एकविसाव्या शतकातील भारत मराठी निबंध। Ekavisavya Shatkatil Bharat Essay In Marathi  

एकविसाव्या शतकातील भारत मराठी निबंध। Ekavisavya Shatkatil Bharat Essay In Marathi 

 

एकविसाव्या शतकातील भारत मराठी निबंध। Ekavisavya Shatkatil Bharat Essay In Marathi  
एकविसाव्या शतकातील भारत मराठी निबंध। Ekavisavya Shatkatil Bharat Essay In Marathi

 

मित्रानो , या पोस्ट मध्ये एकविसाव्या शतकातील भारत मराठी निबंध लेखन / Ekavisavya Shatkatil Bharat Essay In Marathi   100 ते 400 शब्दात निबंध लेखन करणार आहोत . हा निबंध 7 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्याना परीक्षेत वर्णनात्मक निबंध म्हणून विचयाराला जातो त्यामुळे निबंध नीट वाचा.  आज आपण  Ekavisavya Shatkatil Bharat Essay In Marathi  या विषयावर निबंध बघणार आहोत.

‘२१ वे शतक ?” खरं तर एवढ्यातच हा निबंध पूर्ण होतो. ह्या प्रश्नचिन्हातच ह्या निबंधाची सुरुवात व शेवट दडलेला आहे. नुकतेच २१ वे शतक सुरू झाले, नाही का? जसं दर वाढदिवसाच्या दिवशी, आपण एक वर्षाने मोठे होतो तसं एकदम शंभर वर्षांनी मोठं झाल्यासारखं वाटू लागलंय.

खरंच, जम विविध जागतिक घटनांनी खच्चून भरलंय. २० वं शतक, विज्ञान, तंत्रज्ञान या माध्यमांतून मानवाची भौतिक प्रगती साधणारं होतं, इराण- झाकच्या युद्धाचं होतं. दुसऱ्या महायुद्धातील आण्विक संहाराचं होतं. भारताच्या स्वातंत्र्याचं होत. एकीकडे वैज्ञानिक संस्कृतीच्या रोपणाचं तर दुसरीकडे माणुसकीच्या हासाचं होतं.

आता २१ वे शतक आपल्याला कोठे नेईल ? या शतकाला सामोरे जाताना ‘अनेक भीषण प्रश्न ‘आ’ वासून उभे आहेत. प्रत्येक सामान्य माणसाकडे कालनिर्णयासारखे संगणक असतील मग प्रश्नच राहणार नाहीत का?

छे! ह्या गोड गैरसमजात राहण्याचे हे दिवसच नाहीत. सर्वात भीषण समस्या आहे ती ‘लोकसंख्या विस्फोटाची’ आज पृथ्वीची लोकसंख्या पाच अब्ज आहे. ती होण्यास तिला पाच अब्ज वर्षे लागली, त्यातली एक अब्ज एकट्या भारताची! पुढील दहा वर्षांत… हीच दहा अब्जांवर जाईल. वृक्षतोड, कमी पर्जन्य, निकल जमीन, पशुहत्या ह्याने आधीच बेजार, निरुत्तर झालेल्या मानवाची कल्पनाच करवत नाही. माणसाला पुरेसे अन्नधान्य ही धरित्री देऊ शकेल ?

दुसरा प्रश्न आहे वैज्ञानिक प्रगतीचा विज्ञानाने मानवाला वरदान दिलेय की शाप? अणुबाँबचा शोध लावून सर्व जगाच्या डोक्यावर एक टांगती तलवारच लटकतेय…. क्षेपणास्त्रांच्या बळावर काही राष्ट्रे पुन्हा साम्राज्यवादाकडे झुकू लागली आहेत, त्यामुळे राजकीय नकाशातही मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. समाज विघटनाची प्रक्रिया जोरात सुरू होईल. दुर्दैवाने अराजकी हुकुमशाहीचा
राजकीय क्षितीजावर उदय होईल.

२१ वे शतक भाईचे युग असेल, क्षणाक्षणाला महत्त्व असेल. आजच आपण बघतो शहरातून ठिकठिकाणी ‘फास्ट फूड’ चे स्टॉल्स दिसतात. पुढे तर न्युट्रिशन पावडर, टॅबलेटसही मार्केटमध्ये उपलब्ध झाल्या असतील आणि ‘पंगत’ हा विषय तर कालबाह्य झाला असेल.

साक्षरतेचे महत्त्व जाणून शासन त्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे २१ व्या शतकात – अशिक्षित माणूस दाखवा, एक कोटी रुपये मिळवा! अशा घोषणाही शासन ‘देऊ लागेल. या शतकात सारी भौतिक सुखे मानवापुढे हात जोडून उभी असणार आहेत. संगणक साधीला आहेच पण यंत्रमानवही अल्लाउद्दीनच्या दिव्याप्रमाणे “काय हुकूम आहे मालक ?’ म्हणत चुटकीसरशी काम करणार आहे.

