भूकंप निबंध – मराठी

भूकंप निबंध - मराठी
भूकंप निबंध – मराठी

 

‘निसर्ग अमुचा सखा’ म्हणून माणूस नेहमी निसर्गाला गौरवत आला आहे.  पण हाच माणूस आपल्या कृतीने निसर्गाला दुखावत असतो. कधी तो प्रचंड वृक्षतोड करतो . कधी हवेत दूषित वायू सोडतो; तर कधी कारखान्यांचे मलीन पाणी नदयांच्या गोड्या पाण्यात सोडून. सारे पाणी दूषित करतो. मग त्याचा मित्र-निसर्ग-त्याच्यावर चिडतो आणि संतप्त होऊन त्याच्यावर आक्रमण’ करतो. या निसर्गाच्या संतापाचा एक आविष्कार म्हणजे भूकंप.

पूर्वी अशी समजूत होती की, सान्या पृथ्वीचा भार शेषाच्या मस्तकावर आहे. या पृथ्वीवरील पाप वाढले की, शेष आपले मस्तक हलवतो आणि मग या धरणीला कंप होतो. पण आता वैज्ञानिकांनी भूकंपाची शास्त्रीय कारणे शोधून काढली आहेत.

कधी कधी या शास्त्रज्ञांच्या कल्पनांनाही धक्का बसतो. सहयाद्रीच्या दख्खन पठारावरील खडकात भक्कमपणा अधिक असल्यामुळे तेथे भूकंप कधी होणारच नाही, असे सर्वजण मानत होते; पण मागे कोयनेच्या भूकंपाने व नुकत्याच झालेल्या लातूरच्या भूकंपाने या कल्पनेला धक्का दिला आहे.

सप्टेंबरचा शेवटचा दिवस. पावसाळा जवळजवळ संपत आला होता. शेतीतील कामे. संपल्यामुळे गावकरी गणपती-गौरीच्या सणात रमले होते. अनंतचतुर्दशीला गणपतीचे विसर्जन करून, तृप्त मनाने ते रात्री आपल्या घरकुलात झोपले होते; पण ती रात्र त्यांना काळरात्र ठरली. भल्या पहाटे अचानक जमीन हादरू लागली आणि दगडमातीची ती घरे पत्त्याच्या बंगल्यांसारखी कोसळली.

घराच्या भिंतीसाठी वापरलेले मोठेमोठे चिरे गाढ निद्रेत असलेल्या लोकांच्या अंगावर कोसळले आणि त्यांची निद्रा हो चिरनिद्रा ठरली. नांदत्या गावांना समाधीचे स्वरूप आले. मृत्यूचे भीषण तांडव सुरू झाले होते. सगळीकडे हाहाकार उडाला होता, सर्वजण या भूमातेच्या कोपाने सुन्न झाले होते. ही वार्ता जगाच्या कानाकोपन्यात जाऊन पोचली आणि मदतीचे अनेक हात तत्परतेने पुढे आले.

भूकंपाचे लहानमोठे धक्के बसतच होते. चारी बाजूंनी धावून आलेले लोक भूकंपाचा प्रकोप पाहून दिङ्मूढ झाले. प्रत्येकजण आपल्याला जमेल तशी मदत करत होता. मातीच्या ढिगान्याखाली शेकडो लोक गडप झाले. काहींना बाहेर काढण्यात आले. जखमी लोकांना रुग्णालयांत पोचवले जात होते.

मृतांना एकत्रच अग्नी देण्यात आला. मनाला सुन्न करणारी अवकळा पसरली. या आपत्तीतून वाचलेल्या लोकांसाठी नवीन निवारे उभे राहू लागले, तरी या अमानुष कार्यामध्येही स्वार्थीपणा डोके वर काढतच होता. अशा या

विपत्तीतही चोयामाच्या करणारे काही समाजकंटकही होते. त्यांच्या लीला ऐकून लाजेने मान खाली घालावी लागत होती. त्याच क्षणी मनात आले की, माणसाने स्वकर्तृत्वाच्या कितीही गमजा मारल्या तरी निसर्गाच्या रौद्र रूपापुढे तो हतबल होऊन जातो.

टीप :

1 ) भूकंप हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 

 

अधिक माहितीसाठी ..


 

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद 

Leave a Comment