नाम म्हणजे काय ? नामाचे किती प्रकार आहेत ? 

नाम म्हणजे काय ? नामाचे किती प्रकार आहेत ? 

Contents hide
1 नाम म्हणजे काय ? नामाचे किती प्रकार आहेत ?
नाम म्हणजे काय ? नामाचे किती प्रकार आहेत ? 
नाम म्हणजे काय ? नामाचे किती प्रकार आहेत ?

 

जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते, त्याला नाम असे म्हणतात. किंव्हा सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे नाम होय. वास्तविक अथवा काल्पनिक इंद्रियगम्य आणि मनोगम्य वस्तूंसाठी नामे वापरली जातात. विशेष नामातून फक्त एकाच धर्मिचा बोध होतो. उदा. पेन, कागद, राग, सौंदर्य, स्वर्ग इ.

उदा.

फळा, खुर्ची, टेबल, हत्ती, चिता, सिंह, नाक, कान, डोळा, संगीता, शीतल, कुसुम ई .

 

मराठीत नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत.

1 ) सामान्यनाम 

उदा : कुत्रा, मुलगा, शहर

 

2 ) विशेषनाम 

उदा : मोती, राम, मुंबई

 

3 ) भाववाचक नाम

उदा : राग, शौर्य, मृत्यू

 

 नामाची वैशिष्ट्ये :

1) नाम ही संज्ञा वस्तूवाचक आहे. अशी वस्तू काल्पनिक किंवा वास्तविक असू शकते.

2) नाम ही शब्दजाती विकारी असून तिला लिंगवचन विभक्तीचे तसेच शब्दयोगी अव्ययांचे विकार होतात.

3) सामान्यरूप होणे हा नामाचा एक गुणधर्म आहे.

4) शब्दांच्या जातीतील संख्येने सर्वाधिक असणारी शब्दजाती म्हणजे नाम होय.

 

सामान्यनाम म्हणजे काय ? 

सामान्यनाम : ज्या नामाने अनेक धर्मिचा (समान गुणधर्म) अथवा धर्मिसमुदायाचा म्हणजे जातीचा किंवा वर्गाचा बोध होतो त्यास सामान्यनाम असे म्हणतात. सामान्यनामाचे अनेकवचन होते. सामान्य नाम परंपरेने, रूढीने किंवा व्यवहाराने मिळते. कोणत्याही भाषेत सामान्य नामांची संख्या इतर नामांपेक्षा जास्त असते. परभाषेतून जे शब्द येतात त्यामध्ये सर्वाधिक भरणा सामान्यनामांचा असतो. विशेषनाम मात्र मुद्दाम ठेवलेले नाव असते.

उदा. घर, मुलगी, ग्रह, तारा, माणूस इत्यादी.

सामान्यनामाचे खालील दोन प्रकार पडतात.

1 )  पदार्थवाचक नाम :

जे घटक शक्यतो लिटर, मीटर किंवा कि. ग्रॅम अशा परिमाणात मोजले जातात/संख्येत मोजले जात नाहीत, त्या घटकांच्या नावांना पदार्थवाचक नामे म्हणतात.

उदा. तांबे, कापड, पीठ, प्लास्टिक, पाणी, सोने इ.

2 ) समूहवाचक नाम :

समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम म्हणतात.

उदा. मोळी, जुडी, ढिगारा, गंज इ.

 

विशेषनाम म्हणजे काय ? 

विशेषनाम : ज्या नामांनी एका धर्मीचा, म्हणजे एका प्राण्याचा, पदार्थाचा किंवा एका समुहाचा बोध होतो त्यास विशेषनाम म्हणतात. ते फक्त एका घटकापुरते मर्यादीत असते. विशेषनाम एकवचनी असते. विशेषनाम हे प्रामुख्याने ठेवलेले नाम असते. विशेषनामे एकत्वसूचक असून बरेच लेखक त्यांना निरर्थक नामे मानतात कारण दिलेले नाव व व्यक्तीचे गुण यांच्यात बऱ्याचदा तफावत असते.

उदा. गोदावरी, रमेश, औरंगाबाद, ताजमहल, सूर्य, चंद्र, ब्रह्मा, गोपाळ, महेश इ.

