सूर्य उगवला नाही तर निबंध । Surya Ugavala Nahi Tar Essay In Marathi

सूर्य उगवला नाही तर निबंध । Surya Ugavala Nahi Tar Essay In Marathi

 

सूर्य उगवला नाही तर निबंध । Surya Ugavala Nahi Tar Essay In Marathi
सूर्य उगवला नाही तर निबंध । Surya Ugavala Nahi Tar Essay In Marathi

 

मित्रानो , या पोस्ट मध्ये सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध लेखन / Surya Ugavala Nahi Tar Essay In Marathi 100 ते 400 शब्दात निबंध लेखन करणार आहोत . हा निबंध 7 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्याना परीक्षेत कल्पनात्मक निबंध म्हणून विचयाराला जातो त्यामुळे निबंध नीट वाचा.  आज आपण सूर्य उगवला नाही तर निबंध या विषयावर निबंध बघणार आहोत.

दहावी-बारावी इयत्तेतील विद्यार्थ्याचे जे काही हाल होतात, ते अन्य लोकांना समजणे अशक्यच आहे. ज्यांना है। समजून घ्यायचे असतील, त्यांनी या दहावी बारावीच्या परीक्षेला बसून बघावेच! सुखाची झोप टाकून पहाटे पहाटे उठणे, पेंगुळल्या डोळ्यांनी अभ्यासाला बसणे, धावतपळत क्लासला जाणे, पुन्हा येऊन गृहपाठ करणे, मग शाळेत जाणे, शाळेतून आल्यावर पुन्हा क्लासला जाणे, घरी आल्यावर पुन्हा अभ्यासाला बसणे व रात्री उशिरापर्यंत सराव प्रश्नपत्रिका.

सोडवायला बसणे या रहाटगाड्यात अक्षरश: आम्ही पिळून निघतो! सकाळी जबरदस्तीने उठताना वाटते हा सूर्य उगवला नाही तर किती बरे होईल! सगळी पीडा नाहीशी होईल!

खरेच सांगतो, माझ्या मनात अनेकदा हा विचार येतो सूर्य आवला नाही तर ? तर… सगळी मज्जाच मज्जा ! मग सकाळी उठायची कटकट नसेल, हवे तितके मनसोक्त झोपता येईल! उठल्यावरही कसली घाई नसेल. शाळेत जाण्याची धावाधाव नसेल.

मनसोक्त टी. व्ही. पाहता येईल, पत्ते, कॅरम हे खेळ भरपूर खेळता येतील. अमूक वाजले, आता हे करा, तमूक वाजले, आता ते करा. असल्या जाचातून मुक्तता होईल. सूर्यच नसल्याने घामाच्या धारा नसतील आणि कडाक्याच्या उन्हाळ्याने हैराण व्हावे लागणार नाही।

कडक उन्हाळाच नसल्याने नदी-नाले-विहिरी आटण्याचा प्रश्नच येणार नाही. मैल मैल अंतरावरून पाण्याचे हंडे त्याहून आणण्याचे काबाडकष्ट करावे लागणार नाहीत. दिवसच नसल्याने सगळ्यांची कामाची ठिकाणे जवळच असतील. दूर दूर अंतराच्या प्रवासाची दगदग संपलेली असेल. आई-बाबा खूप वेळ घरी असतील… आणि आमच्या गावाकडची मजा तर काय विचारूच नका… सतत पांढरेशुभ्र चांदणे किती किती फायदे!

तेवढ्यात मला शंका आली, “सूर्य नसला तर चांदणे कसे काय पडेल ? शक्यच नाही. चांदणे म्हणजे सूर्याचा परावर्तित प्रकाश, चंद्रावरून परतणारा म्हणजे चांदणे नसणारच. मग कसली आली मजा ?” नाही नाही त्या विचारांनी डोके गरगरू लागले. भविष्यातील एकेक बाब डोळ्यांसमोर साकार होऊ लागली. भीतिदायक विचारांचे मोहोळच उठू लागले.

सूर्य उगवलाच माही, तर शाळा नसेल, हे वरवर ठीक वाटते. पण शाळेत मिळणारा केवढा आनंद आयुष्यातून वजा होईल! मित्र नसतील. मग मित्रांबरोबर संध्याकाळचे भटकणे कसे घडेल ? मित्रांबरोबरची सगळी धमालच नष्ट होईल मैदानावर कधी मनसोक्त खेळताच येणार नाही! कायम घरात नि घरात! टी. व्ही. पल्ले, कॅरम किती वेळ चालणार ?

अंथरुणात लोळत तरी किती वेळ राहणार ? सूर्य उगवलाच नाही तर शाळा नसतील; म्हणून ज्ञानाचे मार्ग बंद होतील, मग मानवाने आजवर साधली तशी प्रगती कुठे असेल ? विविध सेवा पुरवणारी कार्यालये नसतील; कारखाने व उद्योगधंदेही नसतील, म्हणजे नोकऱ्या नसतीलच. मग पैसे कुठून येतील ? खाणार काय?

