Marathi goshta । मराठी गोष्टी ।  Marathi ghost

Marathi goshta । मराठी गोष्टी ।  Marathi ghost

 

Marathi goshta । मराठी गोष्टी ।  Marathi ghost

 

गोष्टींचा Marathi gosta  हा झरा झुळझुळू वाहत तुमच्याकडे येत आहे. गोष्टींचं हे अनोखं जग अनेक गोष्टी Marathi goshti  एकत्रित केलेली  ही पोस्ट ( Marathi goshta ) , तुमच्या व तुमच्या  मुलांपर्यंत पोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे . अशी ही Marathi goshta । मराठी गोष्टी ।  Marathi ghost पोस्ट तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा .

 

उंट आणि कोल्हा

 

Marathi goshta । मराठी गोष्टी ।  Marathi ghost

 

उंटदादा, त्या नदीच्या पलीकडल्या शेताकडे पहा तरी तिथे किती छान काकड्या आल्या आहेत. आपण आज तिकडे जाऊया का?” कोल्हयान आतुरतेने विचारलं.

उंट म्हणाला, “हो जाऊया की।” उंटानं कोल्हयाला आपल्या पाठीवर बसवलं. दोघं नदी ओलांडून काकडीच्या शेतात घुसले आणि आनंदानं काकड्या खाऊ लागले. काकड्या फारच चविष्ट होत्या.

कोल्ह्याचं पोट तर लहानच होतं. दोन-चार काकड्या खाल्यावर त्याचं पोट भरलं पोट भरल्यावर तो आनंदानं इकडे तिकडे उड्या मारत फिरु लागला. उंट आपला काकड्या खाण्यातच रमला होता,

उदादा, तुझं अजून खाऊन झालं नाही का?” कोल्हा त्याला सारखा

सारखा विचारू लागला.

उदानं उत्तर दिलं. “माझं पोट मोठं आहे ना? अजून अर्ध देखील भरलं नाही. थोडा वेळ गप्प बस आणि मला जरा आरामात खाऊदे बघू”

पण कोल्ह्याला कुठला धीर निघायला पोट भरलं की मला गप्प बसताच येत नाही असं म्हणून कोल्हा आकाशाकडे तोंड करून “Fssडूsss 355555 असा आवाज काढायला लागला.

कोल्हयाचा आवाज ऐकून आजूबाजूच्या गावातले लोक काठ्या घेऊन धावतच आले. ते पाहून कोल्हा पळत सुटला आणि नदीकिनारी जाऊन थांबला.

बिचारा उंट त्याला काही पळता आलं नाही आणि तो गावक-यांच्या हातात सापडला. गावक-यांनी त्याला चांगला चोप दिला. मग उंट विचारा रडत खडत नदीकिनारी पोचला.

कोल्ह्यानं वाईट वाटल्याचं नाटक करत म्हटलं, “अरेरे! किती मारलं रे तुला मला बघूनच किती वाईट वाटतय

उंट म्हणात्स, बर ते जाऊदे रे आता लवकर माझ्या पाठीवर बस. आपण इथून निघूनच जाऊया दोघे नदीच्या मध्यावर येऊन पोचले. उट अचानक धावला आणि आपली कंबर हलवत डावीकडे उजवीकडे डोलू लागला.

कोल्ह्यान घाबरून विचारले, “अरे दादा, असा का डोलतोयस? अशानं मी नदीत पडेन ना।”

उंट म्हणाला, “पोटभर जेवण झालं की अशी नदीत डोलायची मला सवयच आहे. मी तरी काय करू?” असं म्हणून उंट नदीत आणखीच जोरात डोलू घेऊ लागला.

बिचारा कोल्हा मात्र आता नदीत पडला. 

एक लोक कथा 


 

 

माकडाचं पिल्लू फळं खातं

 

Marathi goshta । मराठी गोष्टी ।  Marathi ghost

 

एक दिवस माकडाचं पिल्लू एका कलिंगडाच्या शेतात गेलं. त्यानं पहिल्यांदाच कलिंगड पाहिलं होतं. एक कलिंगड तोडून ते त्याचं जाड साल खाऊ लागलं.

खूप प्रयत्न करून जेमतेम दोन घास खाल्यावर त्यानं ते फेकून दिलं आणि म्हणाला, “शी कलिंगडाची चव काहीतरीच आहे. ”

जवळच एक वासरू उभं होतं, ते म्हणाल, “कलिंगडाचा गर खातात, साल नाही काही”

वासराचं म्हणणं पूर्णपणे न ऐकताच पिल्लू पळायला लागलं आणि म्हणालं, “गर खायचा असतो, हे काय मला माहित नाही का?”

