मराठी भाषेचा उगम व इतिहास। Marathi Bhashecha Itihas

मराठी भाषेचा उगम व इतिहास। Marathi Bhashecha Itihas

 

 

मराठी भाषेचा उगम व इतिहास। Marathi Bhashecha Itihas
मराठी भाषेचा उगम व इतिहास। Marathi Bhashecha Itihas

 

 

मराठी भाषा उत्पत्ती विषयी भारत हा महान देश असून विस्तीर्ण भू-प्रदेशाने व्यापलेला आहे. भू- येथील संस्कृतीत विविधता आढळते तसेच अनेक बोलीभाषा येथे बोलल्या जातात. भारतातील भाषा या प्रमुख दोन गटात विभागलेल्या दिसतात.

 

भारतीय भाषांचे गट 

  • इंडो/युरोपीय (इंडो-आर्य भाषा)
  • द्रविडीयन भाषा

युरोप खंडातून आर्यांचे भारतात आगमण याविषयी अनेक मतमतांतरे असली तरी इंडो-आर्यान भाषागट हा सिद्धांत बऱ्यापैकी मान्यताप्राप्त आहे. हे आजपर्यंत विचारलेल्या प्रश्नावरून लक्षात येते. साधरणपणे महाराष्ट्रापासून उत्तरेकडे बोलल्या जाणाऱ्या भाषा या इंडो-आर्यन गटात मोडतात. कारण या भाषेतील शब्द हे आर्यन तसेच मूळ भारतीय शब्द अशा दोन्ही प्रकारचे मिश्रण स्वरूपात आढळतात.

दक्षिण भारतातील भाषा मात्र द्रविडीयन गटात मोडतात. भारतात असे दोन वेगवेगळे भाषिक गट असले तरी लिपीच्या बाबतीत मात्र ब्राह्मी लिपी ही भारतातील सर्व लिपींच्या उगमाचे कारण ठरलेली आहे.

महाराष्ट्राचा विचार केल्यास येथील बहुसंख्य लोकांची मातृभाषा मराठी आहे. ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. तर 1 मे हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. 1मराठी भाषेची लिपी देवनागरी आहे. देवनागरी लिपीचा उगम व विकासाबाबत अनेक मत-मतांतरे असली तरी लोकसेवा आयोगाने विचारलेले प्रश्न व दिलेली उत्तरे यानुसार या लिपीच्या उगमाचा थोडक्यात इतिहास खाली नमुद केला आहे.

 

मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी

 

भारतातील शालेय शिक्षणाला सुरूवात – इंग्रज

महाराष्ट्रासाठी नियोजित अभ्यासक्रमाचा पहिला प्रयत्न 1822 हैदशाळा मंडळी – मुंबई

महाराष्ट्रीय लोकांसाठी विल्यम कॅरी यांनी लिहिलेले व्याकरणाचे पुस्तक द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज (भाषा इंग्रजी)

 

मराठी भाषेसाठी व्याकरणाचा पहिला प्रयत्न जॉर्ज जार्विस यांनी 1824 मध्ये पंडित जगन्नाथ शास्त्री, रामचंद्र शास्त्री, बाळशास्त्री व गंगाधर शास्त्री यांच्याकडून व्याकरण लिहून घेतले. हा मराठी व्याकरणाचा पहिला प्रयत्न होय.

या सर्व पंडित मंडळींचा संस्कृत व्याकरणाचा गाढा अभ्यास होता. त्यामुळे इंग्रजीला आधारभूत मानून या व्याकरणकर्त्यांनी लिहिलेल्या या पुस्तकावर संस्कृत व इंग्रजी अशा दोन्ही भाषांचा प्रभाव दिसतो. वरील चारपैकी गंगाधर शास्त्री फडके यांनी 1836 मध्ये ‘महाराष्ट्र भाषेचे व्याकरण’ हे पुस्तक लिहिले.

हे मराठीतील पहिले मुद्रित व्याकरण होय. 1836 मध्येच बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘बालव्याकरण’ लिहिले; परंतु त्यात तितकीशी प्रगल्भता नव्हती. हे पुस्तक प्रश्नोत्तर स्वरूपात होते.

1836 मध्ये दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिले. दादोबांनी मराठी भाषेच्या व्याकरणासाठी जे योगदान दिले त्यामुळे त्यांना ‘मराठी भाषेचे पाणिनी’ असे म्हणतात.

तर्खडकर, जांभेकर व फडके यांची तिन्ही पुस्तके 1836 मध्येच प्रकाशित झाली; परंतु आद्य व्याकरणकर्ते होण्याचा मान फडकेंना जातो कारण गंगाधर शास्त्री फडके यांचे व्याकरण प्रसिद्ध झाल्यावर तीन महिन्यानंतर तर्खडकरांचे व्याकरण प्रसिद्ध झाले. त्यानंतर 1911 मध्ये दामलेंचे ‘शास्त्रीय मराठी व्याकरण’ व 1952 मध्ये म.पा. सबनीस यांचे ‘आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले.

मराठी भाषेचे जनक कोण आहे?

मराठी भाषेचा अध्य प्रवर्तक महिणभट्ट ज्यांनी लीळा चरित्र लिहिले त्यांना मानतात. मराठी भाषेचा अध्य प्रवर्तक महिणभट्ट ज्यांनी लीळा चरित्र लिहिले त्यांना मानतात.

 

खालील माहितीसाठी हीच पोस्ट पुन्हा वाचा . 

 

मराठी भाषेचा उगम व इतिहास 
मराठी भाषेचा उगम व विकास
मराठी भाषेचा उगम कसा आणि कधी झाला?
मराठी भाषेचे जनक कोण आहे?

 

आमचे इतर व्याकरण पोस्ट : 

Appreciation Of Poem In Marathi । कवितेचे कौतुक किंवा कवितेची कृती

Jahirat Lekhan In Marathi। जाहिरात लेखन मराठी 

Parenting Tips In Marathi । पालकत्वाच्या टिप्स मराठीत

मुलाखत लेखन ९ वी ते १२ वी । मुलाखत लेखन नमुना 

विरुद्धार्थी शब्द मराठी । Opposite Words In Marathi

 

टीप :

इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 


 

मित्रांनो या माहिती  मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद 

 

Leave a Comment