सूर्य नसल्यामुळे सगळीकडे काळोख असेल. फक्त काळा रंग मग वसंत ऋतूतील विविधरंगी फुलांच्या सौंदर्याचे वैभव श्रावणातील लावण्यवती सृष्टी यांचा आस्वाद कसा घेणार ? आयुष्यातून सगळे रंग उद्दपार होतील सूर्योदय व सूर्यास्त याच दर्शन घेण्याचे सुख कायमचे निघून जाईल!

बाकी सर्व एक वेळ ठीक मानता येईल. पण खाणार काय ? ऊन नाही म्हणून पाऊस नाही. म्हणून शेती नसेल. मग अन्नधान्य कसे मिळेल ? मुख्य म्हणजे सूर्यप्रकाश हा सर्व वनस्पतींचा जीवनाधार, सूर्य नसेल तर, वनस्पती सृष्टीही नसेल, अशा स्थितीत प्राणी, मानव, इतकेच कशाला, कोणताही सजीव कसा काय जगू शकेल ? म्हणजे पृथ्वी फक्त मातीचा एक निर्जीव गोळा बनेल. आपण कोणीच अस्तित्वात नसणार!

बाप रे! नको, नको, नको. सूर्य न उगवण्याची कल्पनाच नको, तो आपल्या सर्व सजीवांचा जीवनदाता आहे. तो हवाच,

ॐ सूर्यनारायणाय नमः ।

 

सूर्य उगवला नाही तर निबंध । Surya Ugavala Nahi Tar Essay In Marathi

 

सूर्य उगवला नाही तर 10 ओळी निबंध । Surya Ugavala Nahi Tar 10 Line Essay 

 

सूर्य उगवला नसता तर सगळीकडे अंधार असेल , त्यामूळे खूप नुसकान होईल , सूर्य नसल्यावर संजीव प्राणी जीवंत राहू शकणार नाहीत .

जर सूर्यउगवला नसता तर पृथ्वीवर कोणताही प्राणी जिवंत राहणार नाही. उन्हाच्या अनुपस्थितीत वनस्पतींचे प्रकाश संश्लेषण होऊ शकत नाही.

झाडे ऑक्सिजन देणार नाहीत आणि त्याशिवाय आयुष्य जगन अशक्य आहे. आणि झाडे नसल्यावर पृथ्वी ही मृत होईल .

जर ह्या जगात सूर्य नसता तर जगात किती रोग पसरली असती. सूर्याच्या प्रकाशात बर्‍याच रोगांचे जंतू मरतात ज्यामुळे काही रोग नियंत्रणात राहतात. आपल्या शरीराला सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी मिळतो, ज्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जा कायम टिकून राहते.

जर सूर्य नसला तर झाडे-झुडपे किंवा कोणतीही पिके मिळणार नाहीत. काहीही वाढणार नाही कारण सूर्यप्रकाश हा हिरव्या वनस्पतीना वाढवण्यास मदत करतो आणि वनस्पती प्रकाशाच्या उपस्थितीतच आपले अन्न तयार करतात. परिणामी, ते स्वत: चे खाद्य तयार करू शकणार नाहीत आणि आपल्याला पीक मिळणार नाही.

सूर्य उगवला नसता तर आपल्या पृथ्वी वर ऋतू देखील राहणार नाहीत. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा यापैकी आपल्याला काहीच बघायला मिळणार नाही बघायला मिळेल तो फक्त अंधार.

सूर्य उगवला नाही तर आपल्याला प्यायला पाणी देखील मिळणार नाही कारण जर सूर्यच नसेल तर तलाव, नद्या, सरोवरे यांच्यातील जमा पाण्याचे बाष्पीभवन होणार नाही आणि जर त्यांचे बाष्पीभवन झाले नाही तर पाऊस देखील पडणार नाही आणि जर पाऊस पडला नाही तर आपल्याला प्यायला पाणी देखील मिळणार नाही.

सूर्य उगवला नसता तर पाण्याचे बाष्पीभवन होणार नाही व मग पाऊस पडणार नाही आणि पाऊस पडला नाही तर मग पृथ्वीवर पानी राहणार नाही .

सूर्य म्हणजे आपला सगळ्यांचा जीवन स्रोत आहे .सूर्य नाही आला  तर आपला विनाश हा अठळ आहे . त्यामूळे सूर्य रोज उगवला पाहिजे ही देवाकडे अपेक्षा .

 

सूर्य उगवला नाही तर निबंध विडिओ माध्यमातून 

Video Credit : Harish Adawale Youtube Channel 

 

वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता 

  • सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी । Surya Ugavala Nahi Tar Essay in Marathi 
  • सूर्य उगवला नाही तर मराठी मधे निबंध । Surya Ugavala Nahi Tar in Essay
  • सूर्य उगवला नसता तर या विषयी निबंध ।  Surya Ugavala Nahi Tar This Subject Essay 

 

आमच्या इतर निबंध पोस्ट :

परीक्षा नसत्या तर निबंध । Pariksha Nasatya Tar Essay In Marathi 

मी आमदार झालो तर निबंध। Mi Amadar Jhalo Tar Essay in Marathi 

रंग नसते तर निबंध । Rang Nasate Tar Nibandh 

मला लॉटरी लागली तर निबंध

नदी बोलू लागली तर निबंध

 

टीप :

1 ) सूर्य उगवला नाही तर निबंध हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0 वी व ११ वी १२ वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 


 

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद. 

 

Leave a Comment