Majha Avadata Kavi Nibandh Marathi। माझा आवडता कवी निबंध मराठी

 Majha Avadata Kavi Nibandh Marathi। माझा आवडता कवी निबंध मराठी

 

  Majha Avadata Kavi Nibandh Marathi। माझा आवडता कवी निबंध मराठीi
Majha Avadata Kavi Nibandh Marathi। माझा आवडता कवी निबंध मराठीi

 

मित्रानो , या पोस्ट मध्ये माझा आवडता कवी निबंध मराठी लेखन / Majha Avadata Kavi Nibandh Marathi 100 ते 400 शब्दात निबंध लेखन करणार आहोत . हा निबंध 7 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्याना परीक्षेत वैचारिक निबंध म्हणून विचयाराला जातो त्यामुळे निबंध नीट वाचा.  आज आपण Majha Avadata Kavi Nibandh Marathi या विषयावर निबंध बघणार आहोत.

देवी सरस्वतीच्या प्रांगणात, मराठी वाङ्मयात अनेक साहित्यिक, ललित निबंध लेखक, कथालेखक, नाटककार आहेत. पण साहित्य वेलीवरचं देखणं, लोभस, मनाला भुरळ पाडणारं घमघमणारं फूल म्हणजे ‘कविता’. थोड्या शब्दांत मोठा अर्थ सामावणाऱ्या शब्दपंक्ती म्हणजे ‘कविता’. जसे फुलांचे रंग अनेक, गंध अनेक, आकार-स्पर्श अनेक; तसेच अनेक प्रकारांनी कवींनी आपापल्या काव्यपुष्पांची गुंफण, देवी सरस्वतीच्या चरण कमली वाहिली आहे.

कवी म्हणजे…. अंतराळात विहरणारा पक्षी असतो।

चराचरात नवे विश्व साकारणारा ब्रह्मा असतो ।

कविवर्य विंदा करंदीकर, सारस्वतांमधलाच एक थोर उपासक, कवी. जणू दूरदेशी नेगारा एक देवदूतच. स्वप्नामध्ये सत्याला अलगद नेऊन भेटवणारा किमयागार. विंदा म्हटलं म्हणजे,

भरलेल्याशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी,

उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी,

देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे,

देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे।

 

ह्या काव्यपंक्ती सर्वप्रथम ओठांवर येतात. मन विशाल होऊन उठते. मी चौथी, पाचवीत असताना एकदा प्रमुख पाहुणे म्हणून शाळेत विंदा आले होते. त्यांची

कोकणातली म्हातारी देशावर आली

कृष्णेच्या पाण्यात वाहून गेली

वाहता वाहता म्हातारी हसली,

मळीतली वांगी डोळ्यांना दिसली.

म्हातारी लागली हालवायला पाय

म्हणते ही खाल्ल्याशिवाय मरेन की काय ?

किंवा

स्वप्नात पाहिला राणीचा बाग

हत्तीच्या पाठीवर बसला नाग

हरणांसंगे खेळत पत्ते

बसले होते दोन चित्ते 

या आणि अशा कविता अगदी कालच ऐकल्यासारख्या कानात घुमत राहिल्यात, विंदांच्या चेहऱ्यावरील मिश्किल हावभावांसकट कायमच्या कोरल्या गेल्यात. सुस्पष्ट, परखड तरी सोप्या सुलभ भाषेतल्या त्यांच्या बालकविता… खारेदाणे, साखरफुटाण्यासारख्या… जाता-येता वाचाव्यात! ओठांवर घोळवाव्यात अशाच पुढे मोठं झाल्यावर कळलं की, वास्तववाद जगणारा हा द्रष्टा मनस्वी कवी, मनानं दिलदार, अंतःकरणानं निर्मळ नि सामान्य जनमानसात रमणारा आहे. एकदा त्यांच्या घराखालच्या रस्त्यावरून एक भिकारी गाणे म्हणत चालला होता. त्याचा गळा अत्यंत सुरेल होता.  पण गळ्यात अडकवलेली (हार्मोनियम) पेटी जरा बिघडलेली असल्याने बेसूर वाजत होती.

विंदांच्या मनात काय आले, त्यांनी त्या भिकान्याला वर बोलावले, पलंगाखाली ठेवलेली त्यांची स्वतःची चालू पेटी खुशीत त्या भिकाऱ्याला देऊन विंदा मोकळे झाले. स्वतःचे हार्मोनियम लीलया देऊन टाकणारा हा उदार मनाचा कवी पक्का संसारी आहे. विंदा भाजीबाजारात स्वत: जाऊन, रुपया रुपयासाठी घासाघीस करून भाजी खरेदी करतात. दीन दुबळ्या, आजारी माणसाला पाहून मात्र त्यांचा हात खिशात जातो. ते फक्त मानवतावादी नसून, मानवतावाद स्वतः प्रत्यक्ष जगतात है.

