वर्ण म्हणजे काय ? संधी म्हणजे काय ? 

वर्ण म्हणजे काय ? संधी म्हणजे काय ? 

वर्ण म्हणजे काय ? संधी म्हणजे काय ? 
वर्ण म्हणजे काय ? संधी म्हणजे काय ? 

 

वर्ण म्हणजे काय ?

बोलताना निघणाऱ्या मूळध्वनीला वर्ण असे म्हणतात. किंव्हा ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास वर्ण म्हणतात.

बोल्यानंतर शब्द हवेत विरून जातात म्हणून लिखित स्वरूपत त्यांना ‘ध्वनी चिन्हे’ किंवा ‘अक्षरे’ असे म्हणतात.

मराठी भाषेत एकूण ४८ मूळ वर्ण आहेत.

 

वर्णमाला म्हणजे काय ? 

ज्या सांकेतिक खुणांनी आपण मूलध्वनी लिहून ठेवतो त्या सांकेतिक खुणेला ध्वनिचिन्हे किंवा अक्षर असे म्हणतात. अक्षर म्हणजे नष्ट न होणारे. मराठी भाषेत एकूण ५२ वर्ण आहेत. या वर्णाच्या मालिकेलाच वर्णमाला किंवा मुळाक्षरे असे म्हणतात.

 

वर्णांचे पुढील प्रमाणे तीन प्रकार आहेत :

(1) स्वर

(2) स्वरादी

(3) व्यंजने

 

स्वर म्हणजे काय ? 

(1) ज्या वर्णांचा उच्चार दुसऱ्या वर्णांच्या मदती शिवाय म्हणजेच मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता केला जातो त्यांना ‘स्वर’ असे म्हणतात.

(2) या वर्णमालेतील ‘अ’ पासून ‘औ’ पर्यंतच्या बारा वर्णांना स्वर असे म्हणतात.

(3) स्वरांचा उच्चार करताना आपले तोंड उघडे व पसरलेले असते, म्हणजे स्वरोच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो.

(4) स्वर म्हणजे नुसता सुर.

वर्ण म्हणजे काय ? संधी म्हणजे काय ? 

स्वरांचे प्रकार :

(a) उच्चारावरून पडणारे दोन प्रकार : 

(1) हस्व स्वर :- ज्यांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो त्यांना ‘हस्व स्वर’ म्हणतात.

उदा. – अ, इ, उ, ऋ, ऌ

(2) दीर्घ स्वर :- ज्यांचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो त्यांना ‘दीर्घ स्वर’ म्हणतात.

उदा. आ, ई, ऊ

(b) उच्चारस्थानावरून पडणारे प्रकार :

(1) सजातीय स्वर :- एकाच उच्चारस्थानावरून उच्चारले जाणारे वर्ण.

उदा. अ-आ, इ-ई, उ-ऊ

(2) विजातीय स्वर : भिन्न उच्चारस्थानावरून उच्चारले जाणारे वर्ण.

उदा. अ-इ, आ-ए, इ-ऊ, अ-औ

स्वरादी म्हणजे काय ? 

(1) ज्या वर्णाच्या उच्चाराआधी स्वराचा उच्चार करावा लागतो, त्यांना स्वरादी म्हणतात.

उदा – अं, अः

(2) अं अ: या दोन वर्णांना स्वरादी असे म्हणतात.

(3) यात अनुस्वार (._) व विसर्ग (:) असे दोन उच्चार आहेत.

(4) अनुस्वार व विसर्ग याचा उच्चार करताना या वर्णाच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना ‘स्वरादी’ असे म्हणतात.

व्यंजन म्हणजे काय ? 

ज्या वर्णाचा उच्चार स्वराचे साह्य घेऊन होतो त्यास व्यंजन म्हणतात.

(1) मराठी वर्णमालेतील ‘क, ख… पासून ह, ळ’ पर्यंतचे वर्ण व्यंजने आहेत.

(2) व्यंजने अपूर्ण उच्चाराची आहेत हे दाखवण्यासाठी त्यांचा पाय मोडून लिहितात.

(3) आपण जेव्हा क, ख, ग असा उच्चार करतो तेव्हा त्यात ‘अ’ हा स्वर मिसळुन आपण त्याचा उच्चार करतो.

