माझी आजी निबंध मराठी । Majhi Aaji Nibandh In Marathi

माझी आजी निबंध मराठी । Majhi Aaji Nibandh In Marathi

 

माझी आजी निबंध मराठी । Majhi Aaji Nibandh In Marathi
माझी आजी निबंध मराठी । Majhi Aaji Nibandh In Marathi

 

मित्रानो , या पोस्ट मध्ये माझी आजी निबंध मराठी निबंध लेखन / Majhi Aaji Nibandh In Marathi 100 ते 400 शब्दात निबंध लेखन करणार आहोत . हा निबंध 7 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्याना परीक्षेत वर्णनात्मक निबंध म्हणून विचयाराला जातो त्यामुळे निबंध नीट वाचा.  आज आपण Majhi Aaji Nibandh In Marathi या विषयावर निबंध बघणार आहोत.

 

‘ऊठ बाळ, सकाळ झाली. उन्हे अंगावर आली बघ प्रत्यक्ष सूर्यदेव ‘उठवायला आलेत. झटकन् उठ.’ असे म्हणत सकाळी सकाळी माझे पांघरूण अंगावरून काढते ती ‘माझी आजी’. एव्हाना तिची योगासने, प्राणायाम आटोपलेला असतो. तोंडाने एकीकडे ती म्हणत असते.

“प्रभाते मनी राम चिंतित जावा.

पुढे वैखरी राम आधी वदावा

सदाचार हा थोर सांडू नये तो

जगी तोचि तो मानवी धन्य होतो ।

माझी आजी बी.ए. बी.एड. झाली, मराठी हा स्पेशल विषय घेऊन. तिचे लेखनशैली खूप छान आहे, अन् विचार उच्च पातळीवरचे, ती निवृत्त उच्चार, शिक्षिका आहे, अगदी हाडाची. शिकवण्यात तिचा विशेष हातखंडा आहे. विशेष म्हणजे गणित, विज्ञान, मराठी, इंग्रजी कुठलाही विषय ती लीलया गळी उतरवते. तिच्याजवळ नुसतं बसण्याने, अवघड टॉपिक सोपा होऊन उलगडत सामोरा येतो. तिच्यामुळेच मराठी व्याकरणातल्या समास, संधीशी माझी घट्ट मैत्री झाली.

मी तिचा सगळ्यात मोठा नातू, दुधावरची साय, तळहातावरचा फोड, ती माझे खूप लाड करते पण शिस्तीच्या वेळी मात्र तिचा शिस्तीचाच शिरस्ता असतो. जातिभेद, वर्णभेद तिला मुळीच मान्य नाही. सर्वधर्म समभावावर तिची दृढ निष्ठा आहे. ईश्वर एकच आहे हे तिचं तत्त्व. ती श्रद्धाळू जरूर आहे, पण अंधश्रद्धांवर तिचा विश्वास नाही. मनाचा हळवेपणा, मृदुता तिच्या ठायी पावलोपावली दिसतो. अभ्यास करून कंटाळलो तर विरंगुळा म्हणून ती कधी विनोद चुटकुले सांगून हसवते, कधी महाभारतातल्या व्यक्तीरेखा समजावते, तर कधी इसाप, बिरबल डोळ्यांसमोर उभे करते. तिच्या मांडीवर डोके ठेवूनच मी माझे मराठीतले कित्येक निबंध, कल्पनाविस्तार तयार केले, पत्रे तर तिने इयत्ता पहिलीपासूनच माझ्याकडून लिहून घेतली व पोस्टातही टाकायला लावली, पोस्टाने व्यवहार, मी त्यातूनच शिकलो. माझ्या परीक्षेच्या वेळी ती मला खूप धीर देते माझा आत्मविश्वास जागा ठेवते. परीक्षेला निघताना मी जेव्हा तिच्या पावलान वाकून स्पर्श करतो, तेव्हा ती मनोमन आशीर्वाद देते ह

‘संकल्प तुझा विजयश्रीचा

सिद्धीस जाणार आहे

प्रयत्नांच्या पाठी यश

हाती हात घालून येणार आहे.’

हे जीवन खूप सुंदर आहे. आनंदी राहावं, समाधानानं जगावं, चित्त प्रफुलित ठेवावं. महत्त्वाकांक्षी असावं, पण कुणाशी ईर्षा करू नये. सुहृदांशी मैत्री करावी. अहंभावाला शिवू नये. ‘देता’ हात आपल्याजवळ असावा ही तत्त्वे तिने लहानपणापासूनच आमच्या मनावर ठसवली. एकदा रामनवमीला मी तिच्याबरोबर राममंदिरात गेलो. पाच मिनिटे ती देवासमोर डोळे मिटून बसली. मी तिला विचारले ‘रामरक्षा म्हणत होतीस का गं आजी?” तिने होकार दिला व म्हणाली त्या रामाला अंतःकरणातून सांगितलं,

भेगाडलेल्या जमिनींसाठी

चिंब ओली सर दे

वज्रासारख्या देहामध्ये

सामर्थ्यशाली मन दे

देणार असशील सढळ हाताने

तर …. विश्वकल्याणी दान दे!”