रक्ता रक्तातील कोसळोत भिंती

मानवाचे अंती एक गोत्र

या काव्यपंक्तीतून दिसते, साम्यवादात जगणारे नि साम्यवाद शिकवणारे. विंदा लिहितात,

व्होल्गाचे ते पाणी वाहू दे गंगेत ।

लाभो निग्रो रेत पांढरीला ||

निराशेच्या गर्तेत अडकलेल्या हताश तरुणासाठी ते सहजपणे उपदेश करतात,

हा रस्ता अटळ आहे

अन्नाशिवाय, कपड्याशिवाय,

ज्ञानाशिवाय मानाशिवाय,

पाहू नको डोळे शीव

कर विचार हस रगड

बन दगड मना बन दगड

माझ्या मना बन दगड!

विदांच्या कविता म्हणजे भव्यदिव्य कल्पनांचा बौछार नाही, शब्दांची नुसती उप वा रचनेचे अवडंबराही नाही, तर वास्तवाचा, भावनांचा तरल अविष्कार आहे. अहंकार, ‘मी’पणा त्यांना कधी शिवतच नाही.

‘मी’च्या वेलांटीचा सुटो सुटो फांस ।

येडा क्षितिजास । नको त्याचा ।।

असं ते स्वतःलाच बजावतात व गर्वापासून लांब राहतात. ते खूप हळवेही आहेत. भारतीय सामान्य खियांचे प्रश्न कधी सुटणार? ह्या विचाराने ते उद्विग्न होऊन रागावैतागाने ओळी लिहितात,

कर कर करा, मर मर मरा

कूट कूट कुडा, चीड चीड चिडा

झीज झीज झिजा, शिजवा आणि शिजा!

असं लिहिणारे विंदा, ‘अजबखाना’ ‘एटलोकांचा देश’, ‘राणीचा बाग’ ‘सशाचे कान’ ‘बागुलबुवा’ इत्यादी बालकविता संग्रह लिहितात, तर मनाच्या गाभ्याला जाऊन भिडणारी ‘तैलचित्रे’ ही लिहितात. त्यात त्यांनी झुमरा, झपताल, रूपक उत्तम समजून घेऊन कागदावर उमटवण्याची वेधक किमया केली आहे.

‘आकाशाचा अर्थ’, ‘स्पर्शाची पालवी’ हीसुद्धा त्यांची सुरेख पुस्तके. एके काळी बिंदा, वसंत बापटमंगेश पाडगावकर ह्या कवीत्रयींनी महाराष्ट्रातला कानाकोपरा स्वरचित कवितांनी दुमदुमविला. कविता लोकांच्या हृदयात वसवली. कवितेला एक प्रतिष्ठा मिळवून दिली.

विंदांचे गुरू कोण, तर न्यूटन, आईनस्टाईन, डार्विन, मादाम क्यूरी असे बुद्धिवादी व इहवादी वैज्ञानिक, इहवादी दृष्टी असल्यामुळे पृथ्वीवर… या मातीवर विंदांचे नितांत प्रेम. त्यांचा स्वर्ग व नरक पृथ्वीवरच आहे. येथले जीवन व येथला मानव त्यांना सर्वाहून अधिक मोलाचा वाटतो…. की……

पवित्र सुख दुःखाची गाणी, वेदांतिल सान्या मंत्रांहून

पवित्र साधा मानव प्राणी, श्रीरामाहून श्रीकृष्णाहून!

विंदा करंदीकरांच्या दृष्टीने, श्रमातून पोसणारी भूक, दगडी निद्रा, शरीराचे जगणे, प्रितीचे मिलन, यंत्राची घडघड, सत्याचा विचार करणारे मस्तक, अन्यायाचा प्रतिकार, माणुसकीचा गहिवर ह्यालाच सगळ्यात जास्त महत्त्व आहे ते म्हणतात.

सगळे मिळून सगळ्यांसाठी मरण्यात ही मौज आहे.

सगळे मिळून सगळ्यांसाठी जगण्यामध्ये… ब्रह्मानंद

कविवर्य शंकर वैद्यांच्या भाषेत, समतेत, बंधुत्वात, मानवतेत आनंद मानणारा, विरघळणारा, खऱ्या अर्थाने साम्यवाद जगणारा हा ‘कवी’, कवी नायगावकर विंदांबद्दल म्हणतात,

हा सच्छिद्र जांभ्या दगडासारखा,

केशरीधम्म देवगड हापूससारखा

झुकतो पुन्हा भुईकडेच !

मराठी सारस्वतांचे अग्रणी, मराठी मायबोलीची गेली पन्नास वर्षे सेवा करणाऱ्या कविवर्य विंदा करंदीकरांना नुकतेच, ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा विंदांचा गौरव म्हणावा की ज्ञानपीठ पुरस्काराचा? असे क्षणभर माझ्या मनात आले. आम्हा विद्यार्थ्यांचा त्यांना त्रिवार मानाचा मुजरा !

