घरगुती पत्र कसे लिहावे ? व उदारणे

घरगुती पत्र कसे लिहावे ?

घरगुती पत्र कसे लिहावे ?
                    घरगुती पत्र कसे लिहावे ?

 

आई, वडील, भाऊ, बहीण वा इतर कोणी आप्त आणि मित्र यांना उद्देशून लिहिलेली पत्रे ही घरगुती पत्रे’ होत. पत्र ज्या व्यक्तीला लिहिलेले आहे ती आणि पत्रलेखक यांचे जे नाते असते, त्यानुसार पत्राचा मायना आणि शेवट बदलत असतो. कोणाला कोणता मायना लिहायचा याचा तक्ता पुढे दिला आहे.

सामान्यतः घरगुती पत्रांच्या आरंभी ‘श्री’ लिहिण्याचा प्रघात आहे. फक्त दुःखद वार्ता असलेल्या पत्रावर ‘श्री’ लिहीत नाही.

पत्राच्या सुरवातीला उजव्या कोपऱ्यात स्वतःचा पत्ता व दिनांक लिहावा. घरगुती पत्रात पत्राच्या सुरवातीला स्वतःचे नाव लिहिण्याची आवश्यकता नाही. पत्रातील मजकूर सविस्तर व मुद्देसूद असावा. भाषा खेळीमेळीची व घरगुती असावी. पत्र वाचणाऱ्या व्यक्तीला पत्रलेखक प्रत्यक्ष आपल्याशीच बोलत आहे, असे वाटले पाहिजे. आईवडलांना मोठ्या माणसांना किंवा शिक्षकांना पत्र लिहायचे असल्यास त्यातून नम्रता व्यक्त व्हावी. घरगुती पत्रांचा प्रारंभ व शेवट अनौपचारिक मजकूर व घरगुती चौकशी यांनी करावे.

[wpdatatable id=5]

उदा :

प्रश्न क्र :  (१) तुमची नवीन शाळा, नवीन अभ्यासक्रम यांबद्दलची माहिती तुमच्या आजीला पत्र लिहून कळवा. 

 

।। श्री ।।

४/११, उप:काल अपार्टमेंट,

गोखले रस्ता, दादर, मुंबई-२८.

दि. १ जुलै, १९९५.

ती . स्व. आजीस ,

               स.सा.नमस्कार.

तुझे पत्र मिळाले. तुझे पत्र आले की तू प्रत्यक्षात भेटल्यासारखेच वाटते. त्यामुळे आनंद झाला. मी मात्र शाळा सुरू झाल्यापासून तुला पत्र पाठवले नाही, ही माझी चूक आहे. पण मला खात्री आहे की, तू माझ्यावर रागावणार नाहीस.

नवीन शाळेबद्दल मला खूप उत्सुकता होती; पण मनात थोडी धाकधुक होती. कारण एका छोट्या गावातून मी मोठ्या शहरातील एका प्रसिद्ध शाळेत आलो आहे.

आमच्या शाळेच्या प्रवेशद्वाराशीच मोकळ्या जागेत शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दलचे फलक आहेत. ते फलक शाळेचा आतापर्यंतचा लौकिक आपल्या लक्षात आणून देतात. तेथेच एका कपाटात विद्यार्थ्यांनी विविध स्यनांमध्ये मिळवलेले कप, ढाली व इतर बक्षिसे मांडलेली आहेत. ते पाहून तुझ्या या नातवाने मनाला काय बजावले माहीत आहे? बरं का, बच्चमजी, तुमचं नावही येथे झळकलं पाहिजे.

आमच्या शाळेचे वर्ग मोठे प्रशस्त, हवेशीर आहेत. प्रकाशही भरपूर असतो त्याशिवाय प्रत्येक वर्गात पंखे आहेत. माझ्या वर्गात सत्तर विद्यार्थी आहेत. म्हणजे आपल्या गावातील शाळेच्या दुप्पट. सगळे विद्यार्थी कसे तरतरीत, ऐटबाज गणवेशत उठून दिसतात! शाळेत शिस्तही चांगली आहे. त्यामुळे प्रत्येक तासला विषयांचे सखोल अध्ययन खूप छान होते. पाठ्यपुस्तकातील अभ्यासाशिवाय अवांतर माहिती खूप मिळते. या शाळेत शिक्षकांपेक्षा शिक्षिकांची संख्या अधिक आहे. भूगोल व शास्त्र या विषयांच्या अभ्यासाच्या वेळी आनुषंगिक खूप साधने वापरली जातात.

