वृक्षदिंडी मराठी निबंध 

वृक्षदिंडी मराठी निबंध 
वृक्षदिंडी मराठी निबंध

 

मित्रानो  आज आपण या ब्लॉग मध्ये “वृक्षदिंडी मराठी निबंध” ९ वी -१० वी या विषयावर ब्लॉग लिवणार आहोत .

पर्यावरणाचा प्रश्न ही आजची जागतिक समस्या झाली आहे. प्रदूषणाचे बळी आपण केव्हा होऊ हे सांगता येणार नाही. हा धोका ओळखून आमच्या शाळेने विद्यार्थ्याच्या मदतीने प्रदूषणाशी दोन हात करण्याचे ठरवले.

वनमहोत्सवाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याची तयारी महिनाभर आधी चालू होती. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या घरी एक बालवृक्ष’ तयार करायला सांगितला होता. कोणी कोणते झाड लावावे, याबद्दल प्रत्येकाला स्वातंत्र्य होते. ‘तीस माटबरेली सर्व विद्याथ्र्यांना आपण लावलेली रोपे घेऊन सकाळी सातला शाळेत बोलावले होते, कारण आज शाळेतून वृक्षदिंडी निघणार होती. सान्या गावात फिरून ती परत शाळेतच येणार होती. कारण शाळेच्या मागच्या पटांगणात ही झाडे, सावली जाणार होती. ते बालतरू भूमातेच्या स्वाधीन केले जाणार होते.

तोस सप्टेंबरला सकाळी सातलाच सर्व विद्यार्थी शाळेच्या गणवेशात आपापली. आडे घेऊन शाळेत हजर होते. आतापर्यंत शाळेतून अनेक मिरवणुका निघाल्या होत्या; पण जिचा उत्साह अगदी आगळाच होता. कारण स्वनिर्मितीचा आनंद प्रत्येकाच्या मुखावर दिसत होता. आजच्या मिरवणुकीत दिल्या जाणाऱ्या घोषणाही निराळ्या होत्या.

‘झाडे लावा, झाडे जगवा, प्रदूषणाचा नाश करा’, ‘वृक्षदिंडीचा विजय असो’ आजचे बालतरू, त्याचे महावृक्ष वृक्षदिंडीत काही विद्यार्थ्यांनी वृक्षांसारखे हिरवेगार पोशाख केले होते. ज्यांच्या हातांत फलक होते. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ , ‘एक बालक, एक झाड’, ‘निसर्ग अमुचा सखा, आम्हा आरोग्य देई फुका’, त्या बालतरूंच्या स्वागतासाठी गावातील सारे वातावरण, सारा आसमंत फुलून आला होता.

गावभर हिंडून वृक्षदिंडी शाळेच्या मागच्या पटांगणात आली. झाडे लावण्यासाठी जमिनीची पूर्वतयारी करून ठेवली होती, आळी तयार होती. सर्व विदयाच्यांनी आपापली झाडे लावली. गुरुजीनी, प्रमुखाध्यापकांनीही झाडे लावली आणि काय गंमत!

आकाशाच्या सरीतून त्यांच्यावर पाण्याचा वर्षाव झाला. आम्ही पळत पळत शाळेच्या इमारतीत शिरलो. पाऊस थांबला, टवटवीत झालेली झाडांची पाने वाल्याबरोबर हलून जणू टाळ्याच पिटत होती.

टीप :

1 ) वृक्षदिंडी हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 

 

अधिक माहितीसाठी ..


 

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद 

Leave a Comment