Marathi Stories For Reading

Marathi Stories For Reading

Marathi Stories For Reading

Marathi Short Stories

 

 १ ) राजा जनक आणि अष्‍टावक्र ऋषि

Marathi Short Stories
Marathi Short Stories , Marathi Stories For Reading

राजा जनक राजा असूनही त्‍यांना राजवैभवात आसक्ती नव्‍हती. लोभ मोहापासून ते सदैव दूर राहात. विनम्रता त्‍यांच्‍या स्‍वभावात होती. त्‍यामुळे ते आपले दोष दूर करण्‍याचा प्रयत्‍न करत असत. आत्‍मशोध घेण्‍याचा त्‍यांचा सदैव प्रयत्‍न सुरुच असे.

एकदा ते नदीकाठावर एकांतात बसून ‘सोऽहम’ चा जप करत होते. मोठ्या आवाजात त्‍यांचा जप सुरु होता. तेवढ्यात तेथून अष्‍टावक्र ऋषि चालले होते. ते परमज्ञानी असल्‍याने त्‍यांना राजा जनकाचा जप ऐकून ते जागेवरच थांबले व एका हातात छडी घेऊन थोडे दूर अंतरावर उभे राहिले. मग मोठ्या आवाजात तेही बोलू लागले,’’माझ्या हातात कमंडलू आहे आणि माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनकाच्‍या कानात ऋषींच्‍या बोलण्‍याचा आवाज गेला पण त्‍याने आपला जप सुरुच ठेवला.

अष्‍टावक्रही ही गोष्‍ट जोरजोरात बोलत राहिले. शेवटी जनकाने जप थांबवून विचारले,’’मुनिवर, हे तुम्‍ही मोठमोठ्याने काय सांगत आहात’’ अष्‍टावक्र जनकाकडे पाहून हसले आणि म्‍हणाले,’’माझ्या हातात पाण्‍याचा कमंडलू आहे, माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनक आश्‍चर्यात पडला व विचारू लागला,’’ महाराज अहो हे तर मलाही दिसत आहे की तुमच्‍याजवळ छडी आणि कमंडलू आहे पण हे दिसत असतानासुद्धा तुम्‍ही मोठ्याने ओरडून का सांगत आहात.

’’ तेव्‍हा अष्‍टावक्रांनी जनक राजांना समजाविले,’’ राजन, माझ्याजवळ असणारा कमंडलू आणि छडी दिसत असतानासुद्धा ओरडून सांगणे हे जसे मूर्खपणाचे आहे तसेच तुमचे सोऽहम उंच आवाजात म्‍हणणे आहे. मंत्राला घोकण्‍याने काहीच फळ मिळत नाही. मंत्र आत्‍मसात करणे किंवा त्‍याला आतल्‍या चेतनेशी जोडल्‍यावरच त्‍याचे फळ मिळते.’’

तात्‍पर्य :- कोणतेही ज्ञान घोकंपट्टी करून मिळवण्‍यापेक्षा ते आत्‍मसात करण्‍याचा प्रयत्‍न झाला पाहिजे. कोरडे पाठांतर काहीच कामाचे नसते.


 

२ )  राग/ क्रोध

 

Marathi Stories For Reading
Marathi Stories For Reading ,Marathi Short Stories ,Marathi Bodh katha

 

एकदा भगवान श्रीकृष्‍ण, बलराम आणि सात्‍यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्‍या वेळी काहीच न कळाल्‍याने रस्‍ता चुकले. जंगल घनदाट होते, तेथे न पुढे जाण्‍याचा मार्ग दिसत होता ना मागे येण्‍याचा. तेव्‍हा तिघांनीही असा निर्णय घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्‍थ व्‍हायचे. तिघेही दमलेले होते पण प्रत्‍येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्‍याचे ठरवले.

पहिली पाळी सात्‍यकीची होती. सात्‍यकी पहारा करू लागला तेव्‍हाच झाडावरून एका पिशाच्‍चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्‍च झाडावरून खाली उतरले व सात्‍यकीला मल्‍लयुद्धासाठी बोलावू लागले. पिशाच्‍चाने बोलावलेले पाहून सात्‍यकी संतापला व क्रोधाने पिशाच्‍चावर धावून गेला. त्‍याक्षणी पिशाच्‍चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्‍लयुद्ध झाले. पण जेव्‍हा जेव्‍हा सात्‍यकीला क्रोध येई तेव्‍हा तेव्‍हा पिशाच्‍चाचा आकार मोठा होई व ते सात्‍यकीला अजूनच जास्‍त जखमा करत असे. एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व त्‍यांनी सात्‍यकीला झोपण्‍यास सांगितले.

सात्‍यकिने त्‍यांना पिशाच्‍चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्‍चाने मल्‍लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्‍चाशी लढायला गेले तर त्‍याचा आकार हा वाढलेला त्‍यांना दिसून आला. ते जितक्‍या क्रोधाने त्‍याला मारायला जात तितका त्‍या पिशाच्‍चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्‍णाची होती. पिशाच्‍चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्‍णांना आव्‍हान दिले पण श्रीकृष्‍ण शांतपणे मंदस्मित करत त्‍याच्‍याकडे पहात राहिले.

