Magni Patra Lekhan । मागणी पत्र कसे लिहावे ?

Magni Patra Lekhan । मागणी पत्र कसे लिहावे ?

 

Magni Patra Lekhan । मागणी पत्र कसे लिहावे ?
Magni Patra Lekhan । मागणी पत्र कसे लिहावे ?

 

मित्रानो या पोस्ट मध्ये तुम्हाला मी आज  संपूर्ण मराठी मध्ये मागणीपत्र लेखन (Magni Patra Lekhan In Marathi) शिकायला मिडेल ज्या मध्ये तुम्हाला मागणी पत्र कसे लिहायचे आहे हे देखील तुम्हाला समजेल आणि मी  मागणीपत्र चे नमुने देखील तुम्हाला सादर करणार आहे त्यामुळे तुम्ही ही पोस्ट संपूर्ण वाचा .

मागणीपत्र म्हणजे काय ? 

एकाद्या वस्तूची मागणी करण्यासाठी आपण आपल्या वरिस्ट व्यक्तीला जे पत्र लिहून मागणी करतो त्याला मागणी पत्र असे म्हणतात .

उदा : 

शालेय वस्तूंची मागणी करणे. ( वह्या, पुस्तके, स्टेशनरी, तक्ते, नकाशे, उपकरणांचे सुटे भाग, प्रयोगशाळेतील वस्तू, विषय-प्रयोगशाळांसाठी वस्तू वगैरे ) 

मागणीपत्र कधी लिहावे ?

 

१ ) सार्वजनिक जीवनात सोजन्याने वागण्याचे संकेत. म्हणून विनंतीची भाषा. मात्र, पत्राच्या केंद्रस्थानी मागणीच असते.

२ ) एखाद्या वस्तूची किंवा सेवेची मागणी करण्यासाठी लिहिलेले पत्र. (Magni Patra Lekhan in Marathi)

३ ) पैशाच्या बदल्यात वस्तू-सेवा देण्याघेण्याचा रोकडा व्यवहार. त्यात भावनेचा अंश कमी असतो.

४ ) मागणी पुरवणाऱ्याला योग्य तो मोबदला देण्याची आपली तयारी असते. ( मागणी पत्र )

 

मागणीपत्राचा नमूना । Magni patra Example : 

 

१ ) प्रश्न : तुमच्या शाळेसाठी काही आवश्यक असणारे क्रीडासाहित्य मागवण्यासाठी क्रीडासाहिझाच्या दुकानदारास पत्र लिहा.

 

य. र. ल.

विद्यार्थिप्रतिनिधी,

क्रीडाविभाग,

नवजीवन विद्यालय,

ठाणे.

दि. १ जुलै, १९९४.

 प्रति,

मा. व्यवस्थापक,

मे. युवक स्पोर्टस् डेपो,

धंतोली, नागपूर.

 

 विषय: शाळेसाठी क्रीडासाहित्य पुरवण्याबाबत.

 

माननीय महाशय,

स. नमस्कार. मी य. र. ल. ठाणे येथील नवजीवन विद्यालयाचा विद्यार्थी आहे. मी शाळेतील क्रीडाविभागाचा विद्यार्थिप्रतिनिधी आहे.

आम्हांला आमच्या शाळेसाठी पुढे नमूद केलेले क्रीडासाहित्य हवे आहे. कृपया हे साहित्य त्वरित पाठवावे. त्यासोबत बिलही पाठवावे. तसेच योग्य ती सवलत द्यावी, ही विनंती.

हे पत्र मी मा. मुख्याध्यापकांच्या अनुमतीने पाठवत आहे.

[wpdatatable id=3]

कृपया साहित्य लवकर पाठवावे.

 

आपला कृपाभिलाषी य. र. ल.

 

२ ) प्रश्न : शाळेत साज-या होणा-या योगा दिनानिमित्त पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा .

 

५ जानेवारी २०२१

अ . ब . क

अनमोल पुस्तकालय,
नवी दिल्ली

विषय : पुस्तके आणि संदर्भ पुस्तके ऑर्डर करण्यासाठी.

मान्यवर .

वर नमूद केलेल्या विषयानुसार, आम्ही काही वृत्तपत्रा मध्ये तुमच्या लायब्ररीची जाहिरात पाहिली आहे आणि तुमच्या लायब्ररीमध्ये 80% पुस्तके आणि संदर्भ पुस्तके उपलब्ध आहेत. हे सर्व लक्षात घेऊन मी तुमच्या वाचनालयातील काही पुस्तके आणि संदर्भ पुस्तके वितरित करू इच्छितो.
म्हणून आपणास विनंती आहे की आपण खालील गोष्टी कराव्यात. विलंब न लावता लिहिलेली पुस्तके व्ही.पी. सी यांनी दुरुस्त केले.
वरील कमिशन कपात करून कृपया ती पुस्तके पाठवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला पुस्तक मिळताच संबंधित रक्कम तुमच्या खात्यात नेट बँकिंगद्वारे जमा केली जाईल.
पुस्तके पाठवताना हे लक्षात ठेवावे की पुस्तक कुठूनही फाटले जाऊ नये आणि पुस्तकांची नावे नवीन आवृत्तीची असावीत.

 

1) गोदान कादंबरी
२) हिंदी शब्दकोश
3) निरालाची डायरी
4) रेडिओ बुक

 

धन्यवाद.

 


 

खालील माहितीसाठी हेच आर्टिकल  पुन्हा वाचा :

 

मागणी पत्र । मागणी पत्र लेखन मराठी । 
मागणी पत्र लेखन 8वी, 9वी, 10वी
मागणी पत्र लेखन मराठी । Magni Patra Lekhan in Marathi
मागणी पत्र लेखन मराठी 2023
मराठी पत्र लेखन. मागणी पत्र. रोपांची मागणी करणारे पत्र

 

आमची मागणी पत्र साठी दुसरी पोस्ट : 

Magani Patra Lekhan – मागणी पत्र कसे करावे ? 

घरगुती पत्र कसे लिहावे ? व उदारणे

मराठी पत्र लेखन कसे करावे ?

Letter Writing In Marathi। मराठी पत्र लेखन कसे करावे ?

Abhinandan Patra Lekhan – अभिनंदन पत्र

 


 

मित्रांनो या माहिती  मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद .

1 thought on “Magni Patra Lekhan । मागणी पत्र कसे लिहावे ?”

Leave a Comment