व्याकरणाचे महत्त्व व प्रकार किती आहे ?

व्याकरणाचे महत्त्व व प्रकार किती आहे ?

व्याकरणाचे महत्त्व व प्रकार

प्रत्येक भाषेला व्याकरण असते. भाषा निर्मिती होतानाच एका विशिष्ट रचनेनुसार होत असते. प्रथम बोलीभाषा व नंतर लेखी भाषा असे स्वरूप असते. लेखी स्वरूपाने भाषेला स्थिरता प्राप्त होते. साधारणतः 13 व्या शतकापासून मोठ्या प्रमाणात लेखी साहित्य निर्मितीला सुरुवात झाली; परंतु त्यापूर्वीसुद्धा लेखी भाषेच्या अस्तित्वाचे थोड्याफार प्रमाणात पुरावे सापडतात.

मराठी व्याकरणाला दिशा देण्याचे काम खऱ्या अर्थाने इंग्रज व पोर्तुगीजांनी केलेले दिसते. भाषेसाठी व्याकरण अतिशय महत्त्वाचे असते. कारण त्यामुळे भाषा प्रमाणबद्ध रितीने मांडली जाते. सामान्यपणे व्याकरण लेखणाचे आदेशात्मक, वर्णनात्मक, ऐतिहासिक, तौलनी असे प्रकार मानले जातात.

भाषेचे बोलीभाषा व लेखिभाषा असे दोन प्रकार माणले जातात. बोलीभाषेपेक्षा लेखी भाषा अधिक स्थिर असते.

 

व्याकरणाचे प्रकार

  • आदेशात्मक
  • वर्णनात्मक
  • ऐतिहासिक
  • तौलनी

 

असे प्रकार मानले जातात भाषेचे बोलीभाषा व लेखीभाषा असेदोन प्रकार मानले जातात बोलीभाषा पेक्षा लेखी भाषा अधिक स्थिर अडुळून येते .

”संस्कृत आणि तमिळ ” या भाषा भारतातील सर्वांत जुन्या भाषा मानल्या जातात.

  • भारतीय राज्यघटनेच्या कलम 343 नुसार हिंदी तसेच इंग्रजी या संघराज्याच्या व्यवहारांच्या भाषा आहेत.

3) सध्या भारतीय घटनेनुसार देशात बोलल्या जाणाऱ्या 22 प्रादेशिक भाषांना राजकीय/राजभाषेचा दर्जा देण्यात आला आहे.

4) आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओरिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, संथाली, तमिळ, तेलगू, उर्दू इ.

5) प्रत्येक भाषेला तिचा स्वतःचा वैशिष्ट्यपूर्ण इतिहास व परंपरा असते. मराठी भाषेचा विकास संस्कृत- प्राकृत भाषांपासून झाला असला तरी गुजराती, हिंदी, फारशी, अरबी, कानडी व इंग्रजी या भाषांनी मराठी भाषेला अधिक संपन्न बनवण्याचे काम केले आहे.

 

टीप : भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही.

 

  • काही प्रश्न व त्याची उत्तरे 

१ ) खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या भाषांपासून मराठी भाषेचा विकास झाला आहे?

(१ ) कानडी- प्राकृत

२ ) हिंदी-संस्कृत

३ ) इंग्रजी-हिंदी

४ ) संस्कृत-प्राकृत

उत्तर : ४) संस्कृत – प्राकृत 

२ ) भारतीय राज्यघटनेनुसार किती भाषांना राजभाषांचा दर्जा प्राप्त आहे ?

१) २२

२) २४

३) २३

४) २६

उत्तर : १) २२ 

टीप : इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 

अधिक माहितीसाठी ..


 

मित्रांनो या माहिती  मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद 

Leave a Comment