मग पिल्लू एका खरबुजाच्या शेतात गेलं. त्यानं एक खरबूज तोडलं, आणि त्याच्या बिया खाऊ लागला..

गाढवाचं एक पिल्लू त्याच्याजवळ आलं, आणि म्हणालं, “अरे बाबा, सालीच्या आत जो मऊ गर असतो ना, तो खायचा असतो. बिया नाही.”

माकडानं तोंडातला घास थुंकून टाकला आणि म्हणाला, “ते तर मला आधीपासूनच माहित होतं.”.

मग माकडाचं पिल्लू बदामाच्या झाडावर चढलं. त्यानं एक बदाम तोडला आणि खायला लागला. तेवढ्यात एक नीलकंठ पक्षी उडत उडत तिथे आला आणि म्हणाला, “अरे, बदामाचा बाहेरचा भाग नसतो खायचा…”

छोट्या माकडानं त्याचं म्हणणं अर्ध्यावर तोडलं आणि म्हणाला, “मला सगळं माहित आहे.” त्यानं बदामाच्या आतल्या कवचात दात घुसवला. “आई आई गं माझा दातच पडला!” आणि माकडानं झाडावरून एकदम खाली उडीच मारली.

नीलकंठान त्याला परत समजावलं, “अरे, बदामाचं आतल कवच नसतं खायचं, त्याच्या आतली वी खायची असते.”

मग छोटे माकड़ एका नाशपतीच्या झाडावर चढल. एक नाशपती तोडली आणि फांदीवर आपटून आपटून तिचा लगदा केला आणि मग त्यातली बी खाऊ लागला. छी। छी। किती कडू आहे।”

नीलकंठ परत त्याच्याकडे उडत आला आणि विचारल, कशी आहे चवर माकडाच्या पिल्लाला आता तर फारच राग आला होता. त्यानं नाशपती नीलकंठाकडे फेकली आणि ओरडला, ‘मी आता कधीच फळं खाणार नाही.

चिनी गोष्ट

 


 

 

अभू – शंभूची युक्ती

 

Marathi goshta । मराठी गोष्टी ।  Marathi ghost
Marathi goshta । मराठी गोष्टी

 

उंदीर पकडण्यासाठी मनीमावशीनं एक युक्ती शोधून काढली.

एक दिवस मनीमावशीनं आपल्या आजूबाजूला राहणा-या सगळ्या उंदराना बोलावलं आणि म्हटलं, “मित्रांनो, मी इतके दिवस तुम्हाला खूप जास देत होते, पण आता मला त्याचं फार वाईट वाटलंय. आता तुम्ही सर्वानी आनंदात रहावं असं मला वाटतं. माझं फक्त एकच मागणं आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही सर्वानी एका ओळीत येऊन मला नमस्ते म्हणायचं आणि निघून जायचं बस एवढंचा” उंदरांनी आनंदान हे मान्य केलं.

मनीमावशी रोज एका सिंहासनावर बसायची. सगळे उंदीर एका ओळीत तिच्यासमोर यायचे आणि सलाम करून निघून जायचे. जो उंदीर ओळीच्या शेवटी असायचा, त्याला ती झडप घालून पकडायची. बाकीच्या उंदराना काही पत्ताच लागायचा नाही.
उंदरांच्या या टोळीत अंभू आणि शंभू नावाचे दोन हुशार उंदीर पण होते. त्यांच्या लक्षात आलं की उंदरांची संख्या कमी कमी होत चालली आहे. दोघांनी मिळून एक बेत आखला असून रांगेत पहिल्या जागेवर उभं राहायचं आणि शंभू रांगेत शेवटच्या जागी जायचं असं त्यांनी ठरवल

सगळ्यात पुढे असलेल्या अंभूनं मागे वळून मोठ्यानं विचारल, “रामू, तू कुठे आहेस?” शंभून लगेच उत्तर दिल. “अभू, मी इथेच आहे. अशा प्रकारे ते चालताना एकमेकांना हाका मारत जाऊ लागले.

मनीमावशीला त्या दिवशी काहीच करता आलं नाही. तिनं जर रांगेतला शेवटचा उंदीर पकडला असता, तर लिया डाय सगळ्यानाच कळला असता. त्या दिवशी मांजरी उपाशीच राहिली. तिला झोपही आली नाही

मांजरीनं विचार केला, ‘आजचा प्रकार चुकून झाला असेल. उद्या

मात्र काही झालं तरी मी शेवटचा उंदीर पकडणारच

दुस-या दिवशी शंभू रांगेत सर्वात पुढे उभा राहिला आणि अंभू रांगेच्या शेवटी. एकमेकांना हाका मारतच ते रांगेत चालत राहिले. त्या दिवशी पण तिला उंदीर पकडता आलाच नाही.

