Appreciation Of Poem In Marathi । कवितेचे कौतुक किंवा कवितेची कृती

Appreciation Of Poem In Marathi । कवितेचे कौतुक किंवा कवितेची कृती

 

Appreciation Of Poem In Marathi
Appreciation Of Poem In Marathi

 

Appreciation म्हणजे काय ?

 

Appreciation of poem म्हणजे कवितेचा अभ्यास करून त्या कवितेची “कौतुक करणे” . व त्या कवितेची “कृती सांगणे”. यासाठी तुम्हाला ती कविता समाजुन घेणे महत्वाचे असते .

 

Appreciation Of Poem In Marathi । कवितेचे कौतुक करणे म्हणजे काय ?

 

कविता ही माणसाच्या कल्पनेची सर्जनशीलता असते. इतर साहित्यकृतींप्रमाणे ते समजून घेणे, कौतुक करणे आवश्यक आहे. कवी एका कारणासाठी लिहितो. त्याचा उद्देश भावना जागृत करणे, माहिती देणे, परिभाषित करणे आणि जग किंवा जीवनाचे काहीतरी प्रतिनिधित्व करणे असू शकते. काहीही असो, कविता तिच्या लेखकासाठी अद्वितीय असते. आणि प्रत्येक कवितेचे कौतुक करण्यासाठी विश्लेषण केले जाऊ शकते.

 

Poem Appreciation In Marathi

 

कवितेची टीकात्मक प्रशंसा ही विवेकपूर्ण दृष्टीकोनातून साहित्यिक कार्याचे मूल्यांकन, आकलन आणि व्याख्या करण्याची प्रक्रिया आहे. टीकात्मक वाचन किंवा प्रशंसामध्ये शब्दांचा अर्थ, यमक योजना, वक्ता, भाषणाच्या आकृत्या, इतर कामांचे संदर्भ (इंटरटेक्स्ट्युअलिटी ), भाषेची शैली, कवीची सामान्य लेखन शैली (उल्लेख असल्यास), शैली, संदर्भ, स्पीकरचा टोन आणि इतर घटक. तुम्ही कवितेवर टीका करत आहात असा त्याचा अर्थ नाही. एक गंभीर मूल्यांकन श्लोकाच्या आकलनात मदत करते.

प्रबंध ही कवितेची मुख्य कल्पना आहे. सुरुवातीला, प्रत्येक कलेचा एक मूलभूत विषय किंवा कल्पना असते आणि कविता अनेक वेळा वाचल्याने तुम्हाला ती शोधण्यात मदत होऊ शकते.

दृष्टीकोन चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी लेखकाचे जीवन आणि पार्श्वभूमी सखोल समजून घेणे आवश्यक आहे. वक्ता काय व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे हे समजून घेण्यासाठी कविता अनेक वेळा वाचा. थिसॉरसमध्ये, कठीण किंवा विषम शब्दांच्या व्याख्या पहा. कवितेचे शीर्षक संबोधित केलेल्या कल्पनांचा एकूण अर्थ आणि सारांश यासाठी मार्गदर्शक म्हणून काम करते.

 

Format of appreciation of poem in marathi । मराठीतील कवितेचे कौतुकाचे स्वरूप

 

(१) प्रस्तुत कवितेचे कवी 

(२) प्रस्तुत कवितेचा विषय

(३) प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ 

(४) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश

(५) प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये

(६) प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार

(७) कवितेतील ओळीचा सरळ अर्थ 

(८) प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे 

 

Marathi Appreciation of poem Std 10 

पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा :

महत्त्वाची नोंद : परीक्षेत आठपैकी कोणत्याही कृती विचारल्या जाणार आहेत. तथापि विदयार्थ्यांना सर्व कृर्तीचा सराव मिळावा म्हणून इथे सर्व कृती उत्तरांसह सोडवून दाखवल्या आहेत.

