Love Poem In Marathi। मराठी कविता प्रेमाच्या

Love Poem In Marathi। मराठी कविता प्रेमाच्या

Contents hide
1 Love Poem In Marathi। मराठी कविता प्रेमाच्या

 

Love Poem In Marathi। मराठी कविता प्रेमाच्या
Love Poem In Marathi। मराठी कविता प्रेमाच्या

 

 

 

 

नमस्कार, या ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे  तुम्ही मराठी कविता प्रेमाच्या शोधत आहात का? आम्ही तुमच्या साठी मराठीत काही  सुंदर “मराठी कविता ” शोधले  आहेत. या पोस्टच्या माध्यमातून मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आलो आहे .  म्हणजेच आजचा पोस्ट  च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला  Love Poem In Marathi। मराठी कविता प्रेमाच्या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला सुंदर  मराठी कविता देनार आहोत.

 

 

मैत्री (●__●)

मैत्री कशी हळुवार उमलते
उन्हातही मग सावली वाटते
अश्रूत दुःख वाहून जाते
व्यथांनाही हसू येते
मैत्रीविना सारेच फिके
आनंदाचे क्षणही मुके

म्हणूनच मैत्रीला फुलवायचे
फुलासारखे जपायचे
अन त्या सुगंधात
जीवन सुगंधी करायचे….

 

💞 प्रेम किनारा..💞

कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती तुझा हात….
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ….
साद घाली मना,

झोंबनारा गार हा वारा….
शहारालेलं सर्वांग त्या लाटांपरी,
भावनाही उधाणलेल्या….
तयांशी लाभलेला तू…
प्रेम किनारा…

तू आणि मी 👩‍❤️‍👩

पहिल्यांदा जेव्हा पाहिलं मी तुला,
माझ्या मनाचं पाखरू लागलं होत उडायला
बाकी कशाचाचं नव्हतं रे मला भान,
काय करु, तुझ्यावरुन हटतचं नव्हतं माझं
ध्यान

बोलायला तुझ्याशी मला शब्दांची गरज वाटत
नव्हती,
कारण त्यासाठी तुझी एक नजरच पुरेशी होती
गंमत वाटत होती मला चोरून पाहताना
तुझ्याकडे,
मन चिंब झालं होत,जेव्हा तू हसला होता
पाहून माझ्याकडे
आपली ही पहिली भेट माझ्यासाठी खूप खास
होती,

कारण या भेटीनेच कदाचित पण आपली मनं
जुळली होती
माझ्या मनात फक्त तुला आणि तुलाच होती
जागा,
माहित नव्हतं तरिही काय होता आपल्याला
जोडणारा धागा
तुझ्याच विचारांत असायची मी नेहमीच दंग,
कारण तूच भरला होता ना माझ्या आयुष्याला

समजायला लागलं होतं आता मलाही थोडं
थोडं,
का झालं होत माझ मन तुझ्यात एवढं वेडं
गुंतला होता तुझ्यात जीव,माझं हृदयही
तुझ्याचसाठी धडधडत होतं,
आता मात्र हे वेडं मन,तुझ्याच सोबतीची स्वप्न
पाहत होतं

आणि तुझ्याच साठी जगात होतं ….

 

वेड्या मनास माझ्या ..💕

वेड्या मनास माझ्या कसलेच भान नाही
ये ना प्रिये समोरी जगण्यास मान नाही
वेड्या मनास माझ्या ………..

बघता तुझी सावली जचली या मनाला
हरवून भान सारे मी शोधतो कुणाला
वाटेवरी उभा त्या मी रोजचाच होतो
घेतांना थांग तुझा विचारतो कुणाला
वेड्या मनास माझ्या …………

वाटे हवा हवा का हा जीवनी किनारा
बघ वाहूनिया आला बेधुंद गार वारा
प्रेमाची साथ अपुली जोडू ये सांजवेळी
पाहू नकोस मागे समजून घे इशारा
वेड्या मनास माझ्या …

येतील चांद तारे देतील साक्ष तुजला
प्रेमात खोट नाही विचार या नभाला
आलीस तू जीवनी होऊन आशा नवी
दे अर्थ तू साजणी बेअर्थी जगण्याला

