झाड म्हणजे काय ? इयत्ता 10 वी

झाड म्हणजे काय ? इयत्ता 10 वी

 

झाड म्हणजे काय ? इयत्ता 10 वी
झाड म्हणजे काय ? इयत्ता 10 वी

 

‘झाड म्हणजे काय’ असा प्रश्न कुणाला विचारला, तर तो काय उत्तर देईल? काहीजण म्हणतील, ‘झाड म्हणजे ‘गवत नव्हे, तर आणखी काहीजण म्हणतील, ‘झाड म्हणजे वेल नव्हे’. खरंच ‘झाड’ म्हणताच आपल्या मनात काय उभं राहतं ? ज्याची मुळं खोलवर जमिनीत गेली आहेत, ज्याला एक छोटा-मोठा बुंधा आहे, अनेक शाखा म्हणजे फांदया आहेत आणि त्या शाखा हिरव्यागार पानांनी आणि रंगीबेरंगी फुलांनी किंवा फळांनी बहरलेल्या आहेत, असंच दृश्य मनासमोर येईल ना ?

झाड, झुडूप, झाडोरा, वृक्ष, महावृक्ष अशी झाडसृष्टीची विविध नावं आपण ऐकतो. झाडाच्या आसपास वाढलेली झुडपं तुम्ही पाहिलेली असतील, त्यांचं रूप झाडाचंच असतं; पण अपेक्षित उंची, डौलदारपणा या गोष्टी तिथे नसतात. ‘झाडोरा’ हा शब्द सहसा कधी येत नाही, तो ‘झाडझाडोरा’ असाच येतो. झाडझाडोरा म्हणजे एखादया छोट्या-मोठ्या भूप्रदेशावरची सर्व प्रकारची झाडं अन् त्या भोवतीची झुडपं व अन्य वनस्पतिसंग्रह, गंमत म्हणजे ‘झाडा’चा वृक्ष झाला, की लगेच नपुंसकलिंगी असलेलं झाड पुल्लिंगी होतं.

भरपूर उंची आहे, बुंधा चांगला जाडजूड आहे आणि असंख्य फांदया-पानांनी डवरलेलं आहे, असं झाड दिसलं, की आपण त्याला ‘वृक्ष’ म्हणतो आणि याहीपेक्षा आकारमानाने व उंचीने मोठं, दाटीवाटीने बहरलेलं आणि कित्येक वर्षांचं आयुष्य असलेलं असं जे झाड असतं, त्याला ‘महावृक्ष’ म्हणतात.

संस्कृतमध्ये झाडासाठी ‘तरु’ हा शब्द आहे. तो आपण मराठीतही वापरतो. विशेषतः कथा-कवितांमध्ये हा शब्द बरेचदा आढळतो.

हिरवीगार झाडं डोळ्यांना व मनाला शांतता देतात. झाडावर निरनिराळे पक्षी येतात. त्यांची छोटी-मोठी रूपं आल्हाददायक असतात. शिवाय झाड स्वतः अंगावर ऊन झेलून आपल्याला सावली देत असतं .

तुम्ही तुमच्या विज्ञानाच्या पुस्तकात वाचलंच असेल, की झाडं दिवसा हवेतला कार्बन डायऑक्साईड हा वायू शोषून घेतात अन् ऑक्सिजन वायू बाहेर सोडतात. इतकंच नव्हे, तर आपलं अवघं जीवनच वृक्ष-वनस्पतींवर अवलंबून असतं, म्हणूनच प्रत्येकानं एक झाड लावून, त्याची निगा राखून, त्याचं संवर्धन करायला हवं.

 

(गंमत शब्दांची- डॉ. द. दि. पुढे)

 

काही लहान व मोठी झाडे
काही लहान व मोठी झाडे
काही लहान व मोठी झाडे

 

अधिक माहितीसाठी ..


 

 

मित्रांनो या माहिती  मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद

Leave a Comment