आशयावर आधारलेल्या प्रत्येकी गुणांच्या कृतींची उत्तरे येथे नमुन्यादाखल दिलेली आहेत. ही उत्तरे विद्यार्थी स्वतःच्या मतानुसार व स्वत:च्या शब्दांत लिहू शकतात.

 

Appreciation Of Poem In Marathi
Appreciation Of Poem In Marathi

 

How To Write Appreciaation of Poem In Marathi 

 

उदाहरणे  ( मदतीसाठी )

१  ) कविता- वस्तू

(१) प्रस्तुत कवितेचे कवी :  द. भा. प्रामणस्कर.

(२) प्रस्तुत कवितेचा विषय : निर्जीव वस्तूंचा सजीवपणा.

(३) प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ :

(i) स्नेह प्रेम (i) हक्क अधिकार (iii) मन चित्त (iv) सेवक = चाकर (v) काळ = समय (vi) आयुष्य जीवन (vii) घर सदन,

(४) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश :  वस्तूंशी माणसाने प्रेमानेच वागले पाहिजे. आपण वापरलेल्या वस्तूंच्या रूपाने आपले अस्तित्व मागे शिल्लक राहते. वस्तूंचा उपयोग संपला की वस्तूंना टाकून देऊ नये, त्यांना टाकून देणे म्हणजे आपले अस्तित्व आपण स्वतः संपवून टाकणे. हे टाळण्यासाठी आपण वस्तूंशी स्नेहाने, संवेदनशीलतेने वागले पाहिजे.

(५) प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये :  या कवितेची रचना मुक्तछंदातील आहे. मुक्तछंदामुळे लेखनशैली मुक्त राहते. शब्द निवडण्यावर कोणतीही बंधने येत नाहीत. त्यामुळे दैनंदिन व्यवहारातील भाषा सहजगत्या वापरता येते. या कवितेत तसेच घडले आहे. दैनंदिन व्यवहारातील भाषेमुळे या कवितेचा वाचकांशी सहजसंवाद घडतो. साध्या पण आवाहक शब्दांतून मोठे तत्त्व येथे व्यक्त होते. अत्यंत हळुवार, संवेदनशील भावना कवी नेहमीच्याच साध्या शब्दांतून व्यक्त करतात.

(६) प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार :  निर्जीव वस्तूंना आपण मत नसते असे म्हणतो. कवींच्या मते, त्यांना मन असते, भावना असते. त्या संवेदनशीलही असतात. त्यांच्या दर्शनाने त्या वापरणान्याचे व्यक्तिमत्त्व लक्षात येते. म्हणून माणसाने वस्तूंशी प्रेमाने, आत्मीयतेने वागले पाहिजे. आपण माणसांशी वागतो, तसेच

वस्तूंशी वागले पाहिजे, असा महत्त्वाचा विचार या कवितेतून मोडला आहे.

(७) कवितेतील ओळीचा सरळ अर्थ :

वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. उत्तर : कवी म्हणतात – वस्तूंना जीव असतो, मन असते. म्हणून त्यांना जपणे गरजेचे आहे. त्यापुढे त्यांचे आपण लाडही करावेत; कारण पुढच्या काळात आपल्यातले प्रेम त्याच कायम जिवंत ठेवणार आहेत.

(८) प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे :

ही कविता सुंदर आहे. आधुनिक जगात वावरणाऱ्या कोणालाही ही कविता आवडेल अशी आहे. एक वेगळाच चाकोरीबाहेरचा विचार कवींनी या कवितेतून मांडला आहे. सहसा आपण वस्तू आणि ती वापरणारा माणूस यांना वेगळे वेगळे मानतो. वापरकर्त्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वस्तूचे स्वरूप घडते. म्हणजे वस्तूवरून वापरकर्त्याचे मन कळते. आपण वस्तूशी प्रेमाने वागतो. म्हणजे स्वतःशीच प्रेमाने वागत असतो, असा वेगळा नावीन्यपूर्ण भाव या कवितेतून व्यक्त होतो. म्हणून ही कविता मला आवडते .

 

२ ) कविता आश्वासक चित्र.