वेड्या मनास माझ्या कसलेच भान नाही
ये ना प्रिये समोरी जगण्यास मान नाही
वेड्या मनास माझ्या कसलेच भान नाही…

 

प्रिये…..❤

माझा प्राण नाही पण आत्मा तु आहेस.,
माझा श्वास तुच आहेस…
आता माझ्या जगण्याची आस तुच आहेस…

जग किती सुंदर आहे बघ माझ्या मिठीत येऊन..
डोळे लावुन भिजुन जा..
माझ्या प्रेमाच्या धुंद वर्षावात…

कितीही झालं तरी प्रिये तु माझी जान आहेस
आता माझ्या जगण्याची आस तुच आहेस…

 

Love Poem In Marathi
Love Poem In Marathi

 

प्रीत..👨‍❤️‍💋‍👨

तुझ्या अशा फसव्या नजरांनाच
मी भुलत गेलो
तू सोडत होतीस केस मोकळे
मी मात्र गुंतत गेलो

तुझ्या जादुई हसण्यातच
मी फसत गेलो
त्या मोहवणाऱ्या क्षणात
मी हरवत गेलो

तुझ्या पुसटश्या स्पर्शानही
मी बेभान होत गेलो
तो गंध माझ्या तन-मनात
नकळत साठवत गेलो

कळलं नाही हा श्वास
कधी झाला तुझा
इतकी प्रीत तुझ्यावर
मी कसा करत गेलो

म्हणूनच मैत्रीला फुलवायचे
फुलासारखे जपायचे
अन त्या सुगंधात
जीवन सुगंधी करायचे

मैत्री कशी हळुवार उमलते
उन्हातही मग सावली वाटते
अश्रूत दुःख वाहून जाते
व्यथांनाही हसू येते
मैत्रीविना सारेच फिके
आनंदाचे क्षणही मुके

झोंबनारा गार हा वारा
शहारालेलं सर्वांग त्या लाटांपरी,
भावनाही उधाणलेल्या
तयांशी लाभलेला तू
प्रेम किनारा

कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती तुझा हात
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ
साद घाली मना,

प्रेम करणं सोपं नसतं
प्रेम करणं सोपं नसतं
सर्व करतात, म्हणून
करायच नसतं..
चित्रपटात बघीतलं, म्हणून
करायच नसतं
पुस्तकात वाचलं , म्हणून
करायच नसतं
तर कुणाकडून ऐकलं,
म्हणून करायच नसतं
कारण प्रेम करणं सोपं नसतं.

प्रेम हृदयातील एक भावना
कुणाला कळलेली
कुणाला कळून न कळलेली
कुणी पहिल्याच भेटीत
उघड केलेली
तर कुणी आयुष्यभर लपवलेली
कुणी गंमत करण्यासाठी वापरलेली
तर कुणाची गंमत झालेली..
कुणाचे आयुष्य उभारणारी..
तर कुणाला आयुष्यातुन उठवणारी
फक्त एक भावना.

एकांत क्षणी कधी तरी
असं वाटतं कुणीतरी आपलं असावं
दुखाःच्या क्षणी हसवावं
आणि सुखाच्या क्षणात मार्गावर
व्हावं.. 

 

मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय गं..👩‍❤️‍👩

मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय ग़
अजुन ही तुला हे कसे कळत नाही
तू नसताना ही तुझ्या आठवणीतच असतो
तू असतेस तेव्हा ते प्रेम तुला कसे कळत नाही

कधी पासून प्रेम करतोय तुझ्यावर
माझे मलाच ठाऊक नाही

पण एवढे मात्र नक्की आहे की
आता तुझ्या शिवाय मला काहीच ठाऊक नाही
तू नसतेस पण असे कधी वाटले ही नाही
तू असतेस कायम माझ्या मनातल्या घरा

तुझा आभासच अधिक सुखावतो मला
तुझ्या असण्याहून ही प्रिय आहे जरा
मनातले बोल ओठांवर येत नाही कधी
तुझ्या दुरावण्याची भीती उगीच मनी असते