पिशाच्‍च अजून संतापले व मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्‍णांना बोलावू लागले पण श्रीकृष्‍ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले व एक आश्‍चर्य झाले ते म्‍हणजे जसे जसे पिशाच्‍चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्‍याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट झाली शेवटी आकार लहान होत होत पिशाच्‍चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्‍णांनी अलगद त्‍याला आपल्‍या उपरण्‍यात बांधून ठेवले. सकाळी सात्‍यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्‍णांनी तो किडा त्‍यांना दाखविला व म्‍हणाले,’’ तुम्‍ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्‍हता कारण हे क्रोधाचे पिशाच्‍च होते. त्‍याला शांती हेच औषध आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्‍याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो. मी शांत राहिलो म्‍हणून हे पिशाच्‍च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे.’’

तात्‍पर्य : क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो. क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते.


 

३ ) काका कालेकर

काका कालेकर उच्‍च कोटीचे चिंतक, लेखक होते. त्‍यांची विचारक्षमता प्रत्‍येक विषयात खोल आणि व्‍यापक होती. एकदा काका आजारी पडले. त्‍यांच्‍या आजारपणाची वार्ता प्रसिद्ध होताच अनेक मित्रमंडळी आणि शुभचिंतक त्‍यांना भेटायला आले. काका सर्वांशी मोठ्या आत्‍मीयतेने भेट देत असत. एके दिवशी काकांना भेटायला त्‍यांचे काही मित्र आले होते.

चर्चेदरम्‍यान दुस-या एका मित्राचा फोन काकांना आला. त्‍याने काकांना विचारले,’’आपण आजारी असल्‍याचे मी ऐकले आहे, आता कसे वाटते आहे’’ काका म्‍हणाले,’’ होय, थोडा आजारी पडलो होते मात्र जेव्‍हापासून मी नव्‍याने तपासणी केली आहे तेव्‍हापासून मला बरे वाटायला लागले आहे’’ हे ऐकताच मित्राने नव्‍या तपासणीविषयी जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न केला.
तेव्‍हा काका म्‍हणाले,’’ मी आजाराबाबत विचार करणेच सोडून दिले आहे आणि हा पर्याय माझ्या आजारावर उपाय म्‍हणून सिद्ध झाला आहे.

एखादा पाहुणा चांगला पाहुणचार केल्‍यामुळे जास्‍त दिवस मुक्काम करतो तेच त्‍याच्‍याशी उलटपक्षी वागले असता म्‍हणजेच घरातल्‍यांशी जसे वागतो, तशी साधी वागणूक मिळाली, विशेष पाहुणचार न मिळाल्‍यास तो अशा घराचा रस्‍ता धरतो जिथे चांगले आदरातिथ्‍य केले जाईल. आजाराबाबतीतही माझा हाच विचार आहे.’’ काकांच्‍या नव्‍या उपचार पद्धतीवर मित्रांसह सर्वच लोक सहमत झाले.

तात्‍पर्य :- आजारापेक्षा जास्‍त त्‍याची चिंता तणाव वाढवते. त्‍यामुळे कोणत्‍याही शारीरिक अस्‍वस्‍थतेला सकारात्‍मक विचाराने घेण्‍याचा प्रयत्‍न करा.


 

४ ) धर्म

एकदा एका राजाने दवंडी पिटवली की जो कोणी मला सर्वश्रेष्‍ठ धर्माचे महत्‍व समजावून सांगेल त्‍याला मी मोठे बक्षीस देईन व तो धर्म मी स्‍वीकारेन. ही वार्ता ऐकताच सगळीकडे मोठमोठे धर्मगुरु, धर्मोपदेशक, आचार्य राजाला आपल्‍या धर्माचे महत्‍व समजावून सांगण्‍यासाठी येऊ लागले. ते सर्वच जण एकच गोष्‍ट आठवणीने करत होते की स्‍वत:च्‍या धर्माचे महत्‍व सांगताना मात्र दुस-याला धर्माला कमी लेखत होते. दुस-याच्‍या धर्माची निंदानालस्‍ती करत होते. यातून एकच झाले की, राजाला काहीच कळेना की कोणता धर्म सर्वश्रेष्‍ठ आहे व त्‍यामुळे तो दु:खी होत होता. पण त्‍याने शोध सुरुच ठेवला. वर्षानुवर्षे हाच क्रम चालू राहिला.

राजा वृद्ध होत चालला. शेवटी राजा एका साधूच्‍या दर्शनास गेला. तेथे गेल्‍यावर त्‍याने साधूला नमस्‍कार केला व म्‍हणाला,”साधूमहाराज, मी सर्वश्रेष्‍ठ धर्माच्‍या शोधात आहे पण आजपर्यंत मला सर्वश्रेष्‍ठ धर्म कोणता हेच कळाले नाही.” साधूने राजाकडे पाहिले व म्‍हणाले,”सर्वश्रेष्‍ठ धर्म तर जगात अस्तित्‍वातच नाहीत. जगात एकच धर्म आहे आणि बाकी सगळे हे त्‍या धर्माला फुटलेले अहंकार आहेत. धर्म तर तोच असतो जिथे व्‍यक्ती निष्‍पक्ष असतो, पक्षपात करणा-या मनात धर्म राहूच शकत नाही.

