बाप कविता ।Bap Kavita in Marathi। बाबा कविता

बाप कविता ।Bap Kavita in Marathi। बाबा कविता

 

बाप कविता ।Bap Kavita in Marathi। बाबा कविता
बाप कविता ।Bap Kavita in Marathi। बाबा कविता

 

बाप कविता मराठी 

 

आईचं गुणगान खूप झाले,

बिचाऱ्या बापाने काय केले.

बिकट प्रसंगी बापच सदा सोडवी,

आपण फक्त गातो आईचीच गोडवी.

आईकडे असतील अश्रूंचे पाट,

तर बाप म्हणजे संयमाचा घाट.

आठवते जेवण करणारी प्रेमळ आई.

त्या शिदोरीची सोय ही बापच पाही,

देवकी – यशोदेचं प्रेम मनात साठवा,

टोपलीतून बाळास नेणारा वासुदेवही आठवा.

रामासाठी कौशल्येची झाली असेल कसरत,

पुत्र वियोगाने मरण पावला बाप दशरथ.

काटकसर करुन मुलास देतो पॉकेटमनी,

आपण मात्र वापरी शर्ट-पँट जुनी मुलीला हवे ब्युटीपार्लर,

नवी साडी, घरी बाप आटपतो बिन साबणाची दाढी.

वयात आल्यावर मुले आपल्याच विश्वात मग्न,

बापाला दिसे मुलांचे शिक्षण, पोरीचे लग्न.

मुलाच्या नोकरीसाठी जिना चढून लागते धाप,

आठवा मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप,

जीवनभर मुलांच्या पाठी बापाच्या सदिच्छा.

त्यांनी समजून घ्यावं हीच माफक इच्छा.

 

बाप कविता ।Bap Kavita in Marathi। बाबा कविता
बाप कविता ।Bap Kavita in Marathi। बाबा कविता

 

बाबा म्हणजे काय ? कविता 

 

बाबा म्हणजे… 

स्तंभ, प्रत्येक वादळात काही न बोलता खंबीर पणे उभा राहणारा,

ढाल, आपल्या परिवारावर आलेलं प्रत्येक संकटाला एकटा सामोर जाणारा,

ती व्यक्ती जो आपल्या परिवाराला खुश ठेवण्यासाठी काहीही करू शकते,

आपल्या मुलांच्या लग्नासाठी चपला झिवणारा,

डोळ्यातील अश्रू हळूच पुसून चेहऱ्यावर हास्य आणणारा,

स्वतःसाठी कधी एकही रुपया खर्च न करता पण

आपल्या मुलांसाठी पाहिजे ते घेऊन येणारा ..

पण या वादाला कधी दिसनका कारण

आयुष्यात सगळं काही मिळेल पण या बाबाला कधी विसरू नका कारण

त्याची जागा दुसरं कोणीच नाही घेऊ शकत ..

 

बाप कविता ।Bap Kavita in Marathi। बाबा कविता
बाबा म्हणजे काय ? कविता  बाबा कविता

बाप कुठं काय करतो कविता 

 

तो तर काय घराबाहेरच असतो.
सकाळी निघतो, धक्के खात कामावर जातो,

संध्याकाळी थकून घरी येतो.

घरी आल्या आल्या तक्रारी ऐकतो… इतकंच?

यात काय विशेष? बाप कुठे काय करतो?

शाळेची फिस, घरचा महिन्याचा किराणा, लाईटबिल, फोनबील….

सगळं मॅनेज करतो. महिनाअखेरीस पाय ओढत घराकडे येतो.

घर चालवण्यासाठी वेळप्रसंगी उधारी करतो, ती कशीतरी फेडतो…

पण बाप कुठे काय करतो?

मुलांच्या दुखण्याखुपण्यावर अस्वस्थ होतो.

कुशीत घेऊन झोपत नसेल कदाचित, पण रात्रभर तो ही जागा राहतो.

म्हाताऱ्यांची आजारपणे, हॉस्पिटलचा खर्च सगळ्यांची तरतूद करतो.

स्वतःची दुखणी मात्र अंगावरच काढतो.

पण त्याला कोण विचारतो? कारण असंही बाप कुठे काय करतो?

कुटुंबासाठी लढतो, कधी जिंकतो कधी हारतो.

लढाईत झालेल्या जखमांना अलगद लपवतो. कुटुंबासमोर हसतो.

पुरुष आहे ना तो? त्याला रडण्याची परवानगी कुठे?

सर्व प्रसंग आनंदाने साजरे करून तो मात्र मनातच कुढतो.

छया राव… बाप कुठे काय करतो?

( सगळ्या बाबांना सर्मपित )

 

Video credit : m4marathi Youtube Channal 

 

  • बाप कविता मराठी 
  • बाप कुठं काय करतो कविता 
  • बाबा म्हणजे काय ? कविता 
  • बाबा कविता
  • बाप कविता ।Bap Kavita

 

अधिक माहितीसाठी ..

 


 

 

मित्रांनो या कविता मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद

1 thought on “बाप कविता ।Bap Kavita in Marathi। बाबा कविता”

Leave a Comment