यंदा नववीचा अभ्यासक्रम बदलला आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकेही नवीन आहेत. इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत बराच बदल झाला आहे. मराठीचे पाठ्यपुस्तक मला खूप आवडले. या वर्षी तीन्ही शास्त्रांसाठी एकच पुस्तक आहे. आमची प्रयोगशाळा मोठी आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्रपणे प्रयोग करण्याची संधी मिळते. ही सोय आपल्या गावातील शाळेत नव्हती. मला खात्री आहे की, वर्गातील मुलांमध्ये मी अभ्यासात मागे पडणार नाही.

शाळा साडेबारा ते साडेपाच असते. नंतर साडेसहा ते साडेसात मी जिमखान्यात जातो. रात्री आठपर्यंत घरी येतो. तेव्हा आईबाबा कामावरून आलेले असतात. सकाळी ते खूप लवकर बाहेर पडतात. त्यांचा रविवार मात्र पूर्ण घरासाठी व माझ्यासाठी असतो.

तुझे समाजकार्य नित्यनेमाने सुरूच असेल. तरी वेळात वेळ काढून मला पत्र टाकत जा. कारण तुझे पत्र मला नेहमीच नवीन प्रेरणा देत असते.

तुझाच लाडका,

पप्पू

 

प्रश्न क्र : (२ ) तुमच्या हातून झालेली चूक कबूल करून क्षमा मागणारे पत्र तुमच्या वडलांना लिहा.

 

।। श्री ।।

आमोद-धाम

साने गुरुजी पथ

दि. १ ऑक्टोबर १९९५

माटुंगा, मुंबई- ४०० ०१९

तीर्थरूप बाबांस ,

साष्टांग नमस्कार

बाबा, माझ्या हातून अक्षम्य चूक झाली. त्याबद्दल प्रथम मी तुमची व आईची मा मागतो. पण तुम्ही आज जी मला शिक्षा देत आहात, ती मला आता असहय झाली आहे. कृपया तुम्ही माझ्याशी धरलेला अबोला सोडा.

मित्रांनी फार आग्रह केला म्हणून मी तुम्हाला वा आईला न विचारता चित्रपटाला मोत्यासाठी परातील मासिक खर्चाच्या रकमेतून पैसे उचलले. शाळा बुडवली आणि खोटे सांगितले म्हणजे एक गुन्हा करायचे योजले की, आणखी तीन अपराध- बोरी, शाळा बुडवणे, खोटे बोलणे करावे लागले, पण खरं सांगू का बाबा, मो त्या चित्रपटाचा आनंद घेऊ शकलो नाही.

खोटेपणामुळे मी अस्वस्थ होतो. नंतरही सारखे खरं सांगावे असे वाटत होते. पण पोर झाला नाही. शाळेतून तुम्हाला सगळे कळलेच आहे. यात तुम्हाला. आईला जो मनस्ताप झाला त्याबद्दल मी खरोखरच अपराधी आहे. त्यासाठी तुम्ही मला हवी तो शिक्षा करा. मी ती भोगेन, पण अबोला धरू नका.

यापुढे असा अविचार मी पुन्हा कधीही करणार नाही. कोणीही, कितीही आग्रह केला तरी त्याला बळी पडणार नाही. तरी मला क्षमा करा.

तुमचाच चुकणारा मुलगा,

मन्नू 

  • वरील माहिती ही इयात्ता ९ वी व १० वी साठी महात्वाची आहे . 
  • ९ वी आणि १० वी साठी उपयुक्त पत्रलेखन . 

 

अधिक माहितीसाठी ..


 

मित्रांनो या माहिती मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद

Leave a Comment