” साधूचे हे बोलणे ऐकून राजा प्रभावित झाला. साधू पुढे जाऊन राजाला म्‍हणाला,”राजन, चला आपण नदी पार करून पलीकडे जाऊया” नदीतीरावर दोघे पोहोचले, त्‍यांनी तिथे अनेक सुंदर नावा (होडया) पाहिल्‍या. साधू राजाला म्‍हणाले,” राजे, चला आपण एका सर्वश्रेष्‍ठ नावेतून पैलतीर गाठूया” प्रत्‍येक नावेपाशी जाताच साधू त्‍या नावेबद्दल काही ना काही चुक दाखवित असे व पुढे जात असे. असे करता करता दुपार झाली. राजाला भूक लागली व त्रासून राजाने साधूला म्‍हटले,”महाराज आपल्‍याला नावेतून फक्त पलीकडे जायचे आहे, अहो इतकी छोटी नदी आहे की पोहूनसुद्धा आपण पटकन पलीकडे पोहोचून जाऊ मग त्‍याची इतकी चर्चा कशाला” साधूने राजाकडे पाहिले व म्‍हणाले,” राजन, हेच तर मला तुम्‍हाला सांगायचे आहे.

धर्माला नाव नसतेच, धर्म आपल्‍याला स्‍वत:ला पोहून पार करायचा असतो. दुसरा कोणी आपल्‍याला धर्मापलिकडे पोहोचवू शकत नाही. आपल्‍यालाच जावे लागते.” राजा सर्व काही समजून चुकला.

 


Marathi Bodh katha

Marathi Stories For Reading , Marathi Short Stories
Marathi Stories For Reading , Marathi Bodh katha ,Marathi Short Stories

५ ) एक वेडा

एका वेड्यांच्‍या हॉस्पिटलमध्‍ये वेड्यांना बाहेर पडेपर्यंत म्‍हणजेच पूर्ण बरा झाला आहे की नाही हे पाहण्‍यासाठी अनेक मानसशास्‍त्रीय चाचण्‍यांना तोंड द्यावे लागत असे. त्‍यातील शेवटच्‍या चाचणीमध्‍ये वेड्यासमोर एक नवे कोरे चकचकीत पाच रूपयांचे नाणे आणि एक मळकट पन्‍नास रूपयांची नोट ठेवली जाई. त्‍यातील फक्त एकच गोष्‍ट त्‍याला उचलण्‍यास सांगितली जाई. वेड्याने पन्‍नास रूपये उचचले की त्‍याला डिसचार्ज दिला जाई व तसे न केल्‍यास त्‍याला पुन्‍हा एकदा चाचण्‍या पार करायला सांगितल्‍या जात. गरज पडल्‍यास पुन्‍हा उपचारासाठीही पाठविले जाई.

हॉस्‍पीटलमधील एक वेडा शेवटच्‍या चाचणीपर्यंत सगळ्या चाचण्‍या पटापट पार करत असे मात्र शेवटच्‍या चाचणीला मात्र नापास होत असे. अनेकदा असे घडल्‍यावर चाचणी घेणारे डॉक्‍टर कंटाळले व त्‍यांनी एक युक्ती केली पुढच्‍या वेळेला त्‍या वेड्यासमोर एक पाच रूपयांची जुनी नोट व पन्‍नास रूपयांची कोरी करकरीत नवी नोट ठेवली तरीही त्‍या वेड्याने पाच रूपयांचीच नोट उचचली. हे पाहून डॉक्‍टर आश्‍चर्यचकित झाले व ओरडले,” अरे मूर्खा, सगळ्या चाचण्‍या आरामात पार करतोस आणि शेवटच्‍या चाचणीत मात्र कायम चुकतोस.

तुला पाच आणि पन्‍नास यातील फरक कळत नाही काय” वेडा शांतपणे म्‍हणाला,” ते मला चांगलं कळतं डॉक्‍टरसाहेब, पण इथून बाहेर पडलो की, मला रोजचा खर्च स्‍वत:लाच करावा लागणार आहे. त्‍यापेक्षा पाच रूपयांचे नाणे उचचले की, मला इथून बाहेर पडावे लागत नाही, पाच रूपयेही मिळतात आणि खाणेपिणेराहणे सगळे काही फुकटात होते. मग मी पन्‍नास रूपयांची नोट उचलून स्‍वत:च्‍या पायावर धोंडा पाडून का म्‍हणून घेऊ”

  • Best 5 Marathi Stories For Reading
  • Bodh Katha moral stories in marathi
  • Marathi Pratilipi story
  • Small Story in marathi with moral
  • Marathi Story Marathi Bodh Katha 

 

अधिक माहितीसाठी ..


 

मित्रांनो या माहिती मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

 

धन्यवाद

1 thought on “Marathi Stories For Reading”

Leave a Comment