली
पुर:सर्गता
स्वये झगडता तनु भागली
सहाय दुसरा
नसे तुज विणे बळे आगळा
लहू जरी उताविळा
स्वरी तो कापितो आगळा”

।। ५ ।। 

यमाच्या सैन्याचे पांढरे निशाणच असे म्हातारपण नजरेच्या टप्यात आले आहे. यमाच्या स्वारीच्या अघाडीचे योद्धेच अशा रोगाबरोबर दोन हात करता करता हा थकून गेला आहे. तुझ्याहून ज्याच्या आंगी अधिक सामर्थ्य आहे असा दुसरा साह्यकारी कोणीच दिसत नाही. मग आताही जर मी अधीर होऊ नको तर या माझ्या शत्रूने गर्दन छाटलीच याची वाट काय.

 

“दया मृतघना
अहो हरीवळा मयुराकडे
रडे शिशुतया सी घे
कळवळोनी माता कडे
असा अतिथी
धार्मिकस्तुतपदा कदा सापडे
पुन्हा जड भवारणवी
उतरिता नदा सापडे”

।। ६ ।। 

हे दयामृताच्या मेघा हरे या मयूराकडे (मोरोपंत कवीकडे) प्रसाद करण्याच्या हेतूने वळा. जे मूल रडते त्याला त्याची आई मोठ्या कळवळ्याने उचलून कडेवर घेते. धर्मनिष्ठांनी ज्याच्या पावलांची स्तुति केली आहे अशा परमेश्वरा, असा याचक आपल्याला कोठे आढळेल. आपले दास पापभाराने कितीही जड झाले असेल तरी या संसारसागरांत त्यांना उचलून परतीरला लावणे तुम्हाला खास कठीण नाही.

 

Credit:
Lyricist: Bhide
Singer: Kavita Krishnamurty, Suresh Wadkar

 

सुसंगती सदा घडो कवितेचा उदाहणार्थ : 

इसापनीतीमधील माकड आणि सुसरीच्या मैत्रीची ही कथा. एकदा एका माकडाची आणि एका सुसरीची मैत्री होते. माकड त्या तलावाकाठी असणाऱ्या जांभळाच्या झाडावर बसून तलावात असणाऱ्या सुसरीला रोज गोड जांभळे खायला टाकत असते. त्या माकडाबद्दल आणि गोड जांभळाबद्दल सुसर आपल्या घरच्यांना जेव्हा सांगते तेव्हा त्या माकडाचे गोड काळीज खाण्याची इच्छा त्यांना होते. म्हणून मग मेजवानीचे आमंत्रण देऊन, माकडाला फसवून आपल्या घरी नेण्याचे सुसर ठरवते.

अर्ध्या वाटेत गेल्यावर मात्र त्याला न राहवून ते ‘सत्य’ सांगते. माकड चतुर असल्याने “अगं, सुसरीबाई, आधी नाही का सांगायचेस, मी तर काळीज झाडावरच ठेवून आलो. चल, आपण परत जाऊन झाडावरून काळीज घेऊन येऊ या.” ते ऐकून सुसरही लगेच मागे फिरते.

तलावाच्या काठाजवळ येताच माकड टणकन् उडी मारून झाडाकडे झेप घेते. “अगं वेडे, काळीज कधी झाडावर ठेवून येतात का? बरे झाले, माझा जीव वाचला. तुझ्याशी मैत्री करून मी दिलेल्या गोड जांभळाच्या बदल्यात चांगली परतफेड करणार होतीस ना? तुझ्याशी मैत्री म्हणजे असंगाशी संग झाला ग बाई! पुन्हा इकडे येऊही नकोस आणि माझ्याशी बोलूही नकोस.”

 

सुसंगति सदा घडो’ या वचनाचा तुम्हाला जाणवलेला अर्थ स्पष्ट करा.​

“मला निरंतर सत्संग लाभो सज्जनाचेंच भाषण माझ्या कानावर येवो, मनाचा पापदोष झडून जावो, ऐहिक सुखोपभोगाचा सर्वस्वी वीट येवो.”

मला निरंतर सत्संग लाभो सज्जनाचेंच भाषण माझ्या कानावर येवो, मनाचा पापदोष झडून जावो, ऐहिक सुखोपभोगाचा सर्वस्वी वीट येवो.साधुसंतांच्या कमलासारख्या निर्मळ व कोमल चरणांचा आसरा माझ्या मनाला मिळो, त्यांनी दूर ढकलिलें असतां हट्टानेंच त्यानें तेथें अडून राहावें आणि इतकें करूनही त्या सधुचरणांचा वियोग झालाच तर त्यानें (पोटभर) रडावें, त्यानें तुमच्या चरित्रांच्या पवित्र कथेंत निहमी रंगून जावे.

Susangati Sada Ghado poem Lyrics – सुसंगती सदा घडो कवितेचा अर्थ 

 

सुसंगती सदा घडो
सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतिचा झडो
विषय सर्वथा नावडो
सदंघ्रिकमळी दडो
मुरडिता हटाने अडो
वियोग घडता रडो
मन भवच्चरित्री जडो.. 

न निश्‍चय कधी ढळो
कुजनविघ्नबाधा टळो
न चित्त भजनी चळो
मति सदुक्त मार्गी वळो
स्वतत्त्व हृदयां कळो
दुरभिमान सारा गळो
पुन्हा न मन हे मळो
दुरित आत्मबोधे जळो.. 

नजे प्रियस दोष ते
प्रियस दोषही चांगले
स्वतोक पितरा रुचे
जरी हि कर दमी रांगले
तुलाची धरी पोटीशी
कशी तदा यशोदा बरे
जरी मळवीशी रजो
मलीन काय तू अंबरे.. 

पिता जरी विटे
विटोन जननी कुपित्री विटे
दया मृतर सार्धधी
नकुल क:जले त्या किटे
प्रसादपट झाकिती
परीपरा गुरुचे थीटे
म्हणोनी म्हणती
भले न ऋण जन्मदेचे फीटे.. 

कृतात्त कटका
मल ध्वज जरा दिसो लागली
पुर:सर्गता
स्वये झगडता तनु भागली
सहाय दुसरा
नसे तुज विणे बळे आगळा
लहू जरी उताविळा
स्वरी तो कापितो आगळा.. 

दया मृतघना
अहो हरीवळा मयुराकडे
रडे शिशुतया सी घे
कळवळोनी माता कडे
असा अतिथी
धार्मिकस्तुतपदा कदा सापडे
पुन्हा जड भवारणवी
उतरिता नदा सापडे.. 

 

 

Credit:
Lyricist: Bhide
Singer: Kavita Krishnamurty, Suresh Wadkar

 

Video credit : Nimish Pathak Youtube channel

 

tags : 

susangati sada ghado lyarics, susangati sada ghado, susangati, susangati sada, ghado, sada sat swarupam with lyrics, lyrics, sada, kavita krishnamurthy divya divya deepatkar susangati sada ghado, songs with lyrics, marathi song lyrics, marathi lyrics, marathi songs, new marathi songs with lyrics,

 

आमच्या इतर कविता पोस्ट : 

 


 

मित्रांनो या कवितांमध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद .

Leave a Comment