(१) प्रस्तुत कवितेच्या कवयित्री :  नीरजा.

(२) प्रस्तुत कवितेचा विषय : स्त्री-पुरुष समानता.

(३) प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ :

(i) हात – हस्त (ii) कसब (iii) आभाळ – आकाश (iv) आश्चर्य नवल.

(४) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश : आजपर्यंत आपण स्त्रियांना दुय्यम मानून बागत आलो. हे आता खूप झाले. आता है थांबले पाहिजे. येणारा काळ हा स्त्री-पुरुष समानतेचा काळ आहे. त्या काळाला साजेसे जीवन जगण्यासाठी आपल्याला आता स्त्री- पुरुष समानतेचे तत्त्व अंगीकारावे लागणार आहे.

(५) प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्टये : ही मुक्तछंदातली कविता आहे. मुक्तछंदामुळे दैनंदिन व्यवहारातली भाषा कवितेत वापरली गेली आहे. साध्या विधानांतून कवयित्री खोलवरचे विचार मांडतात. लहान मुलांच्या खेळाचे चित्रण हे या कवितेतील सुंदर प्रतीक आहे. या प्रतीकातून आधुनिक जगातील स्त्री-पुरुष समानता हा फार मोठा विचार अगदी सहजपणे व्यक्त होतो. ‘हातात हात असेल’ या वाक्यखंडातून कवितेतील मुलगा व मुलगी यांच्या भावी आयुष्यातील सामंजस्य प्रत्ययकारकतेने प्रकट होते.

(६) प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार : अजूनही समाजाने पूर्णपणे स्त्री-पुरुष समानता अंगीकारलेली नाही. निराशाजनक आहे. परंतु भावी काळ हा स्त्री-पुरुष समानतेचाच असणार आहे. म्हणून सर्वांनी स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व आतापासूनच मान्य करून ते अंगीकारले पाहिजे, असा विचार या कविते मांडला आहे.

(७) कवितेतील ओळीचा सरळ अर्थ :

हळूहळू शिकेल तोही

आपले कसब दाखवतानाच घर सांभाळणं

तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून.

उत्तर : तापलेल्या उन्हात सावलीच्या आडोशाला बसून तो मुलगा आपले कौशल्य दाखवता दाखवता घर सांभाळणेही हळूहळू शिकेल. हळूहळू पुरुष संसारातील घरगुती कामेही करतील, असा आशय व्यक्त होतो.

(८) प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे :

ही कविता मला खूप आवडली आहे. ही आजची, आमच्या पिढीची कविता आहे. आमच्या मनातला भाव, आमचे विचार या कवितेतून व्यक्त होतात. आम्ही आपापसात वागतो, तेव्हा मुलगा-मुलगी असा भेदच आमच्या मनात नसतो. श्रेष्ठ-कनिष्ठभाव न बाळगता आम्ही वावरत असतो. आमच्या मनातला हा भावच ही कविता व्यक्त करते.

 

Appreciation Of Poem Marathi in video । कवितेचे कौतुक किंवा कवितेची कृती विडियो माध्यमातून 

Video credit : Giri Tutorials Youtube channel 

 

खालील माहितीसाठी हीच पोस्ट पुन्हा वाचा . 

Marathi Appreciation of poem 10 th class
Std 10 Marathi poem Appreciation
poem Appreciation in marathi
Appreciation Of Poem In Marathi
Appreciation of poem 10 th standard pdf

 

आमच्या आणखी काही पोस्ट : 

 

Omnivores Meaning In Marathi। सर्वभक्षी म्हणजे काय ?

Spam Meaning In Marathi । स्पॅम म्हणजे काय ?

Crush Meaning In Marathi । क्रश म्‍हणजे काय ?

बीसीए म्हणजे काय ?। BCA Full Form In Marathi

Debug Meaning in Marathi । डीबग म्हणजे काय ?

Parenting Tips In Marathi । पालकत्वाच्या टिप्स मराठीत

 


 

मित्रांनो या माहिती  मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद .

 

 

Leave a Comment