शालेय जीवनात खेळांचे महत्त्व निबंध

शालेय जीवनात खेळांचे महत्त्व निबंध 

लेय जीवनात खेळांचे महत्त्व निबंध

 

माझ्या छोट्या भावाचे पहिल्या इयत्तेचे वेळापत्रक आई पाहत होती. त्यांत आठवडयात दहा तास क्रीडेसाठी ठेवलेले पाहून आईचा पारा चढला. किती हे तास खेळासाठी ? शाळेत अभ्यास असतो की नाही, की नुसते खेळच चालतात.’ आई अशी रागाने तणतणत होती.

आईचा राग वाढू नये म्हणून मी काहीच बोललो नाही, पण माझ्या मनात आले, ‘अशा या खेळांच्या तासांतही आम्ही कितीतरी शिकत असतोच. वर्गातील वया- पुस्तकांच्या तासांपेक्षा हे मैदानावरचे तास नक्कीच आम्हांला खूप काही शिकवून जातात.

खेळाचे तास आवडत नाहीत असा विद्यार्थी खरे तर शोधून सापडायचा नाही, म्हणून या तासांची सर्व विद्यार्थी वाट पाहत असतात. खेळांसाठी आम्ही सर्व विद्यार्थी मैदानाकडे धावू लागतो. क्रीडाविषयाचे ‘सर’ वाटेतच भेटतात. मग एकदोघांना चापट्या बसतात, कारण ‘रांगेने मैदानावर या’ अशी शिस्त सरांना अपेक्षित असते.

शिस्त हा खेळाचा अविभाज्य भाग आहे. खेळ खेळल्यावर मनाची, शरीराची मरगळ जाते. खेळात मेहनत झाल्याने भूक चांगली लागते व शरीरप्रकृतीवर त्याचा चांगला परिणाम होतो. आरोग्य निकोप राहते.

सांधित कवायतीमुळे शिस्त लागते, एकतेची भावना निर्माण होते. मैदानावर नेल्याने इकुम ऐकण्याची सवय लागते. नेत्याच्या हुकमानुसार हजारो विद्यार्थ्यांनी केलेली कवायत किती नयनरम्य असते, हे आपण भारतीयम्, एशियाड, ऑलिम्पिकमध्ये पाहतो.

सांघिक खेळांमुळे सांघिक भावना निर्माण होते. खेळ हा केवळ माझे कौशल्य दाखवण्यासाठी नाही, तर संघाच्या विजयासाठी आहे हे खेळाडूने लक्षात घ्यावे लागते. आज आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारे विद्यार्थी आपापल्या शाळेच्या संघातून खेळलेले असतातच.

शाळेत अभ्यासात हुशार असणाऱ्या विद्याथ्र्यांचे नेहमी कौतुक होते, त्यामुळे अभ्यासात कमी असणाऱ्या विद्याथ्र्यांच्या मनात कधी कधी न्यूनगंड निर्माण होतो, पण अशा विद्याथ्यांना जर खेळात नैपुण्य मिळवता आले, तर ते हरवलेला आत्मविश्वास परत मिळवू शकतात. कोणत्याही खेळात निष्णात होण्यासाठी चिकाटीने सराव करणे आवश्यक असते.

खेळात कोणाचा तरी जय व कोणाचा तरी पराजय उरलेला असतो. अशा वेळी पराभवही हसत स्वीकारला पाहिजे. जिंकलेल्याचे अभिनंदन केले पाहिजे हे शिक्षण खेळांच्या तासात मिळते. त्याचा उपयोग आपल्या व्यक्तिमत्त्व विकासात आणि भावी जीवनातही होतो.

टीप :

1 ) शालेय जीवनात खेळांचे महत्त्व हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 

 

अधिक माहितीसाठी ..


 

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद

Leave a Comment