ऐकून आजीची माझ्या मनातली प्रतिमा लख्ख उजळली. रोज संध्याकाळी आई सांजवात लावते. उदबत्तीच्या मंद सुगंधाने मन प्रसन्न होते. वातावरण पवित्र होते.

वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे

सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे

असे तोंडाने म्हणत हसत-खेळत रात्रीचे जेवण होते. झोपताना आजी आम्हा भावंडांना तोंडी हिशेब विचारते. उत्तरे देता देता आम्ही कधी झोपी जातो कळत देखील नाही. सकाळी उठण्यासाठीचा घड्याळाचा गजर आजीने हमखास लावलेला असतो.

वाचन व बागकाम हे आजीचे आवडते छंद. आरोग्याविषयीचे विविध मासिकातले लेख वाचून आजोबांसकट सर्वांचेच आरोग्य ती सांभाळते. तिच्या परसबागेत तिला हवे तेव्हा कुंडीतल्या झाडांना वांगी, मिरच्या, टोमॅटो व देवपूजेसाठी गुलाब, मोगऱ्याची फुलेही सापडतात.

माझी आजी पुरोगामी विचारांची आहे पण शिस्तीची भोक्ती असल्यामुळे वागणुकीतील स्वातंत्र्य व स्वैराचार यातली मर्यादारेषा ओलांडलेली तिला चालत नाही. समाजात स्त्री-पुरुष समानता असली तरी स्त्री स्त्रीच्याच जागी रहावी ह्यात तिचे दुमत नाही. स्त्रीभ्रूण हत्या, बालमजुरी, सासुरवास, हुंडाबळी ह्यावर ती कडाडून टीका करते.

नवी शिक्षण पद्धती व प्रचलित गुणदान पद्धती पाहून तिच्यातली शिक्षिका तळमळते. गर्भवती महिलांचे डोहाळेजेवण, सर्व रक्त तपासण्या, सोनोग्राफी सकट करण्याची पद्धत तिने आमच्या गावात सुरू केली. तिला संगणक वापरायला खूप आवडतो. सध्या ती की-बोर्डवर टायपिंग शिकतेय.

माझी परीक्षा झाल्यावर तिला इंटरनेटचा वापर शिकवण्याचं मी वचन दिलंय. त्यामुळे ती खूप खुश झाली. शिक्षणासाठी मी जर घरापासून लांब गेलो, तर ती मला ईमेलवरून सर्वांची खुशाली कळवणार आहे, असा तिचा निश्चय आहे. आहे की नाही. मज्जा ! हेवा वाटला ना माझ्या मित्रांनो? आजी जवळ असो नाहीतर लांब असो, माझ्या मनातलं तिचं अस्तित्व समईतल्या मंद तेवणाऱ्या वातीसारखंच आहे. स्वच्छ, सात्त्विक, तेजस्वी प्रकाश देणार!

तिचं माझं नातं शब्दांपलिकडचं आहे, एवढंच सांगतो, तीच माझं मंदिर अन् तीच माझा राम आहे !

 

( 2 )

 

माझी आजी निबंध 10 ओळी । Majhi Aaji 10 line Essay In Marathi

 

माझी आजी निबंध मराठी । Majhi Aaji Nibandh In Marathi
माझी आजी निबंध मराठी । Majhi Aaji Nibandh In Marathi

 

माझी आजी निबंध 300 ते 400 शब्दात। Majhi Aaji Essay In 300 to 400 Words

आमची आजी कधीतरी आमच्याकडे येते; पण ती येते तेव्हा आमच्या घरातील सारे वातावरण फुलून जाते. आजी तिच्या नावाप्रमाणेच खरोखर अतिशय आनंदी आहे. हा आनंदच ती आपल्या भोवतालच्या सर्वांना सदैव वाटत असते. पंच्याहत्तरी ओलांडलेली आजी कधीच कुठल्याही गोष्टीची तक्रार करत नाही.

मी एकदा तिला विचारलं, “आजी, तुझे हातपाय कधी दुखत नाहीत का ग?” त्यावर हसून ती म्हणाली, “अरे, आहे कुणाला वेळ त्या हातापायांकडे पाहायला!” हेच आजीच्या उत्तम आरोग्याचे मुख्य गमक असावे.

आजीने आपल्या जीवनात खूप अडीअडचणींना, संकटांना तोंड दिलेले आहे. माझे बाबा आणि आत्या लहान असतानाच आजोबा वारले. आजीवर मोठे संकटच ओढवले. राहत्या घराशिवाय आजीजवळ काहीच नव्हते. पण मोठ्या धैर्याने तिने आपल्या लेकरांना मोठे केले. त्यांना उत्तम शिक्षण दिले आणि आपल्या पायावर उभे केले. माझ्या बाबांना वाटते की, आता आजीने कष्ट करू नयेत, आपल्याजवळ राहावे. पण आजी हसत हसत बाबांचे म्हणणे टाळते.

