Granth Hech Guru Marathi Nibandh। ग्रंथ हेच गुरू मराठी निबंध

Granth Hech Guru Marathi Nibandh। ग्रंथ हेच गुरू मराठी निबंध

 

Granth Hech Guru Marathi Nibandh। ग्रंथ हेच गुरू मराठी निबंध
Granth Hech Guru Marathi Nibandh। ग्रंथ हेच गुरू मराठी निबंध

 

मित्रानो , या पोस्ट मध्ये ग्रंथ हेच गुरू मराठी निबंध लेखन / Granth Hech Guru Marathi Nibandh 100 ते 400 शब्दात निबंध लेखन करणार आहोत . हा निबंध 7 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्याना परीक्षेत वैचारिक निबंध म्हणून विचयाराला जातो त्यामुळे निबंध नीट वाचा.  आज आपण Granth Hech Guru Marathi Nibandh या विषयावर निबंध बघणार आहोत.

अनेक थोर पुरुषांची चरित्रे सांगतात की, त्यांच्या थोरपणाचे रहस्य हे ग्रंथवाचनाच्या आवडीत सापडते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात की, ‘वाचाल तर वाचाल !’

ग्रंथवाचनाने माणूस बहुश्रुत होतो. भूतकाळाशी तो वर्तमानाची सांगड घालू शकतो. ग्रंथवाचनाने आपल्या नकळत आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधला जातो. महात्माजींचे चरित्र वाचताना आपल्या लक्षात येते की, टॉलस्टॉयच्या नाना प्रयोगांची ओळख बापूंना ग्रंथांतून झाली. आयर्लंडच्या देशभक्ताच्या – मॅझिनीच्या चरित्रातून सावरकरांना स्वदेशभक्तीची बाळगुटी मिळाली.

आजच्या युगात मुद्रणकलेच्या विकासामुळे ग्रंथनिर्मिती विपुल प्रमाणात होत आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की, आज या दूरचित्रवाणीच्या रंगीबेरंगी जगात गुरफटलेल्या माणसाची वाचनाची आवड मात्र नामशेष होत चालली आहे. त्यामुळे अनेक ग्रंथांना वर्षानुवर्षे ग्रंथालयाच्या पुस्तकांच्या दुकानांच्या कपाटात पडून राहावे लागत आहे. पण इतिहास काळापासून चालत आलेले या गुरूंचे ज्ञानदानाचे काम आजही अविरत चालू आहे.

इतिहास सांगतो की, ज्या काळात मुद्रणकला अवगत नव्हती, त्या काळातही अनेक ज्ञानतपस्वी व ज्ञानप्रेमी ज्ञानप्राप्तीसाठी, ग्रंथ उतरवून घेण्यासाठी, देशोदेशी हिंडत. चिनी प्रवासी नालंदा, तक्षशिला येथील ग्रंथालयांत रमलेल्यांचा उल्लेख इतिहासात आढळतो.

ग्रंथगुरू हे भेदभाव करत नाहीत. काळा-गोरा, श्रीमंत-गरीब, स्पृश्य-अस्पृश्य असा त्यांच्याजवळ फरक नसतो. संताने ग्रंथ वाचला तर त्याला जे कळते तेच दुष्टाने। ग्रंथ वाचला तर त्यालाही समजते; पण ते त्याला उमगत नाही वा कळूनही तो आचरणात आणत नाही.

ग्रंथांना दिशा वा काळाची बंधने नाहीत. ग्रंथगुरू आपल्या शिष्यांना ज्ञान देताना काही हातचे राखून ठेवत नाहीत वा त्यांच्याकडून गुरुदक्षिणेची वा गुरुसेवेची अपेक्षा ठेवत नाहीत. शिष्याच्या मर्जीनुसार ते केव्हाही, कोठेही ज्ञान देण्यास सिद्ध असतात.

प्रसिद्ध विचारवंत जॉन रस्किन म्हणतो, “पुस्तक नसलेलं घर खिडक्या नसलेल्या खोलीप्रमाणे असतं.” जिथे ग्रंथ नाही तेथे ज्ञान नाही. ग्रंथालयाविना जो गाव राहील, त्याला अर्थ नाही. लोकमान्य टिळकांनी म्हटले होते की, “मी नरकातसुद्धा उत्तम पुस्तकाचं स्वागत करीन. नरकातही मी पुस्तकांच्या साहाय्याने स्वर्ग निर्माण करीन. कारण पुस्तकांचं सामर्थ्य मी जाणतो.”

