निबंध लेखन कसे करावे ?। Nibandh Lekhan Kase Karave ?

निबंध लेखन कसे करावे ?। Nibandh Lekhan Kase Karave ?

 

निबंध लेखन कसे करावे ? 
निबंध लेखन कसे करावे ? 

 

स्वविचारांचे प्रकटीकरण ही क्षमता/हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी निबंध लेखन या घटकाचा अभ्यास आवश्यक असतो. निबंध लेखन म्हणजे विचारांची विषयानुरूप केलेली मुद्देसूद मांडणी.

यावर्षी आपण प्रसंगलेखन, आत्मकथन आणि वैचारिक या निबंध लेखन प्रकारांचा अभ्यास करणार आहोत.

 

प्रसंगलेखन / अनुभवलेखन :

पाहिलेल्या एखादया दृश्याचे, व्यक्तीचे किंवा प्रसंगाचे चित्र हुबेहूब शब्दांत रेखाटणे यालाच वर्णनात्मक निबंध म्हणतात. निरीक्षणशक्ती व लेखनशैलीच्या विकासासाठी प्रसंगलेखन/अनुभवलेखन हा घटक महत्त्वाचा आहे.

प्रसंगलेखन लेखन करताना लक्षात घ्यायचे मुद्दे :

 

(१) प्रसंग लेखन करताना घटनांचा तार्किक विचार करावा.

(२) भाषा प्रभावी व चित्रदर्शी (हुबेहूब ) वर्णन करणारी असावी.

(३) भाषा सोपी असावी. खूप आलंकारिक नसावी. (४) लेखन प्रसंगानुरूप, संवेदनशील असावे.

नमुना कृती :

‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.

 

निबंध लेखन कसे करावे ? 
निबंध लेखन कसे करावे ?

 

आत्मकथन लेखन  : 

आत्मकथन कसे लिहावे ?

आत्मकथन करताना लक्षात घ्यायचे मुद्दे :

(१) सजीव आणि निर्जीव घटकांबाबत सर्वसमावेशक विचार करणे.

(२) त्यांच्या भावना, सुखदुःख, सवयी, उपयोग, कार्य यांचा शोध निरीक्षणशक्तीने घेणे.

(३) आपण स्वतः ती वस्तू आहोत अशी कल्पना करणे.

(४) कल्पनाशक्तीच्या माध्यमातून नाट्यपूर्ण रीतीने कल्पना मांडणे.

(५) संपूर्ण लेखन प्रथमपुरुषी एकवचनी भाषेत करणे.

 

नमुना कृती : 

खालील मुद्द्यांच्या आधारे ‘आरसा’ या घटकाचे आत्मवृत्त लिहा.

आत्मकथन कसे लिहावे ?
आत्मकथन कसे लिहावे ?

 

वैचारिक लेखन : 

आपल्या विचयाराला जे चलन देते , आपली विचार शक्ति जी जागृत करते असे लेखन म्हणजे वैचारिक लेखन होय . आणि या वैचारिक लेखनाच्या संदर्भात इयत्ता 10 वी च्या दृष्टिकोनातून हा अत्यत महत्वाचा भाग आहे . इयत्ता 10 वी ला हा प्रश्न 5 गुण साठी पडू शकतो .

वैचारिक लेखन कसे करावे ? 

वैचारिक लेखनाचा प्रश्न हा चित्रांचा माध्यमातून विचयरले जातात त्यामुळे ते नीट बगुण त्यातील घटक समजून त्याचा अभ्यास करून प्रश्न नीट सोडवावा . वैचारिक लिखाणात मुक्तपणे लेखन करावे पान मुक्तपणे लेखन करत असताना आपल्याला दिल्या असलेल्या चित्रात जे घटक दिले आहेत त्याचा वापर करून लेखन करावे .

वैचारिक लेखनात 120 ते 150 शब्दांची साधारण मर्यादा असते .  तसेच आपण जे लेखन कार्यटणी जे मुद्दे मांडणार आहोत ते शुद्ध व सु-संगत पध्दतीने असावे . लेखन करीत असताना तुम्ही सुविचार किंव्हा म्हणी चा वापर करू शकता . आपली भाषा शैली चांगली ठेवा आणि लेखनात विचयारांची मांडणी व्यवस्थित करावी .

 

 

Video credit : SACHIN ARUN JOSHI Youtube channal 

 

खालील माहितीसाठी हीच पोस्ट पुन्हा वाचा . 

निबंध लेखन कसे करावे ? 
आत्मकथन कसे लिहावे ?
वैचारिक लेखन कसे करावे ? 

 

आमच्या आणखी काही पोस्ट : 

Omnivores Meaning In Marathi। सर्वभक्षी म्हणजे काय ?

Spam Meaning In Marathi । स्पॅम म्हणजे काय ?

Crush Meaning In Marathi । क्रश म्‍हणजे काय ?

बीसीए म्हणजे काय ?। BCA Full Form In Marathi

Debug Meaning in Marathi । डीबग म्हणजे काय ?

Parenting Tips In Marathi । पालकत्वाच्या टिप्स मराठीत

 


 

 

मित्रांनो या माहिती  मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद

Leave a Comment