माझे पहिले भाषण निबंध

माझे पहिले भाषण निबंध
माझे पहिले भाषण निबंध

 

आमच्या शाळेत विविध स्पर्धा नेहमी होत असतात. त्या आंतरशालेय स्त्री झिम्मड गर्दा उडालेली असते. आमचे अनेक दोस्त वैयक्तिक पारितोषिके, साधिका मिळवून आणत असतात. त्यायोगे त्यांचा आणि शाळेचा नावलौकिक वाढत असतो. या सान्या स्पर्धाच्या वावटळीत माझे काम असे श्रीत्याचे आणि या वाजवण्याचे. मी कधी कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला नव्हता आणि घेणाराही नव्हतो. पुण स्वाभिमान दुखावला गेल्यामुळे आणि संपूर्ण वर्गाच्या इज्जतीचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे मी भाषणाला उभा राहिलो आणि चक्क मी माझे पहिले भाषण ठोकले.

त्याचे असे झाले की, आमच्या इयत्ता नववीच्या दोन तुकड्यांत म्हणजे ‘अ’ आणि ‘व’ मध्ये नेहमी प्रत्येक गोष्टीसाठी चुरस असते. अभ्यास, खेळ, इतर कला स्पर्धा, अभिनय, वक्तृत्व अशा स्पर्धात ही चढाओढ चालू असते आणि अशी चढाओढ लावण्यात आमच्या शिक्षकांनाही विशेष रस वाटत असावा. त्यांचे म्हणणे असे की, त्यामुळे आमच्यातील सुप्त गुणांचा आविष्कार होतो. खरेखोटे परमेश्वर जाणे ।

त्यामुळेच की काय, आमच्या वर्गातील कर्तृत्ववान असलेले खंदे वक्ते बाहेरगावी वक्तृत्व स्पर्धेला गेले असताना सरांनी वक्तृत्वाच्या वर्गीय स्पर्धा जाहीर केल्या. वर्गातील उरलेला फर्डा वक्ता आजारी पडला होता. त्यामुळे या लढाईत आमच्या वर्गाची खिंड लढवण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली.

आजवर मी सभेत कधीच उभा राहिलो नव्हतो. अभ्यास आणि वाचन बरे असल्याने भाषणाचे मुद्दे काढणे मला सहज शक्य होते.  पण शे-दोनशे मुलांसमोर उभे राहून भाषण ठोकणे या नुसत्या कल्पनेच माझे पाय थरथरू लागले. अशा मनःस्थितीतच मी भाषणासाठी उभा राहिलो. भाषणाचा विषय होता , ”आम्ही आमच्या वाडवडीलांपेक्षा सुखी आहोत काय ?”

खच्चून भरलेल्या त्या सभागृहात प्रथम व्यासपीठावर उभा राहिलो, तेव्हा सर्व सभागृहच आपल्याभोवती फिरत आहे, असा मला भास झाला. घशाला कोरड पडली. भर दुपारची वेळ असतानाही अंधार वाटू लागला. क्षणभर आवाज फुटेना पण त्याच क्षणी लज्जित झालेल्या आपल्या वर्गाचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले आणि माझ्या भाषणाला सुरवात झाली. एकापाठोपाठ एक मुद्दे सुचत गेले.

आजच्या पिढीच्या कर्तृत्वाच्या कथा सांगून आम्ही आमच्या वाडवडलांपेक्षा सुखी आहोत, हाच माझा आशावादी दृष्टिकोन मी मांडला होता. माझ्यापूर्वी बोललेल्या वक्त्यांचे मुद्दे मी खोडले. पाच मिनिटे केव्हा संपली ते कळलेच नाही आणि माझ्या पहिल्याच भाषणात मी बक्षीसपात्र वक्ता ठरलो..

टीप :

1 ) माझे पहिले भाषण हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 

 

अधिक माहितीसाठी ..


 

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद 

 

 

1 thought on “माझे पहिले भाषण निबंध”

Leave a Comment