संत जनाबाई निबंध – Sant Janabai Essay

संत जनाबाई निबंध

संत जनाबाई निबंध - Sant Janabai Essay
संत जनाबाई निबंध – Sant Janabai Essay

 

मराठी साहित्यदरवार आज शेकडो वर्षे उत्कृष्ट काव्यसंपदेने आहे. तेराव्या शतकात ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरी सांगितली. त्यापूर्वीही महानुभव कवींनी उत्कर काव्यरचना केली होती. कवी मुकुंदराजाचा ‘विवेकसिंधू’ हा ग्रंथही त्यापूर्वी लिहिले आहे. पूर्ण साहित्याबरोबर संतकवींनी रचलेल्या ओव्या, अभंगांनी मराठी साहित्याला माधुर्य प्राप्त करून दिले आहे.

ज्ञानेश्वर, नामदेव आणि त्यांच्या प्रभावळीतील इतर संत यांनीही विपुल रचना केल्या. नरहरी सोनार, बंका महार, चोखा मेळा, सेना न्हावी यांचीही रचना आपण “विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे या कवीबरोबर आपणास मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा, निर्मळा अशा कवयित्री ही भेटतात”. या कवयित्री कुठल्याही शाळेत वा महाविदयालयात जाऊन काव्यशास्त्र शिकलेल्या नव्हत्या, किंबहुना त्यांना रचना केली तो काव्य म्हणून नव्हेच, तर स्वतःच्या मनातील भक्तिभावना व्यक्त करणे हाच त्यांच्या निर्मितीमागचा उद्देश होता.

जनाबाई ही त्यांच्यापैकीच एक जनाबाईचा जन्म कोठे झाला. केव्हा झाला, तिचे आईवडील कोण याविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही. कारण ही एक चुकलेली लहान मुलगी नामदेवाच्या वडलांना जत्रेत सापडली. निचे कुणीही पालक सापडले नाहीत म्हणून त्यांनी तिला आपल्या घरात सांभाळले.

नामदेवाचे घर हे भक्तिरसात डुंबलेले होते. नामदेवाचे आई, वडील, त्याच्या पत्नी, नामदेव स्वतः विठ्ठलभक्तीपर अभंग रचत. या वातावरणात वाढणारी जनाबाई हो परमेश्वरभक्त झाली नसती तरच नवल. कोठल्याही शाळेत कधीही न गेलेली जनाबाई आपली भक्तिभावना काव्यात बोलू लागली. थोडेथोडके नाहीत तर सुमारे साडेतीनशे अभंग जनाबाईचे आज उपलब्ध आहेत.

जनाबाई नामदेवांना आपला गुरु मानत असे, म्हणून प्रत्येक अभंगाच्या अखेरी ती आपला उल्लेख ‘नामयाची दासी जनी’ असा करते. जनाबाईने आपल्या गुरूचे म्हणजे ‘नामदेवाचे चरित्र’ अभंगांतून गायले आहे. त्याचप्रमाणे ती आपल्या अभंगांतून हरिश्चंद्राचे आख्यान सांगते कृष्णजन्म, बाल क्रीडा व काला यांचे वी रसभरीत वर्णन करते.

जनाबाईची परमेश्वरावर उत्कट भक्ती होती. त्यामुळे तिला प्रत्येक काम करताना परमेश्वर आपल्याला मदत करत आहे, असे वाटे. जनी केर काढते, तर चक्रपाणि केर भरतो. जनीचे जाते ओढण्यास भगवंत मदत करतो, असे तिला वाटते. आपल्या अभंगांत ती म्हणते की, परमेश्वर ही आंधळ्याची काठी आहे. ती कुठे अडकली आहे ? परमेश्वराला ती हरणी म्हणते व स्वतला त्याचे पाडस म्हणते, त्याच्या भेटीसाठी तिचे प्राण कंठाशी येतात. ती त्याला धावत येण्यास विनवते. परमेश्वराप्रमाणे जनाबाईच्या मनात संतांविषयी आदर आहे.

संतांचा गौरव गाताना तो विविध रूपके योजते. साखर व तिची गोडी वेगळी करता येत नाही. त्याप्रमाणे संत व भगवंत यांना वेगळे करता येणार नाही, असे ती सांगते. परमेश्वरावरील उत्कट भक्ती, शब्दांचा साधेपणा व मनाचा भोळा भाव बनाबाईच्या रचनेचे विशेष आहेत. आपल्या गुरूबरोबर इ. स. १३५० मध्ये जनाबाईने समाधी घेतली.

संत जनाबाईंचे काही अभंग प्रसिद्ध आहेत. त्यातून तिची ज्ञानेश्वर बद्दलची भक्ती व्यक्त होते.

 ज्ञानाचा सागर ! सखा माझा ज्ञानेश्वर !
मारुनिया जावे ! बा माझ्या पोटी यावे !
ऐसे करी माझ्या भावा ! सख्या माझ्या ज्ञानदेवा !!
जावे वोवाळूने ! जन्मोजन्मी दासी जनी !!

तर दुसर्‍या अभंगात जनाबाई म्हणते-
धन्य ज्ञानेश्वर ! धन्य त्याचा भाव !
त्याचे पायी देव आम्हा भेटी !
नामयाची जनी पलाहा पै झाला !
भेटावया आला पांडुरंग !!

संत ज्ञानदेवांच्या धावा करताना ती म्हणते –
ज्ञानाबाई आईं ! आत्ता तुझे पायी !
धाविनिया  येई  ! दुडदुडा !!

बालपणी तिच्या आईचे छत्र हरपले म्हणून विठ्ठलाला ती आई म्हणते तिच्या पुढील अभंग प्रसिद्ध आहे.

ये ग ये ग विठाबाई ! माझे पंढरीचे आई !
भीमा आणि चंद्रभागा ! तुझ्या चरणाची गंगा !
इतक्या सहित्या यावे ! माझ्या अंगणी नाचावे !
माझा रंग तुझे गुनी ! म्हणे नामयाची जनी !

त्याचप्रमाणे त्याचा प्रसिद्ध अभंग हा सर्वांच्या अतिशय परिचित आहे –
विठु माझा लेकुरवाळा ! संगे लेकुरणंचा मला !
निवृत्ती हा खांद्यावरी ! सोपानाचा हात धरी !
पुढे चाले ग्यानेश्वर ! मागे मुक्ताई सुंदर !

 

टीप :

1 )  संत जनाबाई निबंध हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0 वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 

 

अधिक माहितीसाठी ..


 

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद

Leave a Comment