Majhi Aai Nibandh । माझी आई निबंध मराठी

Majhi Aai Nibandh । माझी आई निबंध मराठी

Majhi Aai Nibandh । माझी आई निबंध मराठी
Majhi Aai Nibandh । माझी आई निबंध मराठी

 

“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी

आपण म्हणजेच प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आई आणि आईचे स्थान महत्त्वाचे असते जे शब्दांद्वारे सांगता येत नाही असे म्हटले जाते की देव प्रत्येकाबरोबर राहू शकत नाही, म्हणूनच त्याने आईची निर्मिती प्रत्येक घरात केली आहे. आई आपल्या जीवनात प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचे बारीक लक्ष ठेवून आपली काळजी घेणारी व्यक्ती असते. कोणत्याही व्क्तीगत फायदयाची जाणीव न ठेवता अहोरात आपल्या सेवेत आई सदैव असते .सकाळी ती खूप होताच प्रेमळपणे आम्हाला जागवते आणि रात्री ती गोड स्वप्नांसह कथा सांगते.

आमची आई आम्हाला शाळेसाठी तयार होण्यास मदत करते आणि आमच्यासाठी न्याहारी आणि दुपारचे जेवण देखील करते. ती दुपारी दाराजवळ उभी राहून आमच्या शाळेतून परत येण्याची वाट पाहत असते आणि आमच्या शाळेच्या गृहकार्यात (होमवर्क) मध्ये देखील मदत करते.

आई आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिकेचे काम करत असते आणि आणि आपल्या जीवनामध्ये असलेल्या इतर लोकांपैकी ती आपल्यासाठी खूप अनमोल असते. आईचा संपूर्ण दिवस आपली मदत आणि गरज पूर्ण करण्यामध्ये व्यतीत होतो निस्वार्थ आणि मोकळ्या मनाने ती आपल्यावर प्रेम आणि मदत करते आईच्या प्रेमाची तुलना केल्या जाऊ शकत नाही आई म्हणजे आपल्या सोबत रहात असलेले ईश्वरी रूप आहे या जगात आई सगळ्यांना त्यापेक्षा वेगळी असते सुखदुःखात आपल्या संरक्षणासाठी आई नेहमी तत्पर असते.

आई आपली प्रत्येक आवड-नावड याची जाण ठेवते. आपल्या विकास आणि प्रगतीसाठी आपल्याला प्रेरीत करते. आई आपली प्रथम गुरू असते जी आपल्याला आयुष्यात चालणे बोलणे संस्कार ह्या गोष्टी शिकवते आपल्याला योग्य आणि अयोग्य याची जाणीव करून देते आपल्या जीवनात योग्य शिस्त लावते देश समाज कुटुंब कर्तव्य आदर्श या गोष्टीचे महत्त्व समजावून सांगते.

या जगात जर देवाचे अस्तित्व बघायच असलं तर ते आपल्याला आपल्या आई मध्ये दिसते. दमल्यावर थकल्यावर आजारी असताना सुद्धा आई आपल्यासाठी नाश्ता जेवण पाण्याची बॉटल टिफिन ह्या सर्व गोष्टी तयार करून देते शाळेत सोडून सुद्धा देते.

दुपारचे सर्व काम आटपून झाल्यानंतर घड्याळाकडे बघत दरवाजाजवळ बसून घरी येण्याची वाट पाहते. आपल्यासाठी चमचमीत लज्जतदार मसाले दार चवदार जेवण बनवते. आपल्याला शाळेसाठी लागणाऱ्या प्रोजेक्ट आणि गृह पाठांमध्ये मदत करते. आईच्या प्रेमाची तुलना कधीच केली जाऊ शकत नाही. आपल्याला संस्कार आणि मूल्य क्षम बनण्यासाठी ऐतिहासिक गोष्टी सांगते आपल्या उज्वल भवितव्यासाठी नेहमी दक्ष असते.

आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये आनंदाचा वर्षाव सतत ओसंडून राहावा म्हणून कार्यक्षम असते आणि एवढं असतानासुद्धा कधीकधी आपण आईला दुःखी करतो परंतु तिच्या हसर्‍या चेहऱ्यामागे सुद्धा एक दुःख दडलेलं असतं जे आपल्याला समजत नाही म्हणून आपण प्रत्येकांनी आईची नेहमी काळजी घेतली पाहिजे.

आई ही ममता आणि वात्सल्याची मूर्ती आहे, मुलाचे पहिले जग आईचे स्वतःचे जग असते, त्याच्या मांडीवर बसून, जगाचे नवीन रंग त्यांना दिसतात.आपण कितीही मोठे आहोत हे महत्त्वाचे नाही, कारण आईसाठी मुले नेहमीच लहान असतात, ती आपली कायम चिंता करते आणि आम्हाला योग्य मार्ग दाखवते. आई प्रत्येक आनंदात आणि दु: खामध्ये आपल्याबरोबर असते, जेव्हा आपण आजारी असतो, तेव्हा ती आमच्यासाठी रात्रभर जागी राहून आणि आपल्या प्रकृतीसाठी देवाची प्रार्थना करते.

ती आमच्यासाठी सर्वकाही त्याग करते , आई भुकेलेली राहते पण आम्हाला जेवण देते , आईसारखा त्याग आणि प्रेम कोणीही करू शकत नाही. आई आपल्या प्रत्येक गोष्टीला समजते आपण तिला ती सांगो कि न सांगो ती आपल्या प्रत्येक आसुचे रडण्याचे कारण विचारते जर आपल्याला कोणती गोष्ट कठीण वाटत असली तर ती मार्गदर्शन करते आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ती आपल्या सोबत असते

माझी आई निबंध मराठी - Majhi Aai Nibandh
माझी आई निबंध मराठी – Majhi Aai Nibandh

 

आई साठी कविता । Aai poem in marathi 

 

करावे किती आई तुझे कौतुक
अपुरे पडती शब्द हे माझे 
नाही फेडू शकत
उपकार आई तुझे ।। 
अमृतासमान मला तू
पाजला ग पान्हा
जसे मांडीवर यशोदा आईच्या 
श्री कृष्ण बाळ तान्हा ।।
सर्व अवगुणांचा माझ्या
केलास आई तू विलय
होतात माझे सर्व गुन्हे माफ 
असे आई तुझे न्यायालय ।।
आई तुझ्या कुशीतली गाढ झोप 
संपूर्ण संसारात नाही
पुढचे सातही जन्म तुझ्या गर्भात मिळो
मी एवढीच वाट पाही ।। 
असे वाटते मजला
जगावे पुन्हा येऊनी तुझ्या मी पोटी 
तुझ्याविना सर्वच दुनिया
मला वाटे खोटी ।।
आई तूच माझ्या आयुष्याची 
बदललीस ग काया
साष्टांग नमन करुनी 
पडतो आई मी तुझ्या पाया ।।
प्रेम तुझे आहे आई
या सर्वांहून भारी
म्हणूनच म्हणतात 
स्वामी तिन्ही जगाचा
आई विना भिकारी ।।

 

 

  • majhi aai nibandh in marathi
  • majhi aai nibandh marathi
  • mazi aai nibandh in marathi
  • majhi aai essay in marathi
  • majhi aai nibandh marathi madhe

 

 

Video credit : Kids Knowledge Candy youtube chanel 

 

 अधिक निबंधासाठी येथे क्लिक करा  

 


 

मित्रांनो या निबंधामध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो

 

धन्यवाद 

1 thought on “Majhi Aai Nibandh । माझी आई निबंध मराठी”

Leave a Comment