 उदा : व् + अ = व

 

 

उच्चारावरून पडणारे प्रकार : 

a) कठोर :

कठोर वर्ण म्हणजे काय ? 

जे वर्ण उच्चारायला कठीण असतात, त्यांना कठोर वर्ण म्हणतात.

उदा. क, ख, च, छ, ट, ठ, ज्ञ, थ, प, फ, श, ष, स.

b) मृदु :

मृदु वर्ण म्हणजे काय ? 

ज्या व्यंजनांचा उच्चार हळुवार असतो किंवा नाजूक असतो त्यांना मृदु वर्ण म्हणतात.

उदा. ग, घ, ड, ज, झ, त्र, इ, ढ, ण, द, ध, न, ब, भ, म, य, र, ल, व, ह आणि ळ . 

 

उच्चस्थानावरुण  पडणारे प्रकार : 

a) तालव्य :

जेव्हा च, छ, ज आणि वर्गातील वर्णांस ‘य’ हा वर्ण लागून उच्चार होत असेल तर त्याचा समावेश तालव्य गटात होतो.

उदा. छडी, छाटणे, छि/छीथू, छूट, छोकरी.

दंततालव्य :

जेव्हा च, ज, झ वर्णांस ‘अ’ हा वर्ण लागून त्याचा उच्चार होत असेल तर त्याचा समावेश दंत तालव्य गटात होतो.

उदा. चिरणे, चीड, चेटूक, चैन, झिरपणे, झीट, झेंडू, जीभ, जेवण, जैत

वर्ण म्हणजे काय ? संधी म्हणजे काय ? 
वर्ण म्हणजे काय ? संधी म्हणजे काय ? 

 

संधी म्हणजे काय ? 

आपण बोलताना अनेक शब्द एकापुढे एक असे उच्चारतो. त्यावेळी एकमेकांशेजारी येणारे दोन वर्ण एकमेकांत मिसळतात. त्यांचा जोडशब्द तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होणाच्या प्रकारास संधी असे म्हणतात.

उदाहरणार्थ – या वर्गाचे विद्यार्थी हुशार आहेत.

या वाक्यात वर्ग + आत तसेच विद्या + अर्थी असे शब्द एकत्र येऊन वर्गात, विद्यार्थी हे शब्द उच्चारले जातात. वर्ग मधल्या अंत्य ‘अ’ मध्ये ‘आत’ मधल्या आद्य (पहिला वर्ण) ‘आ’ मिसळून एकत्रित वर्णोच्चार होतो. एका पुढे एक येणारे जवळजवळचे वर्ण एकमेकात मिसळून जाण्याच्या या प्रक्रियेला संधी म्हणतात. एकापाठोपाठ एक आलेले दोन वर्ण एकत्र होण्याच्या प्रकाराला संधी म्हणतात.

संधीचे  प्रकार किती व कोणते ? 

संधीचे तीन प्रकार आहेत व ते पुडीलप्रमाणे : 

(1) स्वरसंधी :

जेव्हा एकापाठोपाठ येणारे दोन स्वर एकत्र मिळतात; तेव्हा त्या संधीला स्वरसंधी असे म्हणतात.
(स्वर + वर)

उदा.  नर + ईश = नरेश

(2) व्यंजनसंधी :

एकापाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा त्या संधीला व्यंजनसंधी असे म्हणतात.

(व्यंजन + स्वर किंवा व्यंजन).

उदा.

अप् + मय = अम्मय
उत् + लंघन = उल्लंघन

(3) विसर्गसंधी :

एकापाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा विसर्ग असतो व दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा त्या संधीला विसर्गसंधी असे म्हणतात.

(विसर्ग + स्वर किंवा व्यंजन)

उदा.

मन: + रथ = मनोरथ
दु: + काळ = दुष्काळ.

 

Video Credits : Madhukar Kamble Youtube channal . 

 

  • वर्ण म्हणजे काय ?
  • संधी म्हणजे काय ? 
  • वर्णाचे प्रकार किती
  • संधीचे प्रकार किती
  • वर्ण म्हणजे काय ? संधी म्हणजे काय ? 

 

अधिक माहितीसाठी ..


 

मित्रांनो या माहिती मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद

Leave a Comment