Positive Marathi Poems on Life। जीवनावर सकारात्मक कविता

Positive Marathi Poems on Life। जीवनावर सकारात्मक कविता

Positive Marathi Poems on Life। जीवनावर सकारात्मक कविता
Positive Marathi Poems on Life। जीवनावर सकारात्मक कविता

 

Positive Marathi Poems on Life जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या सुंदर लेखात तुम्ही मराठीत सर्वोत्कृष्ट मराठी प्रेरणादायी कविता  पाहायला मिळतील.प्रत्येकाच्या जीवनात सुखदुःखाचे प्रसंग येत असतात हेच प्रसंग काव्यात ओवलेले या लेखात दिसतील.जीवनावर मराठी कविता {Best Positive Marathi Poems on Life} आणि जीवनावर चारोळी {Marathi charolya on life} वाचून तुम्हाला हि खूप आनंद होईल.तर आशा आहे कि आपल्याला ही पोस्ट ( जीवनावर सकारात्मक कविता ) जरूर आवडले असतील.

आपल्या स्टेटस ठेवण्यासाठी Positive Marathi Poems on Life। जीवनावर सकारात्मक कविता ही पोस्ट आपल्या मित्र मैत्रिणींना पाठवायला विसरू नका.

.

 

एक प्रयत्न अजून कर .. 

 

अडला असशील हजारदा,
पडला असशील हजारदा
पराभवाच्या भयाण रात्री,
रडला असशील हजारदा
पण झाले गेले अता विसर,
मूठ आवळ, अश्रू आवर
लक्ष्यावरती रोख नजर

अन् एक प्रयत्न अजून कर!
एक प्रयत्न अजून कर!

संकट गगनी गडगडते,
उरी समस्या कडकडते
तना-मनाला चिरा पडूनी,

उभे चराचर डगमगते
मग तूही त्रिशूल डमरू धर,
डमडम डमडम डमडम कर
आरूढ हो तू सर्वावर अन्
प्रलयंकारी तांडव कर

एक प्रयत्न अजून कर!
एक प्रयत्न अजून कर!

वाट समुद्री बिकट अती
अन् लाटांची नाग गती
अपमानाने, हेटाळणीने,

तुझी बहकली नाव किती
विस्फोटाने तूही उसळ,
खळखळ खळखळ तूही खवळ
स्वार होऊनी लाटांवरती.
कर स्वतःला दृढ-अढळ

एक प्रयत्न अजून कर !
एक प्रयत्न अजून कर!

पहा आग ही धगधगते.
ऊष्ण झळाही झगझगते
उदासिनता, अती जिर्णता,
असहायता ही भगभगते
या अग्नीला ध्वस्त कर,
वा स्वतःला उध्वस्त कर
जन्म घेऊनी राखेमधूनी,
पुन्हा नव्याने पंख पसर

एक प्रयत्न अजून कर!
एक प्रयत्न अजून कर!

अडला असशील हजारदा,
पडला असशील हजारदा
पराभवाच्या भयाण रात्री,
रडला असशील हजारदा
पण झाले गेले अता विसर,
मूठ आवळ, अश्रू आवर
लक्ष्यावरती रोख नजर

अन् एक प्रयत्न अजून कर!
एक प्रयत्न अजून कर!
एक प्रयत्न अजून कर!

कवी –  धीरज नवलखे

Video credit : Moral Diary Youtube chanel

.

आयुष्य .. 

 

आयुष्यभर सोबत असून,
जवळ कधी बसत नाही.
एकाच घरात राहून आम्ही
एकमेकास दिसत नाही.

हरवला तो आपसातला,
जिव्हाळ्याचा संवाद.
एकमेकास दोष देवून,
नित्य चाले वादविवाद.

धाव धाव धावतो आहे.
दिशा मात्र कळत नाही.
हृदयाचे पाऊल कधी,
हृदयाकडे वळत नाही.

इतकं जगून झालं पण,
जगायलाच वेळ नाही.
जगतो आहोत कशासाठी,
काहीच कसला मेळ नाही.

क्षण एक येईल असा,
घेवून जाईल हा श्वास.
अर्ध्यावरच थांबलेला,
असेल जीवन प्रवास.

अजूनही वेळ आहे,
थोडं तरी जगून घ्या.
सुंदर अशा जगण्याला,
डोळे भरून बघुन घ्या.

कवी – काल्पनिक 

positive marathi poems on life

 

असे जगावे…

असे जगावे, छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला दयावे उत्तर !

नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला दयावे उत्तर !

पाय असावे जमिनावरती, कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती, काळीज काढून देताना
संकटासही ठणकावून सांगावे, ये आता बेहत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला दयावे उत्तर ।

करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना
गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट देताना
स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला दयावे उत्तर ।

कवी – गुरू ठाकूर.

Video credit : Sahaj Bodh youtube channel

 

poem about being positive in life

आयुष्याला द्यावे उत्तर…

असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावुन अत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर..

नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची,
आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची…

असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर..

पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना,
हसू असावे ओठांवरती, काळीज काढुन देताना..

संकटासही ठणकावून सांगावे, आता ये बेहत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर..

करुन जावे असेही काही, दुनियेतुनी या जाताना,
गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटचा देताना..

स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर – कातर,

नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…

कवी : विंदा करंदीकर

a positive poem about life

 

युवक असावा असा .. 

