आम्ही संपावर जातो तेव्हा..  निबंध 

आम्ही संपावर जातो तेव्हा..  निबंध 

आम्ही संपावर जातो तेव्हा..  निबंध 
आम्ही संपावर जातो तेव्हा..  निबंध 

 

आमच्या घरचा एक अलिखित नियम आहे आणि तो म्हणजे शाळेला मे महिन्याची सुट्टी लागली की सर्वांनी गावाला आजीआजोबांकडे जायचे. माझे तीन्ही काका, दोन्ही आल्या आणि सर्वांची मुले आम्ही आजीकडे जमतो, तेव्हा अशी धमाल येते की विचारूच नका त्यामुळे यंदाही परीक्षा संपली, सुट्टी लागली की कोकणात जायचे या मनीराज्यात आम्ही रंगलो होतो.

तेवढयात पिंकी म्हणाली, ” अरे दादा, अप्पा एक बातमी सांगू का?” काही खास बातमी असते, तेव्हाच पिंकी आम्हांला ‘दादा ‘अप्पा’ अशा हाका मारते. नाहीतर नेहमी आपलं अन्या आणि विन्या आम्ही उत्सुकतेने पिंकीने आणलेली बातमी ऐकू लागलो. अरे यंदा सुट्टीत आपण कोकणात जाणार नाही, तर म्हणे आपण कुठल्या तरी ‘हिलस्टेशनला जाणार आहोत.” पिंकीची बातमी ऐकून आम्ही अतिशय खट्ट झालो.

विनूने शंका काढली, संदूकाका, मधूकाका, प्रेमाआत्याकडची जाणार आहेत का ? लगेच पुढचे पाऊल उचलले. आईबाबा घरात नसताना सदूकाकांकडे फोन लावला. बरे झालं. सदूकाकांच्या अजितनेच फोन उचलला आणि आम्हांला कळलं की, त्यांच्याकडेही यंदा हिलस्टेशनवर जाण्याचा बेत ठरतो आहे. मग आम्ही इतरांच्या घरचेही अंदाज घेतले आणि शेवटी आम्ही सर्व मुलांनी ‘संपावर जाण्याचा निर्णय घेतला.

प्रत्यक्ष संपावर जाण्यापूर्वी आम्ही घरातील वडीलमंडळींना संपाची नोटीस दिली- ‘आम्हाला कोकणातच जायचंय. तुम्ही आमचा हा बेत मोडून काढणार असाल तर पुढील आठवड्यापासून आम्ही संपावर जाऊ.’ ही मुलं काय करणार संप!- अशी आमची उपेक्षा करून घरातील लोकांनी लक्ष दिले नाही.

आम्ही संपावर जातो तेव्हा..  निबंध 
आम्ही संपावर जातो तेव्हा..  निबंध

 

अखेर आमचा संप सुरू झाला. आम्ही मुले आपली स्वतःची कामे करत होतो, शाळेत जात होतो, अभ्यास करत होतो; पण घरातील कोणतीच कामे करत नव्हतो, त्यामुळे घरातील देवांची पूजा झाली नाही की आईबाबांचे कपडे धोब्याकडे गेले नाहीत. घरातील सर्व बारीकसारीक कामे होईनाशी झाली. दुसरे म्हणजे घरातील सर्व मोठ्या मंडळीशी कट्टी, मला वाटते, आमचे हे मौनच बाबांना असह्य झाले असावे. त्यांनी काकांकडे,

आत्याकडे फोन लावला तर, तेथेही संपाला सुरवात झालेली. मग त्यांच्या लक्षात आले की, हे प्रकरण काही साधे नाही. हा एक सामुदायिक संघ आहे.

पाच दिवसांनंतर मोठी मंडळी बोलणी करण्यास पुढे आली. फोनवरून आजी- आजोबांनाही लवाद नेमले गेले आणि निर्णय घेतला गेला की, सुट्टी लागली की सर्व मुलांना आजीआजोबांकडे पाठवण्यात यावे आणि मोठ्या मंडळींनी पंधरा दिवसांची सहल आटोपून कोकणात यावे.

आमच्या मनासारखा निर्णय झाल्यामुळे आम्ही लगेच आमचा संप मागे घेतला.

 

टीप :

1 )  आम्ही संपावर जातो तेव्हा..  निबंध हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0 वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 

 

अधिक माहितीसाठी ..


 

 

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद

Leave a Comment