“ अरे, आपण सर्वजण शहरात राहिलो तर माझ्या त्या गावाला कोण सांभाळणार रे?” असा आजीचा बाबांना सवाल असतो.आजीचे आपल्या त्या छोट्याशा गावावर खूप प्रेम आहे, कारण तिच्या कठीण दिवसांत त्या गावानेच तिला आधार दिला.

प्रथम तिने छोट्यांसाठी शाळा काढली. मग तिने गावातल्या महिलांना शिवणकाम, भरतकाम शिकवण्यास सुरवात केली. त्यातूनच महिला उदयोग संस्था सुरू झाली आणि नावारूपाला आली. आता आजी बालकांसाठी पाळणाघर आणि संस्कारवर्ग चालवते, तर वृद्धांकरता ‘सावली’ नावाचा वृद्धाश्रम तिने सुरू केला आहे. आजीकडे जातो तेव्हा तिचा दैनंदिन कार्यक्रम बघून आश्चर्य वाटते.

चोवीस तासांपैकी पंधरा-सोळा तास ती काम करत असते. रात्री दोन तास ती वाचन करते. पण त्यांत पोथ्यापुराणे नसतात हं ! म्हणून तर आजी विशेष शिकलेली नसतानाही ती बहुश्रुत आहे. विज्ञान क्षेत्रात, वैदयकीय क्षेत्रात येणाऱ्या नव्या नव्या गोष्टींची ओळख करून घेण्याची तिला आवड आहे.

आजीची स्वतःची राहणी अतिशय साधी, खाणे साधे व मर्यादित; पण आम्ही गेल्यावर मात्र ती निरनिराळे पदार्थ करून आम्हांला खाऊ घालते; तेव्हा तिच्या सुगरणपणाची कल्पना येते. लहानात लहान, मोठ्यात मोठी होणारी ही आजी सर्वांना हवीहवीशी वाटते. आजीचे कर्मकठोर जीवन हाच माझ्यापुढील आदर्श आहे..

 

( 3 )

 

आजी म्हणजे काय ? । आजी कविता । Aaji Kavita 

 

आजी म्हणजे काय ? । आजी कविता । Aaji Kavita 

 

।।  आजी म्हणजे काय  ।। 

 

आजी म्हणजे काय

दुधावरची साथ..!!

आजी म्हणजे काय

प्रेमाची माय..!!

आजी म्हणजे काय

आईची माझ्या माय..!!

आजी म्हणजे

नातवंडांची लाडकी आय. !!

आजी म्हणजे काय

आयुष्य भर जपलेली गोड बाय..!!

आजी म्हणजे काय

माझ्या बालपणीच्या मोठेपणाची सोबती हाय !!

आजी म्हणजे काय

आशीर्वाद देणारी माऊली हाय..!!

आजी म्हणजे काय

सगळ्यांचा खंबीर साथ साथ ..!!

आजी म्हणजे काय

‘दहा हत्तीचं बळ जणू बळ हाय..!!

आजी म्हणजे काय

प्रत्येकाला लाभलेलं भाग्य हाय..!!

 

माझी आजी निबंध मराठी विडियो माध्यमातून 

Video credit : Jyotsna Pawar Youtube channel

 

वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता 

माझी आजी निबंध मनाला स्पर्श करणारा
माझी आजी १०० ओळी मराठी निबंध
majhi aaji Marathi nibandh 350 shabd
माझी आजी मराठी निबंध। Essay on My Grandmother in Marathi

 

FAQ 

Q 1 ) आजी कोणाला म्हणावे ? 

उत्तर : वडिलांच्या आईला किंव्हा आईच्या आईला आजी म्हणावे. व तसेच वयस्कर स्त्रीला आजी म्हणावे .

Q 2  ) आजी म्हणजे काय ?

उत्तर : वडिलांची आई किंव्हा आईची आई म्हणजे आजी होय . व वयस्कर स्त्रीला देखील आजी म्हणाले जाते . आजी ला इंग्रजी मध्ये Grandmother असे म्हणजे जाते .

 

आमच्या इतर निबंध पोस्ट :

व्यवसाय शिक्षण काळाची गरज निबंध

माझा आदर्श समाजसुधारक। डॉ. विकास आमटे निबंध

श्रमाचे महत्त्व निबंध। Shramache Mahattva Essay

मराठी भाषेची कैफियत निबंध । Marathi Bhashechi Kaifiyat Essay  

 

 

टीप :

1 ) माझी आजी निबंध मराठी निबंध हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0 वी व ११ वी १२ वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 


 

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद.

Leave a Comment