 

ग्रंथ हेच गुरु भाषण । Granth Hech Guru Bhashan

 

“ग्रंथ हेच खरे गुरु होय” ग्रंथ हे आपल्या आयुष्यभराच्या ज्ञानाची, आत्मज्ञानाची कल्पकतेची शिदोरी असते. ग्रंथ हे निरंतर ज्ञान देण्याचे कार्य करतात. सतत ग्रंथ वाचल्याने आपल्या बुद्धीची कार्यक्षमता वाढते, आकलनक्षमता वाढते, विचारकरण्याची शक्ती मिळते. खरंच आई व गुरूंसारखे आपल्याला ज्ञानदानाचे कार्य हे ग्रंथ करतात. ग्रंथवाचनाने आपल्याला संभाषण कला, वक्तृत्वकला, आत्मविश्वास, अनुभव, लेखनकौशल्य इत्यादी गुणांचा विकास होतो. खरा मित्राची महती, सुखदुःखातिल सोबती, म्हणजेच ग्रंथ होय. ग्रंथ हेच खरे गुरू व मार्गदर्शक होय. अज्ञानाचा अंधार नाहीसा करून ज्ञानरूपी प्रकाश दाखविणारा सूर्य म्हणजेच ग्रंथ होय.

ग्रंथ, एका गुरूसारखे आपले योग्य मार्गदर्शन करतात. ग्रंथ आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवतात, आपल्यावर चांगले संस्कार करतात. एखाद्या समस्यात अडकल्यास, एका गुरूसारखे, ग्रंथ आपल्याला समस्येतून निघायला मदत करतात. ग्रंथ वाचल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो, आपण स्वतःवर विश्वास करण्यास शिकतो.

एका गुरूसारखेच, ग्रंथ सुद्धा आपल्याला धर्माचे महत्व, काय योग्य आहे आणि काय अयोग्य, हे सांगतात. ग्रंथ वाचून आपले मन शांत होते, आपली मनःस्थिति बदलते,आपले विचार सकारात्मक होतात.

ग्रंथ वाचल्यामुळे आपली विचार करण्याची शक्ती वाढते, आपला शब्दसंग्रह वाढतो, आपली कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढते. अशा प्रकारे, ग्रंथ खूप महत्वपूर्ण असतात आणि म्हणून त्यांना गुरुसारखेच सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. खरंच, ‘ग्रंथ आपले गुरु’ आहेत.

ग्रन्थ आपल्याला गुरूप्रमाणे मार्गदर्शन करतात. त्यांनीच कोपर्निकसला मार्ग दाखविला. सी. व्ही. रामन सारख्या शास्त्रज्ञानां संशोधनात मदत करणारे ग्रन्थच होते. आणि यांनीच कालिदास, शेक्सपिअर, भवभूती यांच्या कलेत गुरुचे स्थान भूषविले. ‘शारदा’, ‘इंदू काळे’, ‘सरला भोळे’.

‘एकच प्याला’. यां सारख्या समस्यां प्रधान ग्रथांनी सामाजिक समस्यांची उकल करण्याची दृष्टी दिली. रस्किनच्या ग्रँथाचे वाचन करताच बॅरिस्टर मोहनदास गांधी यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन झाले. त्याच क्षणी जगातील अनेक महात्म्यांचा अवतार उदयास आला.

चरक, सुश्रुत आणि असेच अनेक वैद्यकीय क्षेत्रातील ग्रन्थ आजच्या पिढीलाही मार्गदर्शक ठरलेले आहे. त्याच प्रमाणे थोरव्यक्तींचे चरीत्रग्रन्थ जीवनात आपल्याला ध्रुवताऱ्या प्रमाणे मार्गदर्शन करतात.