हवा, जल, भूमी, ध्वनी प्रदूषणाबरोबरच मानसिक व सामाजिक प्रदूषणही फोफावत असेल, त्यासाठी ताजमहाल, कुतुबमिनार, कोणार्क सुवर्णमंदिर यांपासून १,००० कि.मी. अंतरापर्यंत कारखान्यांच्या स्थापनेस बंदी असेल. ठिकठिकाणी दिसणाऱ्या एस.टी.डी. बूथची जागा ‘ऑक्सिजन बूथ ने घेतली असेल. आत्ताच मुंबईत असा एक ‘ऑक्सिजन बूथ’ सुरू झाला असून तेथे वीस मिनिटे श्वासोच्छ्वासासाठी दोनशे रुपये द्यावे लागतात.

लहान मुलांना ये रे ये रे पावसा म्हणावं लागणारच नाही, कारण कृत्रिम पाऊसच त्यांना माहिती असणार. गडद निळे, गडद निळे जलद भरून आले ह्याचा अर्थच त्यांना कळणार नाही.

 

एकविसाव्या शतकातील भारत मराठी निबंध। Ekavisavya Shatkatil Bharat Essay In Marathi
एकविसाव्या शतकातील भारत मराठी निबंध। Ekavisavya Shatkatil Bharat Essay In Marathi

 

वैद्यकीय क्षेत्रातही प्रगती झाली असेल. ‘एडस्चा विषाणू, देवी, पोलिओ यांच्या सूक्ष्मजीवासारखा प्रयोगशाळेत जतन करून ठेवला असेल व एड्सवरील उपचार शोधला गेला असेल. त्याचबरोबर इतरही नवीन रोगांनी डोकी वर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जीवाश्म इंधनाचा साठा संपुष्टात आल्याने सौरऊर्जा, पवनऊर्जा, भरती ऊर्जा अशा अपारंपारिक ऊर्जासाधनांना महत्त्व प्राप्त झाले असेल.

अवकाशातील चंद, इतर ग्रह, अवकाशयाने, कृत्रिम उपग्रह, अवकाशस्थानके माणसांनी फुलून जातील व त्यांच्यावरील ‘हक्कांसाठी’ युद्धेही उद्भवतील. मंगळ, बुधावरच्या रॉयल्टीसाठी रस्सीखेच सुरू होईल. दिवाळीच्या सुट्टीत मुले चंद्रावर जाण्याचाही बेत आखतील. भारताचे पंतप्रधान कोजागिरी चंद्रावर साजरी करतील

व त्याचे थेट प्रक्षेपण इंटरनेटवर उपलब्ध होईल.. तसेच रेडिओ तंत्रज्ञान इतके प्रगत झाले असेल की, पंधरा ते वीस प्रकाशवर्ष

अंतरापर्यंतच्या ताऱ्यांचा वेध घेता येऊ शकेल व विश्वाचा शोध घेण्याच्या मोहिमेत भारत आघाडीवर राहील.

‘एकविसाव्या शतकातील ‘हॅलो’, ‘हाय’, ‘बाय’, अशा पाश्चात्य संस्कृतीत भारत आपला सांस्कृतिक ठसा टिकवू शकेल काय? हाही एक प्रश्नव आहे.. पण एवढं नक्की की, जग जवळ येऊनही माणूस एकाकी होईल.

कुटुंबवत्सलता, भावनिक नातेसंबंध, सहृदयता हे शब्द ‘लॉक’ केले जातील. आत्मकेंद्री माणसाकडे व्यवहारिकता व तांत्रिकता शिल्लक राहतील… भावना नव्हेत ! म्हणूनच वाटते हे शतक संगणकाचेही नाही, जैवतंत्रज्ञानाचेही नाही तर

पर्यावरण संवर्धन व रक्षणाचे असावे. आरोग्य, आर्थिक, सामाजिक न्याय व राष्ट्रीय सुरक्षितता ह्यांचे असावे. गेल्या शतकात विज्ञानाच्या साहाय्याने मानवाने वसुंधरेचा चेहरामोहराच झपाट्याने विकृत केलाय. तो तिला परत द्यायचाय ह्या शतकात.

तम साराया दूर आजचा सूर्य उद्याचा उजळू

आभाळाच्या इंद्रधनुशी खुशाल फुगडी खेळू

माणुसकीचे बीज तरीही अखंड पेरत जाऊ

संगणकाच्या नव पर्वाचे गाणे नवीन गाऊ ||

 

एकविसाव्या शतकातील भारत निबंध विडियो माध्यमातून 

video credit : kashti Chandrapur youtube channel

 

वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता

एकविसाव्या शतकातील भारत निबंध। Ekavisavya Shatkatil Bharat Essay 
२१ व्या शतकातील भारत आणि झुंडशाहीच्या दिशेने जाणारी युवकांची मानसिकता.
21 व्या शतकातील देशासमोरील आव्हाने,उपाय निबंध
एकविसाव्या शतकातील भारत उन्माद आणि आव्हाने

एकविसाव्या शतकातील भारत मराठी निबंध

 

 

आमच्या इतर निबंध पोस्ट :

गुरु शिष्य परंपरा निबंध । Guru Shishya Paranpara Essay 

व्यवसाय शिक्षण काळाची गरज निबंध

माझा आदर्श समाजसुधारक। डॉ. विकास आमटे निबंध

मराठी भाषेची कैफियत निबंध । Marathi Bhashechi Kaifiyat Essay  

माझी आजी निबंध मराठी । Majhi Aaji Nibandh In Marathi

 

 

टीप :

1 ) गुरु शिष्य परंपरा निबंध हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0 वी व ११ वी १२ वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 


 

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद.

Leave a Comment