“आणखी एक दिवस वाट पाहूया असा विचार करून मनीमावशीनं आपला राग आवरला.

त्या रात्री अभू आणि शंभून आपल्या बरोबरच्या सगळ्या उंदराना “मनीमावशीच्या चेह-यावर थोडा जरी राग दिसला, तरी लगेच पळून जा.”

सावध रहायला सांगितलं,

दुस-या दिवशी परत सगळे उंदीर रांगेने निघाले. नेहमीप्रमाणेच अभून हाक मारली, “शंभू, तू कुठे आहेस?”

बसा आता मात्र मनीमावशीचा राग अनावर हा तिनं उदरावर

एकदम झडप घातली.

उंदीर तर आधीपासूनच तयार होते. ते असे थोडेच फसणार होते। विजेच्या वेगानं पळाले आणि लपून बसले। मनीमावशी मात्र आपले दात ओठ खात बसून राहिली

तिबेटी लोककथा

 


 

 

रिकामी कुंडी 

Marathi goshta । मराठी गोष्टी ।  Marathi ghost

 

चीनमध्ये पिंग नावाचा एक मुलगा रहात होता. त्याला फूल खूप आवडत असत. त्यानं लावलेली सगळी झाडं खूप खानवाची आणि त्य टवटवीत फुलं फळंही यायची

त्या देशाच्या राजालाही फूल अतिशय आपल्या फुलझाडांची देखरेख तो स्वतः करायचा त्याच्या राज्यात सगळीकडे भरपूर फुल असायची आणि त्यांचा सुगंध सर्वत्र दरवळत असायचा.

एकदा राजानं आपल्या मंत्र्याला सांगितलं, “मी आता म्हातारा झालो आहे. आता मला नवा राजा निवडावा लागेल. राज्यातल्या सगळ्या मुलांना दरबारात बोलवा. ”

काही दिवसांनी सगळी मुलं राजवाड्यात जमली. राजानं त्यांना सांगितलं, “हे पहा मुलांनो, मी तुम्हाला सगळयाना अतिशय सुंदर फुलांच्या बिया देणार आहे. त्यातून ज्याच्या झाडाला सर्वात सुंदर फुलं येतील, तो आपल्या देशाचा राजा होईल.” मग राजानं सर्वांना बिया वाटल्या.

लहानग्या पिंगनं आनंदानं बिया घेतल्या. घरी येऊन त्यानं एका कुंडीत त्या बिया लावल्या. त्याची खात्री होती की त्याच्या झाडालाच सगळ्यात सुंदर फुलं येतील. तो रोज त्यांना पाणी घालायचा. त्यांना कोंब फुटण्याची तो अगदी आतुरतेनं वाट पहात होता.

होता होता बरेच दिवस झाले. पण अंकुर फुटलेच नाहीत. पिंगला आता फारच काळजी वाटू लागली. कुंडीतली माती बदलून त्यानं सगळ्या बिया एका मोठ्या कुंडीत लावल्या, पण तरीही अंकुर काही आलेच नाहीत. जवळ जवळ एक वर्ष होत आलं.

राजमहालात परत जाण्याचा दिवसही आला. सगळी मुलं नवे कपडे घालून तयार झाली. रंगीबेरंगी फुलांच्या कुंड्या घेऊन सगळे दरबारात जायला निघाले.

पण पिंग फार उदास होता. ‘फक्त माझ्याच कुंडीत झाड का नाही आलं? माझी रिकामी कुंडी पाहून सगळी मुलं मला चिडवतील या विचारानं त्याला राजमहालात जावंसच वाटेना.

पिंगच्या वडिलांनी त्याला धीर देत म्हटलं, “नेहमी तुझी झाडं सगळ्यात चांगली येत असत. या वेळेस देखील तू काळजीपूर्वक सर्व प्रयत्न केले होतेस. तेच पुरेसं आहे. जा, राजमहालात जाऊन राजाला भेटून ये.”

मुलांनी आणलेली एकूण एक फुलझाडं राजानं लक्ष देऊन पहिली. मग तो पिंगकडे आला आणि विचारलं, “तू रिकामी कुंडी का घेऊन आला आहेस?”