प्रेम म्हणजे.. ❤️ 

प्रेम म्हणजे ?
समजली तर भावना..♥
पाहिले तर नाते..♥
म्हंटले तर शब्द..♥
वाटली तर मैत्री..♥
घेतली तर काळजी..♥
तुटले तर नशीब..♥
पण मिळाले तर स्वर्ग.. ..♥♥♥♥

स्वप्नातील साज घेऊन ती आली.. 💕

स्वप्नातील साज घेऊन ती आली
ना सांगताच ती या मनाची झाली
हृदय आता तिच्या शिवाय
धडकेना,
का माझिया प्रियाला प्रीत कळेना..❤

 

 

तुझ्या साठी Facebook वर येत असतो.. 😘

तुझ्या साठी Facebook वर येत असतो
तुझ्या साठी मराठी कविता करत असतो
FRIEND भेटला की थोडा वेळ
Chatting करत असतो
सकाळ पासून संध्या काळ पर्यंत
ऑनलाइन असतो
तुझ्या साठी मराठी कविता करत असतो
कधी ऑफिस चे काम
तर कधी क्लाइंट्स चे फ़ोन
किती ही कामात असलो
तरी Facebook वर
ऑनलाइन असतो
तुझ्या साठी मराठी कविता
करत असतो…

 

Love Poem In Marathi। मराठी कविता प्रेमाच्या
Love Poem In Marathi। मराठी कविता प्रेमाच्या
तू म्हणजे तूच आहेस..♥♥

तू म्हणजे तूच आहेस,
मी म्हणजे मी तुझाच आहे
जन्मभर राहिली साथ आपुली
हीच प्रेमाची हमी आहे
रुसणे,रागावणे मला
चालणार नाही,
तुझ्या गुलाबी गालावर ओठाने
स्पर्श करणार नाही.

 

 

असे असावे प्रेम केवळ…❤️

असे असावे प्रेम केवळ

शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे.

असे असावे प्रेम केवळ सावलीतच

नव्हे उन्हात साथ देणारे.

असे असावे प्रेम केवळ सुखातच

नव्हे तर दुखातही साथ देणारे.

 

शृंगार..💕

रोजच पाहतो तुझा चेहरा

आज वाटे नवीन काही

शृंगाराची खान तुझी

नजरेचा बाण घायाळ करी

कमरेवरचा हात तुझा

नजर झुकवित किंचित खाली

ओठावरती चमकते लाली

हा शृंगार कुणासाठी

नटली अशी जणू भासते नटी

उतावीळ झाला जीव

तुला भेटण्यासाठी

मधाळ तुझे ओठ

त्यावर ठेवून अलगद बोट

प्रेमाकडे घेऊन जाणारा मार्ग

खुपच अरुंद असतो

ज्याच्यावरुन दोघेजण

कधीच एकत्र चालू शकत नाही,

कारण त्यांना पुढे

चालण्यासाठी मनापासुन

एक होणे गरजेचे आहे.

 

Love Poem In Marathi। मराठी कविता प्रेमाच्या
Love Poem In Marathi। मराठी कविता प्रेमाच्या

 

 

प्रेम करतो तुझ्यावर…❤️

सोडून मला जाऊ नकोस… खुप स्वप्न बघितलित…..

तोडून कधी जाऊ नकोस…. कधी प्रेम करायचीस माझ्यावर…

हे कधी विसरु नकोस….. नको करूस प्रेम…

तिरस्कार मात्र करू नकोस… विसरलीस माझ प्रेम तरी चालेल….

मैत्री माझी विसरु नकोस….. सोडून गेलीस तू मला….

प्रेम माझ विसरु नकोस… मरणाच्या वाटेवर असताना…

कालजी माझी करू नकोस… मरण जरी आल मला….

मरना वर माझ्या अश्रु मात्र काढू नकोस

इशारा करशी मज काही

पैंजणांचा नाद मधुर

असा वाजतो तुझ्या पायी

चाल तुझी जणू चालली वाघीण

डुलते मान जशी डुलती नागिन

कुणास मि काय बोलू

नजरा तुझ्यावर हजार आहेत

शृंगाराची नशा तुझ्या

आज प्रत्येकाच्या नजरेत आहे

 

मराठी प्रेम कविता चारोळ्या

 

तुझ्या प्रेमाने..💕

रडवलं आहे खुप,तुझ्या आठवणीने मला

तर सावरल आहे खुप..मी तुझ्यावर जिवा-

पाडप्रेम करत होतो,माझ्या या मजबुरीला तू

आजमावलं आहे खुप..दिली आहेसच तू मला

प्रेम भंगाची जखम,मग कशाला हवे आहे

तुझ्या आठवणींचे मलम..या धक्क्यातून सावरावं

लागणार आहे निश्चित,आता तुला विसरणं हेच

आहे माझ्या प्रेमाचे प्रायश्चित्त..

