Abhinandan Patra Lekhan – अभिनंदन पत्र

Abhinandan Patra Lekhan – अभिनंदन पत्र

 

 

Abhinandan Patra Lekhan - अभिनंदन पत्र
Abhinandan Patra Lekhan – अभिनंदन पत्र

 

1 ) प्रश्न : संकटकाळी अतुलनीय धैर्य दाखवून राष्ट्रपती पारितोषिक मिळवलेल्या बालकाला अभिनंदनाचे पत्र पाठवा.

॥ श्री ॥

 

म. अ. ना.

१२१, सदाशिव पेठ,

पुणे.

१३-१०- ९४.

 

चिरंजीव पुष्कर,

अनेक आशीर्वाद.

तुझ्या अतुलनीय धैर्याच्या कामगिरीसाठी तुझे अभिनंदन ! आज वृत्तपत्राच्या पहिल्या पानावरच ही बातमी आलेली आहे. त्यात ‘पुष्कर शिंदे ने दोन बालकांचे प्राण वाचवले आणि हा पुष्कर शिंदे फक्त सहा वर्षांचा आहे, असा उल्लेख आहे. अरे, म्हणजे पुष्कर, तू एवढ्या लहान वयात एवढी मोठी कामगिरी कशी काय केलीस, याचेच आश्चर्य वाटते.

बातमीवरून पुढे कळले की, तू जन्मतः अंध आहेस. देवाने तुला दृष्टी दिली नाही, पण तुझ्या कर्णेद्रियांची शक्ती अतिशय तीव्र असावी. म्हणून विहिरीत पडलेल्या त्या छोट्या बाळांचा आवाज तुझ्या कानावर पडला असेल आणि इतर लोकांच्या लक्षात येण्याआधीच तू पाण्यात उडी घेतलीस.

कदाचित काही लोकांना असंही वाटलं असेल की तिसरा मुलगाही पडला की काय? पुष्कर खरोखरच तुला मनापासून शाबासकी हं! त्या वृत्तांतावरूनच कळले की, तुला उत्तम पोहता येते. तू दोन वर्षांचा झाल्याबरोबर तुझ्या बाबांनी तुला पोहायला शिकवले, पण या प्रसंगी तू दाखवलेले प्रसंगावधान मोठ्यांनाही स्तिमित करणारे आहे.

पुष्कर, तुझे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे. राष्ट्रपती पारितोषिकासाठी तू खरोखरच पात्र आहेस. त्याबद्दल तुझे पुन्हा एकदा अभिनंदन. यापुढेही तुझा असाच गौरव करण्याची वेळ वरचेवर यावी, हीच सदिच्छा व्यक्त करून हे पत्र पूर्ण करतो.

 

तुझा, म.

 

 

2 ) प्रश्न :  वृत्तपत्र पत्र प्रसिद्ध  करन्यासाठी अभिनंदन पत्र लिहा . 

 

अ. ब. क.

माध्य. विद्या. पिंपळेगुरव

पिंपरी, पुणे – ६१

८ सप्टेंबर, २०१२

मा. संपादक,

महाराष्ट्र टाइम्स,

पुणे कार्यालय

 

विषय : वृत्तपत्रातून पत्र प्रसिद्ध करणेबाबत

महोदय,

आज दिनांक ८ सप्टेंबर, १२ रोजी सुप्रसिद्ध गायिका श्रीमती आशा भोसले आपल्या वयाची ७९ वर्षे पूर्ण करून ८० व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हा सर्व विद्यार्थ्यांकडून शुभेच्छा देण्यासाठी, आम्ही एक पत्र लिहिले आहे. तुमच्या वृत्तपत्रातून तुम्ही आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात, ही नम्र विनंती.

आशाताईंची गाणी तर आम्ही रोजच ऐकतो; पण इयत्ता ८वीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातून आम्हाला त्यांची ‘विशेष’ ओळख झाली. आशाताईंचा सुरेल प्रवास, अडचणींवर हसत हसत मात करत पुढेच जाण्याची वृत्ती आम्हा विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी ठरली.

 

अधिक माहितीसाठी 

Abhinandan Patra Lekhan – अभिनंदन पत्र

Leave a Comment