 

  Majha Avadata Kavi Nibandh Marathi। माझा आवडता कवी निबंध मराठीi
Majha Avadata Kavi Nibandh Marathi। माझा आवडता कवी निबंध मराठीi

 

माझा आवडता कवी निबंध १० ओळी 

 

कवी ह्या सृजनशील मनाच्या जगातील अत्यंत महत्वाच्या व्यक्तींपैकी एक असा व्यक्ती आहे ज्याच्या कवितांमुळे माणसांच्या हृदयांच्या कोणत्याही कोनत्याही भावांची वाट पाहणार नाही.

कवींच्या शब्दांच्या सामर्थ्यामुळे आपल्या आयुष्यातील आनंदाच्या अनुभवांचा आपल्या मनात आभास होतो. त्यांच्या कवितांमुळे माणसांना जीवनात एक नवीन दिशा मिळते, ती असा अभिव्यक्तीसाधन तयार होते.

एका कवीने अपरिमित शब्दांचा जीव दिलेला असला तरी तो माणसांच्या हृदयांच्या भावना आणि विचारांच्या एकत्रित अभिव्यक्तीसाठी वापरतो. त्याच्या कवितांमुळे आपल्या मनाला शांतता, संतोष, प्रेम, निराशा, विश्वास, आकांक्षा, आणि विचारांच्या अनंत श्रेणीतील विचारांना जीवन मिळतो.

जीवनातील सुख, दुःख, उत्कटता, आनंद, प्रेम, प्रतिसाद असे अनेक भाव आपल्या मनात आले तेव्हा, कवीची कविता या भावनांची प्रतिबिंबित आणि व्यक्तिगत अनुभवांची तयार करते.

कवीने आपल्या स्वतःच्या अनुभवांची मदत करता ज्याच्या माध्यमातून आपल्या दिवंगत प्रियजनांसारखे व्यक्तिगत अनुभव आपल्याला नाहीतरच घडू शकतात.

आपल्या आयुष्यात अनेक कवींनी आपल्या अंतरातील आत्मा जागतील. कवींच्या कवितेमुळे आपण आपल्या सामान्य जीवनातील प्रतिसादांची सुंदर, मनोहारी रूपे अनुभवू शकतो. आयुष्याच्या विविध पहाटेप्रेमी, रंजक, उत्साहवती गोष्टींना कविता द्वारे जीवंत करण्याचा काम कवींनी केलेला आहे.

असा एक कवी आहे, ज्याच्या कवितांमुळे जगात आपल्या मनाला आनंदाची गरज उदयाला आहे. त्याच्या शब्दांमुळे आपण अनुभवतो की कविता ही केवळ एक शब्दांची झुलण नाही, ती जीवनाची वाढवणारी आणि तोडणारी शक्ती आहे.

कविता आपल्याला आपल्या आंतरचे सत्य, आदर्श, विचारांचे परिचय देऊन आपल्याला जागृत करण्याची क्षमता देते.

असा आपला आवडता कवी त्याच्या कवितेच्या माध्यमातून आपल्या मनातील सर्वांच्या भावनांना जीवंत करणारा आहे. त्याची कविता आपल्याला आनंद देऊन तसेच आपल्या विचारांना ध्येयात आणण्याची क्षमता देते. त्याच्या कवितेमुळे आपण जीवनाच्या समस्यांच्या आणि दुःखांच्या सामान्य अनुभवांची एकत्रित अभिव्यक्तीसाठी सर्वोत्कृष्ट वापर करू शकतो.

सार्वजनिक आवडता कवींमध्ये अनेक असतील, पण त्यांच्या कवितेमुळे जीवनातील विचारांच्या प्रतिसादांची सामान्यता अनुभवून जाणारी आणि आपल्याला नवीन दिशा देणारी कवींची कविता विचारांच्या सामर्थ्याने परिपूर्ण असावी. आपल्या आवडत्या कवीच्या कवितेमुळे आपल्याला आनंद, स्पंदन, आणि संवेदनांची प्रवाह मिळावी अशी आशा करतो.

 

माझा आवडता कवी निबंध विडियो माध्यमातून 

Video credit : @marathigrammartech youtube channel

 

वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता :

मला आवडणारा कवी / माझा आवडता कवी मराठी निबंध 
माझा आवडता कवी मराठी निबंध, Essay On My Favourite Poet
माझा आवडता कवी/निबंध व भाषणासाठी उपयुक्त
maza avadta kavi marathi nibandh | माझा आवडता कवी मराठी निबंध

 

आमचे इतर निबंध पोस्ट : 

संगणक काळाची गरज निबंध मराठी

गुरु शिष्य परंपरा निबंध । Guru Shishya Paranpara Essay 

हुंडा एक सामाजिक समस्या / एक अनिष्ट प्रथा निबंध 

एकीचे बळ मराठी निबंध। Ekiche Bal Essay In Marathi

माझी आजी निबंध मराठी । Majhi Aaji Nibandh In Marathi

 

टीप :

1 ) माझा आवडता कवी निबंध मराठी हा class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0 वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 


 

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद. 

Leave a Comment