Kusumagraj Kavita। कुसुमाग्रज कविता । Marathi Kavita Kusumagraj

Kusumagraj Kavita। कुसुमाग्रज कविता । Marathi Kavita Kusumagraj

 

Kusumagraj Kavita। कुसुमाग्रज कविता । Marathi Kavita Kusumagraj
Kusumagraj Kavita। कुसुमाग्रज कविता । Marathi Kavita Kusumagraj

 

विष्णू वामन शिरवाडकर हे “कुसुमाग्रज” या त्यांच्या पेन नावाने लोकप्रिय आहेत. ते एक प्रख्यात कवी, नाटककार, कादंबरीकार, लघुकथेचे लेखक होते. त्याच बरोबर मानवतावादी होते. स्वातंत्र्य, न्याय आणि वंचितांच्या मुक्तीचे लिखाण करणारे होते.

कुसुमाग्रज यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ साली नाशिक (nasik) येथे झाला. कुसुमाग्रज यांचे मूळ विष्णू वामन शिरवाडकर हे आपण सगळेच जाणतो. पण कुसुमाग्रजांचे खरे नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर (Gajanan Rangnath Shirwadkar). त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्यामुळे त्यांचे नाव हे बदलून विष्णू वामन शिरवाडकर असे करण्यात आले.

मित्रानो मी तुमच्या साठी अनेक माध्यमातून शोधून आणल्या आहेत Kusumagraj यांच्या  Kavita . तुम्हाला त्या नक्की आवडती Marathi Kavita Kusumagraj

 

कुसुमाग्रज यांच्या 10 सुंदर कविता। Kusumagraj Kavita

 

कणा कविता। Kana Poem

‘ओळखलत का सर मला’ पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी.
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून;
‘गंगामाई’ पाहुणी आली, गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी-बायको मात्र वाचली
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले
कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे. चिखलगाळ काढतो आहे’
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा.’

            – कुसुमाग्रज

Video credit : Quality Time with Prasad Youtube channal

माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा

माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या
दया रवीन्यातील शिळा

माझ्या मराठी मातीला
नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाडून थौर
मला हिचे महिमान

रत्नजडित अभंग
औनी अमृताची सखी
चारी वर्गांतुनी फिरे
सरस्वतीची पालखी

रसरंगात भिजला
येथे शृंगाराचा स्वर
येथे अहंता द्रवली
झाले नसुधेचे घर

माझ्या मराठी मातीचा
नका करू अवमान
हिच्या दारिद्र्यात आहे
भविष्याचे वरदान

नाही पसरला कर
कधी मागायास दान
स्वर्णसिंहासनापुढे
कधी लवली ना मान!

-कुसुमाग्रज

जीर्ण पाचोळा

आडवाटेला दूर एक माळ
तर त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगूनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास

उषा येवो शिंपित जीवनाशी
निशा काळोखी दडवू द्या जगासी
सूर्य गगनातुनी ओतू द्या निखारा
मूक सारे हे साहतो बिचारा

तरूवरची हसतात त्यास पाने
हसे मूठभर ते गवतही मजेने
वाटसरू वाट तुडवीत त्यास जात
परी पाचोळा दिसे नित्य शांत

आणि अंती दिन एक त्या वनांत
येई धावत चौफेर क्षुब्ध वात
दिसे पाचोळा घेरूनी तयाते
नेई उडवुन त्या दूर दूर कोठे

आणि जागा हो मोकळी तळाशी
पुन्हा पडल्या वरतून पर्ण राशी

          -कुसुमाग्रज

श्रावण आला…

हासरा नाचरा, जरासा लाजरा,
सुंदर साजिरा श्रावण आला

तांबुस कोमल पाऊल टाकीत
भिजल्या मातीत श्रावण आला
मेघांत लावीत सोनेरी निशाणे
आकाशवाटेने श्रावण आला

लपत, छपत, हिरव्या रानात,
केशर शिंपीत श्रावण आला
इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी
संध्येच्या गगनी श्रावण आला

लपे ढगामागे, धावे माळावर,
असा खेळकर श्रावण आला
सृष्टीत सुखाची करीत पेरणी
आनंदाचा धनी श्रावण आला

         – कुसुमाग्रज

Kusumagraj Kavita। कुसुमाग्रज कविता । Marathi Kavita Kusumagraj
Kusumagraj Kavita। कुसुमाग्रज कविता । Marathi Kavita Kusumagraj

शहाणपण

इथे वाढतं प्रत्येकाला
आपणच फक्त शहाणे
झाल्या जरी हातून चुका
तरी करतात बहाणे

वाईट नसतं कोणालाही
मनापासून चाहणे
मात्र वाईट असतं कोणालाही
पाण्यामध्ये पहाणे

जरूरी असतं प्रत्यकाने
वकुब ओळखून राहाणे
नशिबी येतं नाहीतर
प्रवाह पतित वहाणे

       -कुसुमाग्रज

 

स्मरण 

तुझ्या माझ्या दोन उल्का भेट झाली आकाशात,
कलियाच्या श्वसापरि धुमसत होती रात.
आठवते का?

दोन विश्वे संधणारी जळणारी तेजोरेशा,
उधणून आल्या काही निराकार अभिलाषा.
आठवते का?

