Samas in Marathi Grammar | समास व त्याचे प्रकार | मराठी व्याकरण 

 Samas in Marathi Grammar | समास व त्याचे प्रकार | मराठी व्याकरण 

 

 

 Samas in Marathi Grammar | समास व त्याचे प्रकार | मराठी व्याकरण 
 Samas in Marathi Grammar | समास व त्याचे प्रकार | मराठी व्याकरण 

 

 

समास म्हणजे काय ?

परस्पर संबंधामुळे दोन शब्द नेहमी एकत्र उच्चारले जातात तेव्हा अनावश्यक शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करण्याच्या प्रकारास समास असे म्हणतात व तयार होणाऱ्या शब्दास सामासिक शब्द म्हणतात. या शब्दांची फोड करून दाखविण्यास विग्रह असे म्हणतात. समासात दोन शब्द फक्त शेजारी-शेजारी ठेवले जातात. (सम + अस = एकत्र होणे.) एकाच सामासिक शब्दाचा वेगवेगळ्या प्रकारे विग्रह होऊ शकतो त्यामुळे समासात मात्र फरक पडू शकतो.

 

1) अव्ययीभाव समास (प्रथमपद प्रधान) Avyayibhav Samas 

1) या समासातील पहिले पद प्रधान असून ते उपसर्गरूपी अव्यय असते. हे उपसर्ग संस्कृत, मराठी व फारशी भाषेतील असतात.

2) या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो.

3) संस्कृतमधील शब्दात पहिले अव्यय असते व दुसरा शब्द विशेषण किंवा नाम असतो; परंतु मराठी उदाहरणात मात्र शब्दांची पुनरावृत्ती होते व दोन्ही शब्द नामेच असतात.

4) हे शब्द बहुधा स्थळ/काळ/ रीतिवाचक असतात.

याचे खालील तीन गट पडतात.

अ) आ, यथा, प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द या प्रकारात मोडतात.

सामासिक शब्द – विग्रह

1) आजन्म – जन्मापासून (कालवाचक)

2) आमरण – मरेपर्यंत (कालवाचक)

3) यथाक्रम – क्रमाप्रमाणे (रीतिवाचक)

4) यथान्याय  – न्यायाप्रमाणे (रीतिवाचक)

आ) बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर यांसारखे फारशी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहेत.

1) दरसाल  – प्रत्येक वर्षी (कालवाचक)

2) हररोज  – प्रत्येक दिवशी (कालवाचक)

3) बिनधास्त – धास्तीशिवाय (रीतिवाचक )

4) बेशक – शंका न घेता / शंकेशिवाय (रीतिवाचक)

इ )मराठी भाषेतील द्विरुक्ती होऊन तयार झालेले क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातात, हीसुद्धा अव्ययी समासाची उदाहरणे आहेत.

1 ) घरोघरी – प्रत्येक घरी (स्थलवाचक)

2) वारंवार  – प्रत्येक वारी/दिवशी (कालवाचक)

3) पानोपानी – प्रत्येक पानात (स्थलवाचक)

अ) संकिर्ण अव्ययीभाव – दोन वेगवेगळ्या भाषेतील शब्द एक येऊन तयार झालेला सामासिक शब्द- दरदिवस, हरघडी

ब) यावनी अव्ययीभाव – यात फारशी/अरबी सामासिक शब्द – मोडतात – गैरकायदा, बरहुकूम, हरवक्त

 

2) तत्पुरूष समास (द्वितीय पद प्रधान) Tatpurush Samas 

1) या समासातील दुसरे पद प्रधान असून पहिला शब्द नाम किं विशेषण असतो आणि विग्रह करताना त्यास प्रथमा व संबोधन सोडून इतर सर्व विभक्ती प्रत्यय लागतात.

2) सामासिक शब्द तयार करताना मात्र असे प्रत्यय / शब्द कान टाकले जातात.

(3) समासाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंव विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो.

तत्पुरुष समासाचे खालील दोन गट पडतात.

 1) व्याधिकरण तत्पुरुष

2) समानाधिकरण तत्पुरुष

1) व्याधिकरण तत्पुरुष :

  •  तत्पुरुष समासातील शब्दांचा विग्रह करताना दोन्ही शब्द वेगवेगळ्या विभक्तीत येत असतील तर त्या विभक्ता तत्पुरुष समासाला व्याधिकरण तत्पुरुषसुद्धा म्हणतात. या प्रकारात विभक्ती तत्पुरुष, उपपद तत्पुरुष, व नत्र तत्पुरुष, अलुक तत्पुरुष येतात.

अ) विभक्ती तत्पुरुष :

  • ज्या तत्पुरुष समासात कोणत्यातरी विभक्तीचा किंवा विभ अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पर जोडली जातात, त्यास विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात.

