संतांची शिकवण निबंध । Santanchi Shikvan Essay in Marathi

संतांची शिकवण निबंध । Santanchi Shikvan Essay in Marathi

संतांची शिकवण निबंध । Santanchi Shikvan Essay in Marathi
संतांची शिकवण निबंध । Santanchi Shikvan Essay in Marathi

 

 

प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण संतांची शिकवण निबंध | Santanchi shikvan essay in marathi  यावर निबंध लेखन  करणार आहोत.  खरं म्हणल आजच्या या २१ व्या युगात  पुस्तके वाचायला, ग्रंथ वाचायला कुणालाच वेळ नाही . म्हणून आपण आज या निबंध द्वारे संतांनी खूप वर्षांपूर्वी सांगितलेल्या गोष्टी आणि भाकिते या निबंधात अभ्यासनार आहेत.  आपला आजचा  प्रगत देश याविषयी संतांनी आधीच लिहून ठेवले होते आणि कल्पना केलेली होती. यावरून आपल्याला समजते की त्यावेळेस संत किती हुशार होते ,

याविषयी आपण ( संतांची शिकवण निबंध । Santanchi Shikvan Essay in Marathi )  या पोस्ट मधी बगणार  आहोत तर चला निबंधाला  सुरुवात करुया ..।

 

संतांची शिकवण मराठी निबंध 

 

‘साधुसंत येति घरा । तोचि दिवाळी दसरा ।।’ अशी आपल्याकडे समजूत आहे. कारण सत्संगाचा महिमा आपल्याकडे सर्वांनीच जाणलेला आहे. पंडितकवी मोरोपंत आपल्या “केकावली च्या अखेरीस परमेशाला विनवतात, ‘सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो’.

साधुसंतांची थोरवी सांगताना संतकवी कबीर सांगतात, ” हे माणसा, तू इरीची भक्तो करण्याऐवजी हरिजनाची म्हणजे हरीचा सेवक असलेल्या साधुसंताची भक्ती कर. कारण परमेश्वर प्रसन्न झाला तर तो तुला धनदौलत देईल, पण साधुसंत तुला प्रत्यक्ष परमेश्वरच मिळवून देईल.” म्हणजे परमेश्वरापर्यंत पोचण्यासाठी साधुसंत हे सोपान ठरतात.

साधुसंत स्वतः संसारापासून अलिप्त राहत असले तरी सर्वसामान्य सांसारिकांना ते अतिशय उत्तम मार्गदर्शन करत. ज्ञानदेवांनी या माणसाला नामस्मरणाचा सोपा मार्ग दाखवला. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी षोडषोपचार पूजेची काहीही आवश्यकता नाही. केवळ परमेश्वराचे नामस्मरण खच्या भक्तिभावाने केले म्हणजे परमेश्वर प्रसन्न होतो. कारण  “भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा” . ज्ञानदेवाच्या प्रभावळीत सर्व जातिधर्माचे लोक होते. त्यांत सावतामाळी होता, नरहरी सोनार होता, नामदेव शिंपी, बँका महार, गोरा कुंभार, नंदखाटिक हे पण होते. ज्ञानदेवांनी समाजाला प्रत्यक्ष कृतीने ही शिकवण दिली की, देख सर्वांचा आहे, सर्वांना त्याची भक्ती करता येते.

परमेशाच्या कीर्तनात दंग होऊन ज्ञानाचा प्रसार करूया असे नामदेव भक्तांना सांगतात. नाथांचे जीवन हे तर समाजाला आदर्श घालून देणारेच होते. अस्पृश्यांच्या घरी एकनाथ जेवायला गेले आणि आपल्या घरीही त्यांनी अस्पृश्यांना जेवायला बोलावले. संस्कृत भाषा ही देववाणी असली, तरी आपल्या मराठी भाषेतही उत्कृष्ट काव्यरचना करता येते, हे नाथांनी दाखवून दिले.

तुकाराममहाराजांनी आपल्या अभंगांतून भक्तीचे मळे फुलवले त्याचवेळी समाजातील होगी भक्तांच्या ढोंगांवर टीकाही केली. समर्थ रामदासांनी लोकांना स्वराज्याचा आणि बलोपासनेचा मार्ग दाखवला. पढतमूर्खाची लक्षणे सांगून त्यांनी सर्वसामान्यांना नीतीचा मार्ग दाखवला. मनाचे श्लोक रचून मनाला सद्गुणांची दीक्षा दिली.

आपल्या महाराष्ट्रात संतांची परंपरा अखंडित चालू आहे. तुकडोजी महाराज, गाडगेबाबा यांचे जीवनचरित्र हीच संपूर्ण शिकवण होती. कोणाकडे तरी श्रम केल्याशिवाय त्यांच्याकडून भाकरी घेण्याचा आपल्याला अधिकार नाही, असं गाडगेबाबा परखडपणे सांगत.

साने गुरुजींनी ‘जगाला प्रेम अर्पावे’ हाच संदेश दिला, तर अपेगातही माणूस ही शिकवण बाबा आमटे यांनी दिली. या संतांची शिकवण एवढी महान आहे, म्हणून तर ज्ञानेश्वर म्हणतात –

वर्षत सकळ मंगळी ।  ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूतळी ।  भेटतु भूता ।।

 

संतांची शिकवण निबंध मराठी

 

टीप :

1 ) संतांची शिकवण निबंध  हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0 वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

3 ) संतांची शिकवण निबंध । Santanchi Shikvan Essay in Marathi

 

 

आमचे इतर काही निबंध : 

संत जनाबाई निबंध – Sant Janabai Essay

संत गाडगेबाबा निबंध – Sant Gadagebaba Nibandh

आईची थोरवी निबंध – Aaichi Thoravi Nibandhv

आम्ही संपावर जातो तेव्हा..  निबंध 

 


 

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद । 

Leave a Comment