अंतरीच्या मौनाचेही निनादले प्रतिध्वनी,
निमिषांच्या पंखांवर निथळली संजीवनी.
आठवते का?

चार क्षण प्रवासात चार युगे सामावली,
अबोधाच्या स्मरणाची दीप माला उजळली.
आठवते का?

पृथ्वीवर आता झालो मातीमध्ये मती पण,
मतीलाही बिलगली आकाशाची आठवण…

    – कुसुमाग्रज.

उठा उठा चिऊताई

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडलें
डोळे तरी मिटलेले
अजुनही !

सोनेरी हे दूत आले
घरटयाच्या दारापाशी
डोळ्यांवर झोप कशी
अजुनही ।

लगबग पांखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे ।

झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारा पाणी
चिमुकल्या ?

बाळाचें नी घेतां नांव
जागी झाली चिऊताई
उडोनियां दूर जाई
भूर भूर

         – कुसुमाग्रज

समिधाच सख्या या

दुरस्थ कुणी दे तुझ्या की ही कविता
वाहते जिच्यातुनि त्याची जीवन-सरिता
खळखळे, अडखळे, सुके, कधी फेसाळे
परि अखंड शोधे बाट समुद्राकरिता !

खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली
पथ शोधित आली रानातून अकेली
नच रम्य राउळे कलापूर्ण वा घाट
तीरावर तुरळक परि अंकुरती वेली

नवपर्णांच्या या विरल मांडवाखाली
होईल सावली कुणा, कुणास कहाली
तोषेल कुणी शापील कुणी दुर्वास
“या जळोत समिधा भव्य हवी वृक्षाली!”

समिधाच सख्या या त्यांत कसा ओलावा
कोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा ?
जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा
तब आन्तर अग्नी क्षणभर तरि फुलवावा !

    -कुसुमाग्रज

Kusumagraj Kavita। कुसुमाग्रज कविता । Marathi Kavita Kusumagraj
Kusumagraj Kavita। कुसुमाग्रज कविता । Marathi Kavita Kusumagraj

प्रेम कविता । Prem Poem 

पुरे झाले चंद्रसूर्य, पुऱ्या झाल्या तारा
पुरे झाले नदीनाले, पुरे झाला वारा

मोरासारखा छाती काढून उभा रहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा
सांग तिला तुझ्या मिठीत, स्वर्ग आहे सारा

शेवाळलेले शब्द आणिक
यमकछंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण
इंद्रधनू बांधील काय?

उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रहाशील फिरत
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगिनचिठ्ठी, आल्याशिवाय राहील काय?

म्हणून म्हणतो जागा हो, जाण्यापूर्वी वेळ
प्रेम नाही अक्षरांच्या, भातुकलीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवूनसुद्धा, मेघापर्यंत पोचलेलं

शव्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस
बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस

उधळून दे तुफान सगळं
काळजामध्ये साचलेलं
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं

kusumagraj poems on love

          – कुसुमाग्रज

स्मृती 

नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुल केव्हा
त्या माजघरातिल मंद दिव्याची वात !

वाऱ्यावर येथिल, रातराणि ही धुंद
टाकता उसासे, चरणचाल हो मन्द
परि स्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा
त्या परसामधला एकच तो निशिगन्ध !

हेलावे भवती सागर येथ अफाट
तीरावर श्रीमान् इमारतींचा थाट
परि स्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा
तो नदीकिनारा आणि भंगला घाट !

बेहोष चढे जलशांना येथिल रंग
रुणझुणता नूपुर जीव बने निःसंग
परि स्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा
तू आर्त मला जो ऐकवीलास अभंग !

लावण्यवतींचा लालस येथ निवास
मदिरेत माणकापरी तरारे फेस
परि स्मरति आणिक करती व्याकुल केव्हा
ते उदास डोळे, त्यातिल करुण-विलास !

      -कुसुमाग्रज

 

 • कुसुमाग्रज यांच्या १० प्रसिद्ध कविता
 • कुसुमाग्रज कविता 
 • kusumagraj poems
 • marathi kavita sangrah kusumagraj
 • kusumagraj poems on love
 • Kusumagraj Kavita। कुसुमाग्रज कविता । Marathi Kavita Kusumagraj

 

आमच्या इतर कविता पोस्ट साठी  : 

 


 

 

मित्रांनो या कवितांमध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद

1 thought on “Kusumagraj Kavita। कुसुमाग्रज कविता । Marathi Kavita Kusumagraj”

 1. कुसुमाग्रजांच्या साहित्याविषयी बोलायचे झाले तर ते शब्दात अपुरे पडतील असे आहे. त्यांच्या कविता, कथा, नाटकांविषयी लिहिण्यासारखे बरेच काही आहे. आजही त्यांच्या कविता या अनेकांच्या ओठी असतात आणि त्या जगण्याची नवी प्रेरणा देतात.
  तुमच्या वेसाईट च्या मध्मातून आम्हाला त्यांच्या कवितांचा आस्वाद घेण्यासाठी मिळाला… खूप छान कविता आहेत … अश्याच पोस्ट करत रहा❤️👍

  Reply

Leave a Comment