माहेर कविता । माहेरवाशीण कविता । Maher Kavita

माहेर कविता । माहेरवाशीण कविता । Maher Kavita

 

माहेर कविता । माहेरवाशीण कविता । Maher Kavita
माहेर कविता । माहेरवाशीण कविता । Maher Kavita 

 

माझे माहेर

माझे माहेर माहेर स्वर्गाहून सुंदर
आठवणीच्या सुखाची गोड चादर
विसावून जाते क्षणभर ||१||

बाबांची काळजी
भावाशी मस्ती
बहिणीशी गट्टी
नी आईच्या मायेची शिदोरी || २ ||

ना कसली घाई, ना कसली काळजी
आरामात उठते मी सकाळी
आईच्या हातचा गरमागरम चहा पोटभर नाष्टा,
नी सर्वांशी गप्पा टप्पा || ३ ||

चार दिवस कसे निघून जातात हे मात्र कळत नाही
वेळ होते जेव्हा सासरी जायची तेव्हा
आईचे पाणावले डोळे,
नी बाबांच्या हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख
खूब काही सागुन जाई ||४ ||

सासरी जाताना वाटेत विचार येई
सकाळी उठून अंगण झाडण्याची घाई
तुळशी भोवती रांगोळी नी
सासू सासऱ्यासाठी चहा
पाणी यातच गुंतून जाते बाई ||५||

माझे माहेर माहेर स्वर्गाहून सुंदर माझ्या मायेचा स्पर्श भासे जणू स्वर्ग ….

Majhe Maher Poem In Marathi 

Maher poem in marathi

 

माहेर कविता मराठी

माज्या माहेराच्या वाटे
जरी लागल्या रे ठेचा
वाटेवरच्या दगडा,
तुला फुटली रे वाचा…।

नीट जाय मायबाई
नको करु धडपड
तुझ्याच मी माहेरच्या
वाटेवरचा दगड…।

माजं माहेर माहेर
सदा गानं तुझ्या ओठी
मग माहेरुन आली
सासराले कशासाठी..?

अरे, लागले डोहाळे
सांगे शेतातली माती
गाते माहेराचं गानं
लेक येइल रे पोटी…।

देरे देरे योग्या ध्यान
ऐक काय मी सांगते
लेकीच्या माहेरासाठी
माय सासरी नांदते…।

देव कुठे देव कुठे?
भरीसनी जो उरला
अरे उरीसनी माझ्या
माहेरात सामावला…।

माहेर कविता । माहेरवाशीण कविता । Maher Kavita

 

Mahervashin Poem In Marathi

 

माहेरवाशीण 

संसाराच्या रामरगाड्यातून
सुटका..म्हणजे माहेरवाशीण

रोजच्या कामाच्या व्यापातून
मुक्ती म्हणजे माहेरवाशीण,

आज काय स्वयंपाक करायचा
ह्या विवंचनेतून सुटका
म्हणजे माहेरवाशीण

हे दे गं, ते दे गं, हे कर, ते कर
ह्या कटकटीतून सुटका
म्हणजे माहेरवाशीण

हवं तेवढं लोळा
उठल्या उठल्या अंघोळ करा
रोज रोजच काम करा ह्या
कटकटीतून सुटका
म्हणजे माहेरवाशीण

आईच्या हातचे ऊन ऊन खाऊन
यथेच्छ लोळत पडणे
म्हणजे माहेरवाशीण

चारदिवस मनमुराद मौजमजा
म्हणजे माहेरवाशीण
स्वगृही परतताना जड होणारी पाऊले
म्हणजे माहेरवाशीण

अलगद डोळ्यांच्या कडा
ओलावणारी,आवंढा गिळणारी
तृप्त तरी अधुरी
मागोवा मागे सोडून परतणारी
म्हणजे माहेरवाशीण

माहेरच्या गोड आठवणी
कुरवाळत स्वगृही परतलेली
म्हणजे माहेरवाशीण

 

माहेर कविता विडिओ रूपात : Maher Kavita In Video  

 

Video credit : vitthal swami काव्यगंध  Youtube channel

 

Video credit : Love Romio youtube channel 

Topic 

माहेर कविता , माहेरवाशीण कविता 

Maher Kavita , Maher Poem 

 

आमच्या इतर कविता पोस्ट 

 


 

मित्रांनो या कवितांमध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद . 

Leave a Comment