आ) अलुक तत्पुरुष :

  •  तत्पुरुष समास तयार करताना पूर्व पदाचा विभक्ती प्रत्यय लोप करावा लागतो. परंतु ज्या तत्पुरुषात पूर्वपदाच्या सप्तमीच्या ‘ई’ विभक्तिप्रत्ययाचा लोप होत नाही, त्यास अनुक तत्पुरुष (अलुक- लोप न पावणारे) असे म्हणतात.

1) पंकेरुह (ए = अई)

2) कर्मणीप्रयोग (ई)

3) कर्तरीप्रयोग (ई)

4) तोंडी लावणे (मराठीतील उदाहरण)

(ई) 5) अग्रेसर (ए = अ ई)

6) युधिष्ठिर (युद्धात स्थिर)

इ ) उपपद तत्पुरुष / कृदंत तत्पुरुष :

  • ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद हे प्रधान असते व ते धातुसाधित / कूदंत असते व ते स्वतंत्रपणे क्रियापद म्हणून वाक्यात वापरता येत नाही, त्यास उपपद / कृदंत तत्पुरुष समास म्हणतात. शेवटी येणारा शब्द धातू प्रत्यय = धातुसाधित)

उदा :

नीरज -नीरात (पाण्यात) जन्मणारा

पंकज – पंकात (चिखलात) जन्मणारे

कुंभकार – कुंभ करणारा

शेतकरी- शेती करणारा

ई ) नत्र तत्पुरुष समास :

  •  ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद हे अ, अन् न, ना, बे, नि, गैर यांसारख्या अभाव किंवा निषेधदर्शक उपसर्गाने सुरू होते त्यास नत्र तत्पुरुष समास म्हणतात.

उदा :

नापसंत – पसंत नसलेला

अशक्य – शक्य नसलेला

बेकायदा – कायदेशीर नसलेले

निरोगी – रोग नसलेला

उ ) मध्यमपद लोपी समास :

  • ज्या कर्मधारय समासात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारा शब्द लुप्त असतो व विग्रहाच्या वेळी त्याची स्पष्टता करावी लागते त्यास मध्यमपद लोपी समास म्हणतात (खाद्यपदार्थ, नातेसंबंध)

उदा :

साखरभात – साखर घालून केलेला भात

पुरणपोळी –  पुरण घालून केलेली पोळी

नातजावई – नातीचा नवरा या नात्याने जावई

भोजनभाऊ – भोजनापुरता भाऊ

2) समानाधिकरण तत्पुरुष समास :

  •  विग्रह करताना दोन्ही पदे सारख्या विभक्तीत असतात. यामध्ये कर्मधारय व द्विगू समास मोडतात.

ऊ) कर्मधारय समास :

  •  या प्रकारातील सामासिक शब्दाचा विग्रह केल्यावर दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात. या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य किंवा विशेषण व विशेषण स्वरूपाचा असतो म्हणून सामासास कर्मधारय समास म्हणतात. शब्दांच्या स्वरूपावरून कर्मधारय समासाचे खालील प्रकार पडतात. द्विगु समास सुद्धा कर्मधारय समासाचाच उपप्रकार आहे.

 

 Samas in Marathi Grammar | समास व त्याचे प्रकार | मराठी व्याकरण 
Samas in Marathi Grammar | समास व त्याचे प्रकार | मराठी व्याकरण

 

3) द्वंद्व समास Dvandva Samas 

  •  ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्वा महत्त्वाची असतात व शक्यतो दोन्ही नामेच असतात. त्यास द्वंद्व समास म्हणतात.

द्वंद्व समासाचे खालील प्रकार पडतात.

अ) इतरेतर द्वंद्व समास :

  •  या सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि, व या समुच्चयबोधक उभयान्वयी अवयायांचा वापर करावा लागतो . यातील दोन्ही घटक महत्वाचे व आवश्यक असतात .

उदा :

बहीनभाऊ – बहीण व भाऊ

रामलक्ष्मण – राम व लक्ष्मण

विटीदांडू – विटी व दांडू

आ) वैकल्पिक द्वंद्व समास :

  • या सामासिक शब्दांचा विग्रह करताना अथवा, किंवा, वा या विकल्पदर्शक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो. हे शब्द शक्यतो विरुद्धार्थी शब्द असतात. दोन घटकांपैकी एकाची निवड केली जाते.

उदा :

पंधरासोळा – पंधरा किंवा सोळा

न्यायान्याय – न्याय किंवा अन्याय

मागेपुढे – मागे किंवा पुढे

छोट्यामोठ्या – छोट्या किंवा मोठ्या

इ) समाहार द्वंद्व समास :

  •  ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय तशाच प्रकारच्या आणखी काही घटकांचाही अंतर्भाव केलेला असतो, त्यास समाहार द्वंद्व समास म्हणतात. दोन वस्तूंचा उल्लेख असतो; परंतु तशा अनेक वस्तू आपोआपच जोडून येतात.

