आईची थोरवी निबंध – Aaichi Thoravi Nibandh

आईची थोरवी निबंध – Aaichi Thoravi Nibandh

आईची थोरवी निबंध - Aaichi Thoravi Nibandh
आईची थोरवी निबंध – Aaichi Thoravi Nibandh

 

“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी

‘अतिपरिचयात अवज्ञा असे एक सुवचन आहे. एखाद्या गोष्टीचा खूप सहवास मिळाला की किंमत कळत नाही, असेच बरेचसे आपले आईबाबत होते. जन्मल्यापासून आपण मोठे होईपर्यंत आई सतत आपल्याबरोबर असते. सतत आपली कामे करत असते. म्हणून आईची थोरवी आपल्याला जाणवत नाही पण ज्यांना मातृसहवास लाभत नाही त्यांना मात्र वाटते की, ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.

आई आपल्या बाळासाठी काय काय करते, ते ज्ञानेश्वरांसारख्या थोर संतांनी जाणले होते से सांगतात की, आई जेव्हा बाळाला जेवू घालते, तेव्हा ती त्याला गिळता येतील. असेच माम करते, तुकाराम महाराज म्हणतात की, बाळाला चालायला शिकवताना तो यातला अनुसरून आपली पावले टाकते. हे जे आईला जमते ते इतरांना जमत नाही. म्हणून तर पाळण्यात राहणाऱ्या बाळाला आईने उचलून जवळ घेतले की तिचा स्पर्श, तिच्या हृदयाचे ठोके आणून ते रडणारे बाळ शांत होते. आईच्या सान्निध्यात सुरक्षितता वाटते म्हणून तर माधव जूलियनांसारखे कवी आईची आठवण काढताना म्हणतात, “हे प्रेमस्वरूप आई, तू वेगाने माझ्यासाठी खाली भूतलावर ये, मला तुझ्या कुशीत घे कारण-

” विद्याधनप्रतिष्ठा लाभे अता मला ही

आईविणे परी मी हा पोरकाच राही. “

अशी ही आई आपल्या बाळासाठी काय करत नाही? गडावर उशीर झाला. गडाचे दरवाजे बंद झाले. गावात खाली आपले बाळ भुकेले असेल या काळजीने गडाचा अवघड कडा उतरून, काट्याकुट्यांतून हिरकणी गवळण बाळाजवळ धावली. आकाशात उंच भन्या मारणान्या वारीचेही लक्ष आपल्या पिलांपाशी असते. बालकाचा अपराध, चूक आईच पोटात घालते, म्हणून कवी मोरोपंत म्हणतात

” प्रसादपट झाकिती घरी परी गुरुचे थिटे,

म्हणौनि म्हणति भले न ऋण जन्मदेचे फिटे, “

महात्माजांनीही आईची ही थोरवी जाणली होती. म्हणून ते सांगत, ” एक माता ही सहस्र शिक्षकांपेक्षाही श्रेष्ठ आहे.” आजची सुशिक्षित माता आपल्या बालकाचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास साधण्यासाठी सदैव झटत असते. बाळ दोन-अडीच वर्षांचा झाल्याबरोबर ती त्याला शाळेत पाठवते. त्याच्या अडचणी सोडवते. कितीही संकटे कोसळली तरी ती आपल्या बाळाला ‘कोड्याचा मांडा करून घातले. म्हणून तर जिजामाताच शिवरायाला घडवू शकली. प्रत्यक्ष भगवान गणेशानेही आपल्या मातेला प्रदक्षिणा घालून विश्वप्रदक्षिणेचे श्रेय मिळवले. अशी आहे ही आईची थोरवी आई थोर तुझे उपकार !

 

आईची थोरवी निबंध – Aaichi Thoravi Nibandh

Aaichi thorvi in marathi language

Aaichi thorvi in marathi

 

Video credits : Champ Club youtube channel 

 

टीप :

1 ) आईची थोरवी हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0 वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 

 

अधिक माहितीसाठी ..


 

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद

Leave a Comment