 

 

प्रेम करणं सोपं नसतं…😘

प्रेम करणं सोपं नसतं…

सर्व करतात, म्हणून

करायच नसतं..

चित्रपटात बघीतलं, म्हणून

करायच नसतं…

पुस्तकात वाचलं , म्हणून

करायच नसतं….

तर कुणाकडून ऐकलं,

म्हणून करायच नसतं…

कारण प्रेम करणं सोपं नसतं…

 

Love Poem In Marathi। मराठी कविता प्रेमाच्या
Love Poem In Marathi। मराठी कविता प्रेमाच्या

 

प्रेम हृदयातील एक भावना..❤️

कुणाला कळलेली..

कुणाला कळून न कळलेली..

कुणी पहिल्याच भेटीत

उघड केलेली..

तर कुणी आयुष्यभर लपवलेली…

कुणी गंमत करण्यासाठी वापरलेली..

तर कुणाची गंमत झालेली..

कुणाचे आयुष्य उभारणारी..

तर कुणाला आयुष्यातुन उठवणारी..

फक्त एक भावना.

 

 

 

Cute प्रेमाचा Sweet गोलमाल..💕

♥ जेव्हा तुम्ही प्रेम करता, ….

तेव्हा तुम्ही दुखावले जाता ♥

♥ जेव्हा तुम्ही दुखावले जाता, ….

तेव्हा तुम्ही द्वेष करता ♥

♥ जेव्हा तुम्ही द्वेष करता, ….

तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता ♥

♥ जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता, ….

तेव्हा तुम्ही मिस करायला लागता ♥

♥ आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता, ….

तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता ♥

♥ ♥ ♥ ♥ पुन्हा प्रेम करू लागता !!

 

 

चाहूल …😘

भिजून गेला वारा …..

रुजून आल्या गारा …

बेभान झाली हवा ….

पिऊन पाऊस ओला ……

येना जरा तू येना जरा ……

प्रेमाची चाहूल देना जरा ……

 

प्रेम आणि पाऊस..(●’◡’●)

प्रेम आणि पाऊस

दोन्ही हि एकच आहेत.

दोन्ही हि नेहमी

अविस्मरणीय असतात.

पाऊस जवळ राहुन

अंग भिजवतो आणि

प्रेम दुर राहुन डोळे भिजवते!!

 

कविता करणे सोपं कि प्रेम ?

कविता चुकली तर…….. …….

कागद फडता येतो…… ….

पण…….. ………. ……..

प्रेम चुकले तर…….. …….

आयुष्याच्या पत्रावळ्या होतात…..

 

 

Love Poem In Marathi। मराठी कविता प्रेमाच्या विडियो माध्यमातुन 

Video credit : Dream Stories Marathi Youtube Channel

 

खालील माहितीसाठी हीच पोस्ट पुन्हा वाचा :

Love poem in marathi | प्रेम कविता| मराठी कविता | prem kavita
मराठी प्रेम कविता चारोळ्या | love poems in marathi
Poem In Marathi On Love | 20+ प्रेमावरच्या कविता मराठीमध्ये
Prem Kavita | Love Poem In Marathi | मराठी प्रेम

आमचे इतर काही  पोस्ट : 

 

Widal Test Meaning In Marathi । विडाल टेस्ट म्हणजे काय ?

Sapiosexualx Meaning In Marathi। सेपिओसेक्सुअल म्हणजे काय ?

Omnivores Meaning In Marathi। सर्वभक्षी म्हणजे काय ?

Spam Meaning In Marathi । स्पॅम म्हणजे काय ? 

Debug Meaning in Marathi । डीबग म्हणजे काय ?

 


 

मित्रांनो या माहिती  मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद.

Leave a Comment