हजारो पाकक्रिया, सुरुची,रुचिरा, अन्नपूर्णा आणि अनेक यांसारखे ग्रन्थ गृहिणींना पाककला शिकविताना खऱ्या सहचरीपेक्षा हि अधिक जवळचे भासतात. आणि समजा एखादी पाकक्रिया बिघडली तरी या सख्या हसून चेष्ठा करण्याचे भय नसते. आपलेच पूर्वज असलेले लेखक पु.ल.देशपांडे, ,काकासाहेब कालेलकर, गंगाधर गाडगीळ यांचे ‘अपूर्वाई’, ‘पूर्वरंग’ प्रवासवर्णात्मक ग्रन्थ तसेच हासास्पद लेखन केलेले विनोदी लेखन केलेले असे कित्येक ग्रन्थ वाचताना जीवनात आनंद निर्माण होतो. असे कित्येक लेखकांचे धार्मिक ग्रन्थ वाचताना जीवनात धैर्य वाढविणारे आहेत.

तुरुंगात असताना सुद्धा ग्रँथाचा अभ्यास करून परीक्षा देणारे व ग्रन्थ वाचनाने आपल्या जीवनाला नवा चांगला आकार देणारे कैदीही अनेकानेक आहेत. असे कित्येक महान व्यक्ती आहेत कि ग्रन्थाच्या वाचनातून आपल्या जीवनाचा कायपालट करून तपस्वी होऊन गेलेत.

अशा विविध प्रकारे, बर्या वाईट प्रसंगात, संगतसोबत करणाऱ्या ग्रन्थरुपी मित्राची आपल्याकडून मात्र परतफेड म्हणून काहीच अपेक्षा नसते. त्यांना एकदा वाचून कपाटात बंद करून ठेवले किंवा त्यांना निष्काळजीपणे हाताळले तरी तोंडातून ब्र काढत नाही. तेव्हा तुम्हीच विचार करावा कि व्यक्तीमित्र चांगला कि ग्रन्थमित्र. सूर्याला संस्कृत भाषेत मित्र म्हणतात.

ग्रन्थरुपी मित्र हा सूर्याप्रमाणे अज्ञानरूपी अंधार नष्ट करून ज्ञानाचा प्रकाश पडून ते आपल्या जीवनात आनंद,चैतन्य फुलवितात. म्हणूनच म्हणतात कि ग्रन्थ हेच आपले सर्वात जवळचे मित्र व आपले खरे सोबती होत .

 

ग्रंथ हेच गुरु कविता । Granth Hech Guru Poem
ग्रंथ हेच गुरु कविता । Granth Hech Guru Poem

ग्रंथ हेच गुरु कविता । Granth Hech Guru Poem

 

मला ग्रंथ गुरू लाभले
दुःख अंतरीचे गेले
मार्ग ज्ञानाचा सापडला
जगात मार्ग तू दाखविला

त्याच्या सारखे दैवत
जगी मानवाच्या सुखात
परमानंद मला मिळे
त्याच्या सहवासात मिसळे

असा अगाध महीमा
तिसरा डोळा आम्हा
अज्ञानास दिले ज्ञान
अंधारमय सारीले जीवन

ज्ञानाचा दिवा पेटवून
विश्वाला दिली शिकवण
शोधून लाखात एक दागिना
ग्रंथाविना कुठेच मिळेना

सुख,शांतीचा आगर
समाधान चित्ती भरपूर
जीवनाचा खरा सारथी
ग्रंथा तुज्यासारखा साथी

मन,धन सर्व काही
तुझ्यासारखी श्रीमंती नाही
आनंद तू देणारा
संकटी तूच तारणारा

वाचन जनाचे अमर
जीवन घडविले थोर
संस्कार,संस्कृती माहेरघर
सर्व शब्दांचा भव सागर

भाषेचा आत्मा तू
दानशूर वाटाड्या तू
अनमोल तुझे उपकार
कधी पडणार नाही विसर

poem source : pinterest

 

प्राचीनकालीन ग्रंथ व त्यांचे लेखक : 

 

[wpdatatable id=22]

 

वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता :

Granth Hech Guru Marathi Nibandh

ग्रंथ हेच गुरू मराठी निबंध

Granth hech guru information in marathi

Granth hech guru marathi speech

ग्रंथ हेच गुरु कविता

ग्रंथ हेच गुरू निबंध मराठी

 

आमचे इतर काही निबंध पोस्ट : 

 

टीप :

1 )  ग्रंथ हेच गुरू निबंध निबंध हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0 वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 


मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद. 

 

Leave a Comment