Teacher Day Essay in Marathi | शिक्षक दिन निबंध मराठी

 

Teacher Day Essay in Marathi | शिक्षक दिन निबंध मराठी

 

Teacher Day Essay in Marathi | शिक्षक दिन निबंध मराठी
Teacher Day Essay in Marathi | शिक्षक दिन निबंध मराठी

 

मित्रानो , या पोस्ट मध्ये शिक्षक दिन निबंध मराठी लेखन / Teacher Day Essay in Marathi 100 ते 400 शब्दात निबंध लेखन करणार आहोत . हा निबंध 7 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्याना परीक्षेत वैचारिक निबंध म्हणून विचयाराला जातो त्यामुळे निबंध नीट वाचा.

मित्रांनो आपण दरवर्षी पाच सप्टेंबरला भारतात शिक्षकदिन साजरा केला जातो. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती ‘डॉ. राधाकृष्णन’ यांचा हा जन्मदिवस. डॉ. राधाकृष्णन हे एक प्रसिद्ध शिक्षक होते म्हणून पाच सप्टेंबर या त्यांच्या जन्म दिन दिवशी आपण हा शिक्षकदिन पाळला जातो.

दरवर्षी आमच्या शाळेत शिक्षकदिनाला शाळेची सर्व जबाबदारी आम्ही विद्यार्थी घेतो. वरच्या वर्गातील मुले खालच्या वर्गात जाऊन अध्यापनाचे काम करतात. वर्गातील सर्व मुलांना शांत ठेवून कोणत्याही विषयातील एखादा भाग समजावून देणे हे किती अवघड काम आहे, हे त्यावेळी समजते .

या दिवशी विद्यार्थ्यांपैकीच कोणीतरी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिपाई झालेले असतात. ते आपापली कामे मोठ्या रुबाबात करत असतात. शाळेतील इतर विदयाथ्यपिक्षा आपण वेगळे दिसावे असाच पोशाख त्यावेळी विदयार्थ्याने धारण  केलेला असतो. शाळेची घंटा वाजवताना अप्रूप व नवल  वाटते.

अध्यापनाचे काम करताना नकळत आपल्या आवडत्या शिक्षकांचे अनुकरण केले जाते. शिक्षकांनाही ते पाहताना मजा वाटते. मग ही विद्यार्थि-शिक्षकांची शाळा नेहमीपेक्षा लवकर सुटते, कारण आज शिक्षकांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केलेले असतात.
शिक्षकांचा सत्कार केला जातो. आदर्श शिक्षकाची निवड केली जाते व त्याचाही विशेष गौरव केला जातो.

दरवर्षी पाच सप्टेंबरला राष्ट्रपतींकडूनही आदर्श शिक्षकांची नावे जाहीर होतात व त्यांचा सत्कार होतो. असाच सत्कार राज्याराज्यांतून व नगरानगरांतूनही केला जातो. शिक्षक देशासाठी, राज्यासाठी, गावासाठी जे महान काम करतात, त्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. त्यामुळे कोणीही या कामात मागे राहत नाही.

आपल्याकडे फार पूर्वीपासून गुरुपौर्णिमेला गुरूविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. पाच सप्टेंबरला आपण हीच प्राचीन परंपरा  आपण विद्यार्थी पुढे नेत असतो. आणि यांचा मला फार आनंद देखील आहे .

टीप :

1 )Teacher Day Essay in Marathi | शिक्षक दिन निबंध मराठी हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 

वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता :

शिक्षक दिवस पर निबंध (Teachers Day essay in hindi)
Teachers Day Essay शिक्षक दिन निबंध
शिक्षक दिवस पर निबंध (Teacher’s Day Essay in Hindi)
Teacher’s Day : शिक्षक दिन माहिती,मराठी हिंदी इंग्रजी सोपे भाषण

 

आमच्या इतर निबंध पोस्ट :

Mobile Che Manogat Marathi Nibandh। मोबाईलचे मनोगत मराठी निबंध

Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh। मला पंख असते तर मराठी निबंध

माझी शाळा निबंध मराठी। Majhi Shala Nibandh Marathi

माझा आवडता कवी निबंध मराठी । Majha Avadata Kavi Nibandh Marathi

संगणक काळाची गरज निबंध मराठी । Sanganak Kalachi Garaj Nibandh In Marathi

गुरु शिष्य परंपरा निबंध । Guru Shishya Paranpara Essay 


 

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद 

 

Leave a Comment