दूरदर्शन नफा की नुकसान ? निबंध

दूरदर्शन नफा की नुकसान ?

दूरदर्शन नफा की नुकसान ? निबंध
दूरदर्शन नफा की नुकसान ? निबंध

 

दूरदर्शन हे आता आपल्या पूर्ण परिचयाचे झाले आहे किंबहुना अतिपरिचयाचे झाले आहे, असे म्हटले तरी ते चूक उरणार नाही. दूरदर्शन ही काही आता श्रीमंतांची मिरासदारी राहिली नाही. तर मध्यमवर्गीय घराघरांतूनही दूरदर्शन शिरले आहे. किंबहुना अनेक पट्ट्यांवर आपणांस दूरदर्शनच्या अँटेना आढळतात. असे दूरदर्शन आम्हांला नफा मिळवून देते आहे को आमने नुकसान करत आहे. हा प्रश्न आता सर्वांच्यासमोर आहे.

दूरदर्शन हो अशी एक गोष्ट ठरली की तिला जेवढे कौतुक लाभले, तेवढे शिव्याशापही तिच्या वाट्याला आले. ‘इडियट बॉक्स’ म्हणून तिला नावे ठेवणारी माणसे दिवस दिवस तिच्यासमोर बसून राहतात. समाजातील वेगवेगळी माणसे वेगवेगळ्या हेतूंनी दूरचित्रवाणी पाहतात. कुणाला त्यापासून शैक्षणिक ज्ञान मिळावे असे वाटत असते. कुणाला पोतून मिळणारी वित्तीय, औदयोगिक माहिती महत्त्वाची वाटते. कुणी वैज्ञानिक माहितीसाठी दूरचित्रवाणीवरचे विशेष कार्यक्रम न चुकता पाहतात. पण बहुसंख्य लोक दूरचित्रवाणी पाहतात ती मनोरंजनाच्या हेतूनेच

आपल्या देशात लोकप्रिय झालेले बहुतेक कार्यक्रम हे चित्रपटांवर आधारलेले असतात. लहान मुलांवर चित्रपटातील हिंसेचा, मारामारीचा वाईट परिणाम होतो. अनेकदा चित्र पटांतील हे रंगीत जीवनच त्यांना खरे जीवन वाटू लागते. कुमारवर्यातील मुले-मुली किंव कॉलेजातील तरुण-तरुणी दूरचित्रवाणीतील चित्रपट पाहण्यात इतका वेळ चालवतात की स्वत:चा अभ्यास करण्यासाठी त्यांना वेळ उरत नाही. दूरचित्रवाणीवरील मालिकांमधील मारामान्या कॉलेजच्या आवारातही घडू लागतात. नको त्या फॅशन्सचे अनुकरण होते.

दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमात रमणारी मासे हवेत फिरणे, खेळणे, प्रहुण्यांचे आदरातिथ्य करणे या गोष्टी विसरतात. दूरचित्रवाणीमुळे झालेले सर्वांत मोठे नुकसान म्हणजे वाचनाची आवड कमी झाली. माणसे स्वतंत्र विचार करायला विसरलो दिवसेंदिवस या नुकसानीची जाणीव सर्वांना बेचैन करत आहे. यांत दूरचित्रवाणीचा दोष आहे का ?

दूरचित्रवाणीने आपल्याला कितीतरी चांगल्या गोष्टी दिल्या. सारे विश्व जवळ आणले. विश्वात कोठेही पडणारी घटना आपण घरबसल्या पाहू शकतो. दूरचित्रवाणीमुळे अनेक खेळांची माहिती मिळते. थोर विचारवंत, कलावंत यांच्या मुलाखती पाहिल्यावर त्यांना प्रत्यन्न भेटल्याचाच आनंद आपल्याला मिळतो. दूरचित्रवाणीमुळे समाजातील तळागाळातील माणसांना अनेक गोष्टी सहजगत्या शिकवता येतात रामायण-महाभारतातील कथा त्यांच्यापर्यंत दृश्यरूपात पोचवता आल्या. असे कितीतरी फायदे दूरचित्रवाणीमुळे होऊ शकतात. त्यामुळे दूरदर्शन नफा की नुकसान, या प्रश्नाचे उत्तर आहे, प्रेक्षक, प्रेक्षकांवरच हे अवलंबून आहे.

दूरचित्रवाणीपासून नुकसानच अधिक आहे, असा एकांगी विचार करून त्याला दूर ठेवणे योग्य नाही. दूरचित्रवाणीवरचे कोणते कार्यक्रम पाहायचे याबद्दलचे निर्णय आपणच घेतला पाहिजे. अभ्यासाला पूरक असणारे कार्यक्रम विद्याथ्र्यांनी अवश्य पाहावेत. ‘आधी शिक्षण मग मनोरंजन हे सूत्र दूरचित्रवाणीवरच्या इतर कार्यक्रमांच्या बाबतीतही प्रेक्षकांनी स्वतःवर लादून घ्यायला काय हरकत आहे ?

 

टीप :

1 ) दूरदर्शन नफा की नुकसान ? हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0 वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 

 

अधिक माहितीसाठी ..


 

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद

Leave a Comment