उदा :

बाजारहाट – बाजारहाट व तत्सम वस्तू

चहापाणी  – चहा, पाणी व इतर फराळाचे पदार्थ

मीठभाकर – मीठ, ‘भाकरी व इतर साधे खाद्यपदार्थ

 

 Samas in Marathi Grammar | समास व त्याचे प्रकार | मराठी व्याकरण 
 Samas in Marathi Grammar | समास व त्याचे प्रकार | मराठी व्याकरण 

 

4) बहुव्रीही समास | Bahuvrihi Samas 

  • ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे महत्वाची नसून, त्या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो, तसेच हा सामासिक या तिसऱ्या पदाचे विशेषण असतो, त्या सामासिक शब्दास ब समास म्हणतात. बहुव्रीहीचा अर्थ शेतकरी (धनधान्य असणारा) असा होतो. याचे खालील चार प्रकार पडतात. या समासात मोडणारे शब्द शक्यतो विशेषणे असतात.

(अ) विभक्ती बहुवीही

विभक्ती बहुवीही समासाचे खालील दोन प्रकार पडतात.

  1. समानाधिकरण  2)  व्याधिकरण

1) समानाधिकरण :

  • समानाधिकरण विग्रह करताना यातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात.

उदाहरणे :

लक्ष्मीकांत  – लक्ष्मी आहे कांता ज्याची तो   –  विष्णू (प्रथमा)

वक्रतुंड – वक्र आहे तुंड (तोंड) ज्याचे  –   तो गणपती (प्रथमा)

नीलकंठ -नीळा आहे कंठ ज्याचा तो   –  शंकर (प्रथमा)

2) व्याधिकरण :

  • व्याधिकरण विग्रह करताना दोन्ही पदे भिन्न विभक्तीत असतात.

उदाहरणे :

सुधाकर – सुधा आहे करात असा तो      –   चंद्र (प्रथमा-सप्तमी)

गजानन – गजाचे आहे आनन ज्याला तो   –   गणेश (षष्ठा-प्रथमा)

भालचंद्र – भाळी आहे चंद्र ज्याच्या तो    –   शंकर (सप्तमी-प्रथमा)

आ) नञ बहुव्रीही समास :

  • ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद अ, अन, न, नि असे नकारदर्शक असेल, त्यास नञ बहुव्रीही समास म्हणतात.

उदाहरणे :

अव्यय – नाही व्यय ज्याला ते

अनंत – नाही अंत ज्याला तो

नीरस – नाही रस ज्यात तो

 

इ ) सहबहुव्रीही समास :

  • ज्या  बहुव्रीही समासाचे पहिले पद ‘सह’ किंवा ‘स’अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाद्या विशेषणाचे कार्य करतो त्यास | सहबहुव्रीही समास म्हणतात. हा समास उपसर्गावरून लक्षात ठेवावा.

उदाहरणे :

सादर – आदराने सहित असा तो

सफल – फलाने सहित असे तें

ई) प्रादि बहुव्रीही समास :

  •  ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, सु, दुर, वि. अशा उपसर्गांनी युक्त असते त्यास प्रादिबहुव्रीही समास म्हणतात. हा समास उपसर्गावरून लक्षात ठेवावा.

उदाहरणे :

सुमंगल – पवित्र आहे असे ते

दुर्गुणी – गुणांपासून दूर असलेला

प्रबळ – अधिक बलवान असा तो

विख्यात – विशेष ख्याती असलेला तो

सुलोचन –  चांगले डोळे असलेला

समास व त्याचे प्रकार विडियो माध्यमातून 

Video credit : Sakal Marathi youtube channel

 

खालील माहितीसाठी हीच पोस्ट पुन्हा वाचा .

 Samas in Marathi Grammar | समास व त्याचे प्रकार | मराठी व्याकरण 
समासाचे प्रकार (Types Of Compound)
समास व त्याचे प्रकार – मराठी व्याकरण 
Samas In Marathi PDF Download | समास व त्याचे प्रकार ह्यांची …

 

आमचे इतर काही व्याकरण पोस्ट :

भाषा अलंकार व त्याचे प्रकार | Alankar in Marathi Grammar

विरुद्धार्थी शब्द मराठी । Opposite Words In Marathi

प्रयोग मराठी व्याकरण ,कर्तरी ,कर्मणी ,भावे

नाम म्हणजे काय ? नामाचे किती प्रकार आहेत ? 

वर्ण म्हणजे काय ? संधी म्हणजे काय ?

रसग्रहण म्हणजे काय ? What is the Rasagrahan

 


मित्रांनो या माहिती  मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद .

 

Leave a Comment