पारिभाषिक शब्द इयत्ता 9 वी व 10 वी

पारिभाषिक शब्द

पारिभाषिक शब्द इयत्ता 9 वी व 10 वी
पारिभाषिक शब्द इयत्ता 9 वी व 10 वी

 

ज्ञानप्रसाराच्या विविध माध्यमांत आणि जीवन व्यवहारात सतत बदल होत असतात. साहजिकच त्या त्या ज्ञानक्षेत्रात वा व्यवहारात प्रचलित शब्दांहून वेगळे शब्द वापरले जातात. विशिष्ट ज्ञानक्षेत्रातील माहिती, संकल्पना यांच्या प्रकटीकरणाला योग्य ठरतील असे शब्द वापरण्याची गरज असते.

भाषिक व्यवहाराच्या या वेगळेपणातून ज्ञानक्षेत्रांची वा व्यवहारांची परिभाषा सिद्ध होते. अशा परिभाषेतून शास्त्रभाषेचा व ज्ञानभाषेचा विकास होत असतो. बदलते जीवनव्यवहार, वाढत्या गरजा आणि विस्तारणारी ज्ञानक्षेत्रे यांनुसार ‘पारिभाषिक संज्ञा’ निर्माण होतात.

पारिभाषिक पदनामांच्या वापरामुळे किंवा पारिभाषिक संज्ञांच्या वापरामुळे विचार, संकल्पना यांच्या प्रकटीकरणात विशिष्टता, निर्दोषता येते. पारिभाषिक संज्ञांचा मूळ उद्देश व्यवहारसापेक्ष भाषेचे उपयोजन हा आहे.

शिक्षण, विविध शास्त्रे, प्रशासन, आरोग्य, समाज, उद्योग, व्यापार, न्याय, आर्थिक व्यवहार, कला, संस्कृती इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये आवश्यकतेनुसार पारिभाषिक संज्ञा उपयोगात आणल्या जातात. या संज्ञांमुळे ज्ञानव्यवहार अधिक प्रभावी आणि सुस्पष्ट होतात. या दृष्टीने पारिभाषिक संज्ञांना अनन्यसाधारण महत्त्व असते.

 

पारिभाषिक शब्द पुढीलप्रमाने : 

 

Absence – अनुपस्थिती

Academic Qualification – शैक्षणिक अर्हता

Action – कार्यवाही/कृती

Affidavit – शपथपत्र

Agent – अभिकर्ता, प्रतिनिधी

Application Form – आवेदनपत्र

Anniversary –  वर्धापनदिन

Bench – आसन, न्यायासन

Bio-data –  स्व-परिचय

Bonafide Certificate – वास्तविकता प्रमाणपत्र

Book post – पुस्त-प्रेष

Book Stall –  पुस्तकविक्री केंद्र

Drama  – नाटक

Dismiss – बडतर्फ

Due Date – नियत दिनांक

Earned Leave  – अर्जित रजा

Exchange –  देवाण घेवाण, विनिमय

Express Highway – द्रुतगती महामार्ग

Event – घटना

Exhibition – प्रदर्शन

Feedback – प्रत्याभरण

Calligraphy – सुलेखन

Children’s Theatre – बालरंगभूमी

Comedy – सुखात्मिका

Census –  जनगणना

Casual Leave –  नैमित्तिक रजा

Category – प्रवर्ग

Commentator –  भाष्यकार, समालोचक

Correspondence –  पत्रव्यवहार

Corporation – महामंडळ, निगम

Daily Allowance – दैनिक भत्ता

Daily Wages – दैनिक वेतन, रोजंदारी

Documentary –  माहितीपट

Lyric – भावगीत

Magazine – नियतकालिक

Medical Examination – वैद्यकीय तपासणी

Mortgage  – गहाण, तारण

No Objection –  ना हरकत प्रमाणपत्र

Certificate (NOC) News Agency –  वृत्तसंस्था

Official Record – कार्यालयीन अभिलेख

Orientation – निदेशन, उद्बोधन

Overtime – अतिरिक्त काल

General Meeting – सर्वसाधारण सभा

Fellowship – अधिछात्रवृत्ती

Government Letter – शासकीय पत्र

Goodwill – सदिच्छा

Half Yearly – अर्धवार्षिक

Honourable – माननीय

Humanism – मानवतावाद

Index – अनुक्रमणिका,निर्देशसूची

Initials – आद्याक्षरे

Interpreter – दुभाषी/भाषांतरकार

Joint Meeting – संयुक्त सभा

Junior Clerk – कनिष्ठ लिपिक

Journalism – पत्रकारिता

Lecturer – अधिव्याख्याता

Senior Clerk – वरिष्ठ लिपिक

Letter-Head – नाममुद्रित प्रत

Show Cause Notice – कारणे दाखवा नोटीस

Labour Court – कामगार न्यायालय

Sourvenir – स्मरणिका

Supervisor – पर्यवेक्षक

Valuation – मूल्यांकन

Verbal – शाब्दिक, तोंडी

Workshop – कार्यशाळा

Up-to-date – अद्ययावत

Wall Paper – भिंतीला चिकटवण्याचा कागद

Yard – आवार

Zero Hour – शून्य तास

Zone – परिमंडळ, विभाग

Open letter – अनावृत्त पत्र

Part Time – अंशकालीन, अर्धवेळ

Patent – एकस्व / अधिहक्क

Press Note – प्रसिद्धिपत्रक

Programme – कार्यक्रम

Pocket Money – हातखर्च

Quorum – गणसंख्या

Qualitative – गुणात्मक

Registered Letter – नोंदणीकृत पत्र

Reservation – आरक्षण

Revaluation – पुनर्मूल्यांकन

Receptionist – स्वागतकार

Refreshment – अल्पोपाहार

Secretary – सचिव, कार्यवाह

Lesson Note – पाठ टिपणी

Service Book – सेवापुस्तक

Lift – उद्वाहन यंत्र, उद्वाहक

Sonnet – सुनीत (काव्यप्रकार)

Undertaking – हमीपत्र

Unit – घटक, एकक

Survey – सर्वेक्षण, पाहणी

Synopsis – प्रबंध रूपरेषा, सारांश

Tax – कर

Therapy – उपचारपद्धती

Transport – परिवहन

Trade Mark – बोधचिन्ह

Mobile – भ्रमणध्वनी

Translator – अनुवादक

Unauthorized – अनधिकृत

 

पारिभाषिक शब्द इयत्ता 9 वी व 10 वी

पारिभाषिक शब्द मराठी

 

अधिक माहितीसाठी ..

 


 

 

मित्रांनो या माहिती  मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद

Leave a Comment