 

महत्त्वाचे मुद्दे  :

रविवार, दिवाळी, गांधी जयंती, पृथ्वी, महाराष्ट्र, आमचे बादशहा, मराठा राज्याचे संस्थापक ही विशेषनामेच आहेत. (संदर्भ : शास्त्रीय व्याकरण )

टीप : विशेषनाम व्यक्तिवाचक असते तर सामान्यनाम जातिवाचक असते.

उदा. निखिल – (व्यक्तिवाचक), मुलगा (जातिवाचक)

 

भाववाचक नाम म्हणजे काय ? 

भाववाचक नाम / धर्मवाचक नाम :

ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था व कृती यांच्या नावांना भाववाचक नामे म्हणतात. हे घटक वस्तुस्वरूपात दाखविता येत नाहीत.

उदा. सौंदर्य, मनुष्यत्व, विश्रांती, श्रीमंती, गर्व इ.

टीप : गुणधर्म व भाव दर्शविणाऱ्या शब्दांना भाववाचक नामे / धर्मवाचक नामे म्हणतात. विशेषनामे व सामान्यनामे ही भाव किंवा धर्म धारण करतात; म्हणून त्यांना धर्मीवाचक नामे म्हणतात.

भाववाचक नामांचे तीन गट पडतात : 

1 ) स्थितिदर्शक

गरिबी , स्वातंत्र्य

2 ) गुणदर्शक

सौंदर्य  , प्रामाणिकपणा

3 ) कृतिदर्शक

चोरी , चळवळ

 

वाक्यातील नाम कसे ओळखावे ?

 

1) वाक्याचा कर्ता व कर्म नामच असते.

उदा. वाघाने ससा पकडला.

 

2) षष्ठी प्रत्ययाच्या (चा, ची, चे, च्या) मांगे व पुढे दोन्ही नामेच असतात.

उदा. आजकाल यंत्रांचा वापर खूप वाढला आहे.

 

3) शब्दयोगी अव्ययाने जोडलेला शब्द नामाचे कार्य करतो किंवा नाम असतो.

उदा.  1) सत्तेपुढे शहाणपण चालत नाही.

(2) पक्षी झाडावर बसला.

 

4) विभक्तीचे प्रत्यय जोडलेले शब्द नाम असतात किंवा नामाचे कार्य करतात.

उदा. 1) सागराने प्रतिसाद दिला.

2) काकांना नमस्कार सांगा.

 

5) सर्वनामाच्या झा, झी, झे, झ्या प्रत्ययानंतर नाम असते.

उदा. माझा सदरा, तुझे पुस्तक

 

नाम म्हणजे काय ? नामाचे किती प्रकार आहेत ? 
नाम म्हणजे काय ? नामाचे किती प्रकार आहेत ?

 

नामांचे विविध उपयोग

1) सामान्यनामाचा विशेषनाम म्हणून उपयोग :

एखाद्या सामान्यनामाचा एखादी विशिष्ट व्यक्ती, स्थळ किंवा वस्तू तसेच प्राण्यासाठी उपयोग केल्यास ते विशेषनाम होते.

1) आमचा पोपट कालच गावाला गेला.

3) आत्ताच राजू नगरहून आला.

2) शेजारच्या चिमणाबाई कालच देवाघरी गेल्या.

4) आमची बेबी नववीत आहे.

 

2) विशेषनामाचा सामान्यनाम म्हणून उपयोग :

एखाद्या विशेषनामाचा उपयोग दुसऱ्याला उपमा देण्यासाठी किंवा अनेकवचन म्हणून केल्यास ते सामान्यनाम होते.

1) आमची बायको म्हणजे लक्ष्मी.

2) आईचे सोळा गुरुवारांचे व्रत आहे.

3) तुमची मुलगी त्राटिकाच दिसते.

4) कालिदास हा भारताचा शेक्सपिअर आहे.

 

Video credits : Active Guruji Youtube channal

 

 

आमचे इतर काही व्याकरण पोस्ट : 
रसग्रहण म्हणजे काय ?
पारिभाषिक शब्द 
रूपक कथा म्हणजे काय ?
निबंध लेखन कसे करावे ? 

 


 

मित्रांनो या माहिती  मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद

Leave a Comment