चेहयावर तेज आहे
देहामध्ये शक्ती आहे.
मनामध्ये उत्साह आहे.
बुद्धिमध्ये विवेक आहे.
हृदयामध्ये करुणा आहे.
मातृभूमीवर प्रेम आहे
इंद्रियांवर संयम आहे.
मन ज्याच स्थिर आहे
आत्मविश्वास दृढ आहे.
इच्छाशक्ती प्रबळ आहे.
धाडसाचे बळ आहे.
सिंहासारखा निर्भय आहे.
ध्येय ज्याचे उच्च आहे.
सत्य ज्याचा इश्वर आहे.
व्यसनांपासून मुक्त आहे.
जीवनामध्ये शिस्त अहि.
प्रेमळ ज्याचा सूर आहे.
मानवता हेच कुळ आहे.
दीन-दुबळ्ळ्यांचा मित्र आहे.
सेवेसाठी तत्पर आहे.
देवावरती भक्ती आहे.
जीवनामध्ये नीती आहे.
चरित्र्य ज्याचे शुद्ध आहे.
तोच आदर्श युवक आहे.

-स्वामी विवेकानंद

 

Positive Marathi Poems on Life। जीवनावर सकारात्मक कविता

positive life poem

 

कणा ..

‘ओळखलत का सर मला’ पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी.
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून;
‘गंगामाई’ पाहुणी आली, गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी-बायको मात्र वाचली
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले
कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे. चिखलगाळ काढतो आहे’
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा.’

– कुसुमाग्रज

जखमी मन .. 

आज रस्त्यांवर फिरत आहे घेऊन हे जखमी मन
गल्लो-गल्ली झालो भी बदनाम घेऊन हे जखमी मन

प्रत्येक जागी दरवळतो सुगंध तुझ्या आठवांचा
सौम्य निसर्गात विव्हळतो घाव माझ्या जखमांचा

शोधत होतो वेड्या सारखा प्रत्येक क्षणी मी तुला
डोळ्यात साठून दुखांचा पूर आज या जगातला

तुझ्या आठवणीत माझ्या डोळ्यास डोळा नाही रात्रभर
अश्रू सांडून तळे साचले घरभर

तळमळत होत मन माझं तुझ्या दारी
घेऊन या जखमी मनाची उभारी

आज रस्त्यांवर फिरत आहे घेऊन हे जखमी मन
गल्लो-गल्ली झालो मी बदनाम घेऊन हे जखमी मन

खरच आज मी झालो बदनाम घेऊन हे जखमी मन
घेऊन हे जखमी मन

 – राकेश शिंदे

कसे जगावे…?

‘कसे जगावे … ? ..’ प्रश्न एवढा खटकत राही
शरीर माझे, आत्मा माझा झटकत राही

उभा इथे मी आयुष्याच्या तीरावरती..
क्षणाक्षणाची वाळू खाली सटकत राही

शरीर गेले, तरी न त्याची गाथा सरली
जगास अवघ्या सांगत सत्ये भटकत राही

उगाच माझ्या आयुष्याची क्षेमखुशाली…
विचारून तो येता – जाता हटकत राही..!

कुठे कुणाला दिसला का तो ईश्वर सांगा..
सवाल त्याच्या अस्तित्वाचा लटकत राही..

– सुरेश भट

कशा या जगात मी वावरतोय .. 

आयुष्याबद्दल माझा अनुमान साक्षात जाणवतोय,
ही जाणीव उल्लेखनीय आहे.
वैयक्तिकरित्या मात्र सवेदना गोठवणारी आहे.
‘आयुष्य हे असं असतं तर ?’
‘आयुष्य हे असं असतं तर !’
हाच प्रश्न, हेच उत्तर आहे….

छान आहे उत्तम आहे..
पण तरीही सवेदना गोठवणारे आहे.
कारणही तसंच आहे,
मी ही आता भगव्या देवदुतांच्या तांड्यात ओढला

जातोय… म्हणजे सामाजिक समतोल ठेवणं जमतय.
खरं तर हे त्यांचच म्हणणं आहे.
हळू-हळू ‘माणूस मंडळाचा’ कार्यकर्ता होत गेलोय.
आता माझाही सन्मान, नवा गडी नवा राज
मनगटावर लाल धागा,
अंगठा वगळता बाकी सर्व बोटे ब्रम्हांडावर नियंत्रण ठेवण्यात व्यस्त,
अमावास्या- पौर्णिमा, कमरेला काळा दोरा,
मरीआईला नवस, अंगाऱ्याने भरलेल्या ताईताचा गळफास,

डोंगर दऱ्यांत कुळाचा शोध घेत..वाटेत पौर्णिमेची आंघोळ,

गढुळ पाण्यातच पाप-पुण्यांची खातरजमाई..
अगदी घासुन पुसुन
मीही आता ‘माणूस मंडळाचा धडाडीचा कार्यकर्ता’.
समाजात नाव,
तोंडावर स्तुस्ती (सुस्ती+स्तुती), बॅनरवर मोठा फोटो,
पांढरा सदरा-काळी विजार,
डोळे झाका… डबल मळा
कशा या जगात मी वावरतोय………

कवी .. माहीत नाही

 

  • Positive Marathi Poems on Life , short positive poems
  • poem about positive life , poem on positive attitude
  • poem about being positive in life

 

आमच्या अजून काही कविता पोस्ट …. 

 

 


 

मित्रांनो या कवितांमध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद

 

 

 

3 thoughts on “Positive Marathi Poems on Life। जीवनावर सकारात्मक कविता”

  1. It’s hard to come by knowledgeable people on this topic, however, you seem like you know what you’re talking about! Thanks

    Reply
  2. It’s hard to find knowledgeable people for this topic, but you seem like you know what you’re talking about! Thanks

    Reply

Leave a Comment