पिंग रडू लागला. तो म्हणाला, “तुम्ही दिलेलं बी मी लावलं होतं. रोज पाणी सुद्धा घालत होतो. पण त्याला अंकुर आलाच नाही. मी माती पण बदलली. तरीही झाड आलंच नाही.

राजा हसू लागला. मुलांकडे पाहून म्हणाला, “हाच या देशाचा राजा होण्यासाठी योग्य आहे. सर्वानाच आश्चर्य वाटलं.

राजानं सांगितलं, “तुम्ही सर्वानी बी कुठून आणलंत ते मला माहित नाही. मी ज्या बिया दिल्या होत्या. त्या सर्व भाजलेल्या होत्या. त्यांमधून झाड येणं शक्यच नव्हतं. पिंगच्या प्रामाणिकपणाचं मात्र मला कौतुक वाटतं.”

चिनी लोककथा

 


 

 

जादूचा आंबा

 

Marathi goshta । मराठी गोष्टी ।  Marathi ghost
Marathi goshta । मराठी गोष्टी

 

बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलात आंब्याचं एक खूप मोठं झाड होतं. झाडाच्या सर्वात उंच फांदीवर एक पिकलेला आंबा होता. तो काही साधासुधा आंबा नव्हता, तो होता एक जादूचा आंबा !

एक दिवशी जोराचा वारा आला आणि आंब्याचं झाड जोरजोरात हलवून गेला. जादूचा आंबा धपकन जमिनीवर पडला. नशिबानंच त्याला काही लागलं नाही.

जादूचा आंबा फारच खूष झाला. त्याला आता इकडे तिकडे फिरता येणार होतं. हळू हळू तो गावाजवळ पोचला. सगळ्यात आधी त्याला एक बकरी भेटली. ती म्हणाली, “अरे, थांब थांबा मला तुला खायचंय । ”

जादूचा आंबा जोरात हसला आणि गाऊ लागला,

“मी आहे आंबा जादूचा ,जगभर फिरेन सकाळ दुपार ,तुझ्या हाती मी नाही लागणार”

उड्या मारत मारत आंबा निघून गेला आणि बकरी त्याच्या मागे मागे जाऊ लागली. रस्त्यात एक मुलगा पतंग उडवत होता. तो आंब्याला म्हणाला, “अरे, थांब थांब मला तुला खायचंय!”

आंबा परत हसला आणि गाऊ लागला, मी आहे आंबा जादूचा जगभर फिरेन सकाळ दुपार तुझ्या हाती मी नाही लागणार

आंबा आणखीच जोरात पळू लागला आणि गेला एका बागेत. बकरी आणि मुलगा पण त्याच्यामागे पळू लागले. त्यावेळी बागेत काही मुली खेळत होत्या. त्यांनीही आंबा पाहिला आणि ओरडल्या, “अरे, थांब थांब! आम्हाला तुला खायचंय!”

आंबा घरंगळत दूर गेला आणि

गाऊ लागला,

मी आहे आंबा जादूचा , जगभर फिरेन सकाळ दुपार तुमच्या हाती मी नाही लागणार”

बकरी, मुलगा आणि मुली सगळेच आंब्यामागे धावू लागले. पण आंबा , कुणालाच मिळाला नाही.

आता आंबा दमला होता. उंच वाढलेल्या गवतात तो लपून बसला. सगळ्यांनी आंब्याला खूप शोधलं पण आंबा सापडला नाही म्हणून काही वेळानं सगळे निघून गेले.

आंबा दमला होता, त्याला लागली झोप खूप महिने तो झोपूनच राहिला. अचानक एक दिवशी त्याला जाग आली. त्यानं पाहिलं तर त्याच्यावर सोनेरी सूर्यकिरण पडले होते. तो आता बदलला होता. त्याच्यातून अंकुर आले होते.

जादूच्या आंब्याचं आता झाड होऊ लागलं होतं.

पापुआ न्यू गिनीची लोककथा

 

Video Credit : Kids Planet Youtube chanel

 

  • marathi goshta , मराठी गोष्टी ,
  • goshta marathi , goshti marathi story 
  • chimni chi goshta , goshti dakua marathi madhe 
  • chimni kavla chi goshta
  • Marathi goshta । मराठी गोष्टी ।  Marathi ghost

 

♣ आमच्या इतर काही गोष्टीच्या पोस्ट : 

Marathi Stories For Reading
Marathi Story Marathi Bodh Katha

 


 

मित्रांनो या माहिती मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

 

धन्यवाद

1 thought on “Marathi goshta । मराठी गोष्टी ।  Marathi ghost”

Leave a Comment