Climbing Essay – गिर्यारोहण निबंध

Climbing Essay – गिर्यारोहण निबंध

Climbing Essay - गिर्यारोहण निबंध
            Climbing Essay – गिर्यारोहण निबंध

कुमारवयातील एक आवडता छंद म्हणजे गिर्यारोहण तरुणवयात याच छंदाचे पर्यवरून चांगल्या व्यसनात होते. दर शनिवारी, रविवारी आणि जोडून आलेल्या सुट्ट्यांत तरुणांची टोळकी अशा प्रकारे गिर्यारोहणासाठी जाताना आढळतात. या समूहातील मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रांतील असतात. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांतून आलेली असतात. कुणी डॉक्टर असतो, कुणी इंजिनीअर, कुणी कारखान्यातील श्रमिक तर कुणी महाविद्या- लयातील विद्यार्थी हे सर्वजण एकत्र येतात, ते केवळ गिर्यारोहणाच्या छंदाने आणि मग या दीड-दोन दिवसांच्या मोहिमेत ते भरपूर आनंद मिळवतात.

गिर्यारोहणात सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे या छंदातून मिळणारा मनमुक्त आनंद डोगराच्या पायथ्याशी उभे राहून केवळ एखादया बयाचे काम करणाऱ्याला अवघड कडा सर केल्यावर होणारा आनंद कसा कळणार ।।

गिर्यारोहक हा सतत निसर्गाच्या सान्निध्यात राहत असल्याने निसर्गाकडून त्याला अनेक गोष्टी वरदानासारख्या मिळतात. प्रदूषणाने ग्रासलेल्या आजच्या या मोठमोठ्या शहरांतून दुर्मिळ झालेली स्वच्छ, निर्मळ हवा गिर्यारोहकाला मिळू शकते. एव्हरेस्टसारख्या अतिउंच शिखरावर जाणाऱ्यांना मात्र आपल्याबरोबर प्राणवायूचा साठा ठेवावा लागतो. गिर्यारोहण करताना तऱ्हेतऱ्हेच्या वृक्षांची, रोपांची, बेलीफुलांची ओळख होते. कुठे कुठे मानवाचे पूर्वज वानरे प्रस्तरांवरून उड्या कशा मारायच्या, याचेच जणू मार्गदर्शन करत असतात.

Climbing Essay - गिर्यारोहण निबंध
              Climbing Essay – गिर्यारोहण निबंध

पर्वतारोहण करताना ज्याप्रमाणे शरीराला तजेला मिळतो, तशी मनालाही नवी टवटवी प्राप्त होते. गिर्यारोहण करताना सगळं लक्ष त्या आरोहणाकडेच असल्यामुळे संसारातील, या जगातील सर्व कटकटी विसरल्या जातात. मन विशाल होते. क्षुद्र भावना गळून जातात. भेदभाव उरत नाहीत. पर्वताचा उत्तुंगपणा पाहून आपल्या लघुत्वाची विनम्र जाणीव होते. मग विंदा करंदीकरांसारखा कवी सांगतो, ‘सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. ‘

गिर्यारोहणाच्या छंदातून साहसी वृत्ती जोपासली जाते. ‘साहसे: श्री प्रतिवसति । ‘ अशा गिर्यारोहणात अनेकदा अनपेक्षित संकटे उभी राहतात. मग या संकटांना कसे तोंड दयावे हे ज्याचे त्यालाच ठरवावे लागते. त्यांतून प्रसंगावधान जोपासले जाते. एखादा मित्र संकटात सापडला तर त्याची मुक्तता कशी करावी याचाही निर्णय चटकन घ्यावा लागतो. सांघिक वृत्तीही या छंदातून जोपासली जाते.

आजकाल गिर्यारोहणाच्या अनेक मोहिमांत विविध राज्यांतील, विविध राष्ट्रांतील गिर्यारोहक एकत्र येतात. त्यामुळे वैश्विक एकात्मता साधली जाते, हेही नसे थोडके !

 

टीप :

1 )  गिर्यारोहण निबंध हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0 वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 

 

अधिक माहितीसाठी ..


 

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद

1 thought on “Climbing Essay – गिर्यारोहण निबंध”

Leave a Comment