भाषा म्हणजे काय ? 

 

भाषा म्हणजे काय ? 
भाषा म्हणजे काय ?

 

एकमेकांसोबत संवाद साधण्यासाठी वापरले जाणारे एकमेव साधन म्हणजे “भाषा “ होय. संवाद साधण्यासाठी फक्त भाषेचाच वापर होतो असं नाही, तर इंद्रियें व शरीराच्या काही भागांचाही वापर केला जातो. पण, तो भाषेएवढा प्रभावी नाही आहे. व्यक्तिचे सामाजिक जीवन हे भाषेवरच आधारित आहे, भाषा नसेल तर आपले सामाजिक जिवन शुन्यात गणले जाते.

पृथ्वीतलावर माणुस हा इतर प्राण्यांच्या तुलनेत अधिक संवेदनशील आणि बुद्धिवान समजला जातो. माणुस सतत स्वतःला व्यक्त करण्याची भूमिका ठेवतो. पूर्वी माणसाला जेव्हा भाषेचं पुरेसे ज्ञान अवगत नव्हतं तेव्हा तो काही सांकेतिक खुणा व विशिष्ठ आवाजाचा संवाद साधण्यासाठी वापर करायचा. पण काळांतराने भाषेचा विकास झाला आणि

भाषा कशाला म्हणतात?

जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मनात निर्माण होणारी भावना लिहून किंवा बोलून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवते तेव्हा त्याला भाषा म्हणतात. परंतू, यामध्ये एक उणीव आहे ती म्हणजे माणसाची भाषा फक्त मानवच समजू शकतो आणि बहुतेक प्राणी प्राण्यांची भाषा समजू शकतात. तथापि, एक गोष्ट अशी आहे मनुष्य आणि प्राणी दोघेही एकमेकांचे हावभाव समजू शकतात.

भाषा, लिपी व स्वरूप

भाषा म्हणजे काय ?

” एखाद्या पुढील व्यक्ती समोर स्वतचे विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. ”

  •  मानवी मेंदूमध्ये भाषा संपादन करण्याचे जे सामर्थ्य असते त्याला भाषिक क्षमता असे म्हणतात.
  • वयाच्या 5 व्या वर्षापर्यंत मूल मातृभाषा आत्मसात करते.
  • भाषा ही ध्वन्यात्मक असते. ध्वनी हे भाषेचे मूलभूत घटक असतात.
  • बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय.
  • भाषा ठराविक कालावधीनंतर व प्रदेशानुसार बदलत जाते; म्हणून भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा देतात.
  • ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे, आकलन या पाच कौशल्यांवर भाषाशिक्षण अवलंबून असते.
  • भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हींचा समावेश होतो. लेखन हे ज्ञान टिकवून ठेवण्याचे साधन आहे.
  • भाषा केवळ संवादाचे साधन नसून साहित्याच्या क्षेत्रात ती एक आत्माविष्काराचे माध्यम आहे.
1) भाषेचे स्वरूप :

1) मातृभाषा : आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला मातृभाषा असे म्हणतात.

2) बोली भाषा : दैनंदिन जीवनात संपर्कासाठी / संवादासाठी आपण जी भाषा वापरतो ती बोली भाषा असते.

3) प्रमाण भाषा : ज्या भाषेचा उपयोग राजकीय, प्रादेशिक, साहित्यीक तसेच शास्त्रीय दृष्टीने केला जातो, ती भाषा प्रमाण भाषा असते.

4) मराठीच्या इतर बोली : वऱ्हाडी, नागपुरी, हळवी, अहिराणी, डांगी, कोकणी

 

भाषेचे खालील दोन प्रकार मानले जातात.

1) स्वाभाविक/ नैसर्गिक (पुरावा नसतो) : बोलणे, हावभाव, पशुपक्ष्यांचे आवाज, नाटक इत्यादी .

2) कृत्रिम/सांकेतिक (पुरावा असतो) : टंकलेखन, लिखाण, अक्षरे, चिन्हे, ध्वनिमुद्रन इत्यादी .

भाषेचे उगमस्थान :

1) मराठी भाषासंस्कृत व प्राकृत ” या भाषांपासून विकसित झाली आहे असे मानले जाते.

2) ‘भाषा ‘ हा शब्द संस्कृतमधील ‘भाष्’ या धातूपासून आला आहे. याचा अर्थ ‘बोलणे’ असा होतो.

लिपी :

लिपी हा शब्द ‘लिंपणे’ या शब्दावरून रूढ झाला आहे.

व्याख्या : आपण ज्या खुणांनी लेखन करतो, त्याला लिपी असे म्हणतात.

भाषा म्हणजे काय ? 

लिपी म्हणजे काय?

आपण  ज्या खुणांनी लिखाण करतो त्याला लिपी असे म्हणाले जाते.

  • मराठी भाषेची लिपी ‘देवनागरी’ असून ती डावीकडून उजवीकडे लिहितात. दिव् या धातूपासून देव हा शब्द तयार झाला आहे. त्याचा अर्थ प्रकाशने असा होतो.
  • मराठी भाषेला प्राकृत, महारठी, देशी, मराठी ही वेगवेगळ्या काळातील नावे आहेत.
  • मराठी, गुजराती, संस्कृत व हिंदी या भाषांची लिपी ‘देवनागरी’ आहे.
  • लिपीच्या शोधाने लेखन शक्य झाले आहे.
  • दक्षिण भारतातील भाषा द्रविडीयन गटातील असून त्यांना अभिजात (मूळ) भाषांचा दर्जा आहे.

 

 मदतीसाठी काही  प्रश्न व उत्तरे 

१ ) मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते ? 

1) बाळशास्त्री जांभेकर

2) दादोबा पांडुरंग

3) विष्णुशास्त्री चिपळूणकर

4) यांपैकी नाही

उत्तर : 3) विष्णुशास्त्री चिपळूणकर

 

२ ) मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते?

१ ) वर्णमाला लिपी

२ ) देवनागरी लिपी

३ ) बालबोध लिपी

४ ) आदर्श लिपी

उत्तर : २ ) देवनागरी लिपी

 

टीप : इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

अधिक माहितीसाठी ..


 

मित्रांनो या माहिती  मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद 

Leave a Comment