नदी बोलू लागली तर निबंध । Nadi Bolu Lagali Tar Essay In Marathi

नदी बोलू लागली तर निबंध । Nadi Bolu Lagali Tar Essay In Marathi 

 

नदी बोलू लागली तर निबंध । Nadi Bolu Lagali Tar Essay In Marathi 
नदी बोलू लागली तर निबंध । Nadi Bolu Lagali Tar Essay In Marathi

 

 

बऱ्याच दिवसांनी यंदा सुट्टीत आम्ही आमच्या गावी आलो होतो. आमच्या गावामधून वाहणारी कुशी नदी, म्हणजे आमच्या गावाचे वैभव आहे . याच नदीत मी पोहायला शिकलो होतो. त्यामुळे गावी आल्यावर माझी पावले सहजच वळली ती नदीकडे.

कुशी नदीला पाहून मला त्यावेळेस धक्काच बसला. कुशी रोडावली होती व तिचे पाणी दूषित झाले होते. माझ्या लहानपणची कुशी नदी मुळातच अशी नव्हती. कसे कोण जाणे कुशीने माझ्या मनातला विचार जाणला आणि एक दुःखाचा उसासा टाकून कुशी नदी बोलू लागली – “अरे, माझे रूप पाहून घाबरलास ना तू ! तुमच्या गावाच्या बाजूला जे शहर आहे, त्या शहरात अनेक कारखाने निघालेत. त्यांचे दूषित पाणी माझ्यात आणून सोडल्याने माझी ही अवस्था झाली आहे.

माणसेच काय पशू, पक्षी, जलचर प्राणी  यांनीही आता माझी संगत सोडून दिली आहे. तुमच्या एका कवीने म्हटले आहे, ‘सरिता, करिते का कधी खंत ?‘ पण खरोखर सध्या खंत करण्याशिवाय माझ्याजवळ काही उरलं नाही.

एकेकाळचे ते मोहरलेले दिवस आठवले की, आज अशा अवस्थेतही अंग आनंदाने थरारते. माझ्या पात्रात भरपूर पाणी खळाळत होते. गावातील शेती, बागा, मळे सदा हिरवेगार राहात होते. घराघरातील कळशा माझ्या काठावर येत होत्या. रिकाम्या घागरी येथे भरल्या जात होत्या. सासुरवाशिणी माहेरवाशिणी यांच्या गप्पांतून मी घराघरातील हकीकत जाणत होते. प्रसन्न, आनंदी वातावरण होते.

आता माझ्या वरच्या अंगाला धरण बांधले गेले आहे. त्यामुळे माझ्या पात्रात पाणी सोडायचे की नाही हे त्या धरणअधिकाऱ्याच्या मर्जीवर अवलंबून राहते. गावात घराघरांतून नळ आल्याने गावकऱ्यांना माझी गरज राहिली नाही. या दूषित पाण्याचा त्रास गावकऱ्यांनाही होतो आहे. गावाचे आरोग्य बिघडत चालले आहे.

परवाच माझ्या कानावर आले की, गावात नुकतीच प्रदूषण दूर करण्याबाबत विचार करण्यासाठी गावकऱ्यांची सभा झाली. लवकरच गावकरी माझ्या शुद्धीकरणाचाही कार्यक्रम आखतील अशी आशा आहे.”

 

नदी बोलू लागली तर निबंध । Nadi Bolu Lagali Tar Essay In Marathi
नदी बोलू लागली तर निबंध । Nadi Bolu Lagali Tar Essay In Marathi

 

मी नदी बनलो / बनले, तर…

 

बऱ्याच काळाने मी गावी जात होतो. गेल्या गेल्या नदीत पोहायला जायचं, पूर्वीसारखी खूप मजा करायची असे चेत मनात चालले होते. मनात आलं. एकदा नदीच्या उगमापासून तिच्या काठाकाठाने खूप दूरपर्यंत जाऊन यावं. किती बहार येईल! वाटलं, त्यापेक्षा मीच नदी बनली तर…? थेट डोंगरात सुरुवात करून अनेक प्रदेशांतून रमतगमत समुद्रापर्यंत जायचं! किती सुंदर कल्पना!

मी नदी बनलो तर… मी डोंगरमाथ्यावरून खूप खोल दरीत उडी मारीन. डोंगरातून सोप्या सोप्या मार्गाने येणारच नाही. माणूस असल्याने आता मला जाता येत नाही अशा अडचणीच्या जागांवरून, झाडाझुडपांतून, या कातळावरून त्या खडकावर उद्या भारत उसळ्या घेत खाली येईन. तिथून रमतगमत समुद्रात.

समुद्रात गेल्यावर तर मज्जाच मज्जा तऱ्हेतऱ्हेचे लहानमोठे हजारो रंगीबेरंगी मासे पाहीन. त्यांच्या अंगांवरून हात फिरवून पाहीन. मला भीतीच वाटणार नाही कधी समुद्राच्या महाकाय लाटांबरोबर दंगामस्ती करीन तर कधी समुद्राच्या तळात असलेल्या खोल भुयारांतून, गुहांमधून एकटाच हिंडेन !

मी नदी बनलो तर एक गोष्ट नक्की करीन, डोंगरातून उतरताना उड्या मारत उसळत येईन, तसा गावात आल्यावर धावणार नाही. गावातून मी संथपणे वाहत जाईन. माझ्या पात्रात मी लहानमोठे डोह निर्माण करीन. मग माझ्यासारखीच खूप मुलं येऊन मनसोक्त डुंबतील, पोहतील, मला त्यांच्याशी खेळायला मिळेल.

मी माझ्या काठावर मोठमोठी खूप झा वीन जाणारे-येणारे वाटसरू मग घटकाभर माझ्या काठाशी विसावा घेतील व पुढे जातील. संध्याकाळी अनेक लोक काठावर येतील. माझ्या प्रवाहाचं सौंदर्य न्याहाळत आनंदाने गप्पा मारतील आणि तृप्त होऊन घरी परततील. मी नदी बनलो हर नदीच्या काठावरील सर्व परिसर ‘सुजल सुफल’ बनवीन.

मी आता है मनोराज्य रंगवीत आहे खरं. पण याच्या विपरीत घडलं तर? लोकांनी झाड तोडून टाकली. पर्यावरण | उद्ध्वस्त केलं तर? तर मग, मी आता कल्पना करतोय ते माझं रमणीय रूप शिल्लक राहणारच नाही. पावसाळ्यानंतर लगे माझं पात्र कोरडे ठणठणीत होईल. काठावरची झाडं सुकून मरून जातील.

लोक केवळ भाण करण्यासाठीच माझ्या पात्राचा उपयोग करतील. सांडपाणी मोडतील. घाण पाण्याची डबकी साचतील, दुर्गंधी पसरेल. कदाचित रोगराई पसरेल. भरा लोक मालाच शिव्याशाप देतील. माझ्याकडे कोण फिरकणारसुद्धा नाही। बाप रे! नकोच ते नदी होणं ।

 

वरील निबंध हा कल्पनाविलासात्मक निबंध असून हे काल्पनिक आहे .

प्रास्ताविक : कल्पनाविलासात्मक निबंध लिहिताना कल्पनांत मश्गुल व्हायचे असते, तरल कल्पनाशक्तीचा आविष्कार या प्रकारच्या निबंधात आवश्यक बाब आहे. म्हणजे येथे वर्ण्यविषयाबाबतची मनोराज्ये रंगवायची असतात. पण हा कल्पनांचा खेळही ज्या विषयाबद्दल आपण लिहिणार त्याच्या वास्तवरूपाला धरून असावा.

आपल्याला नेहमी ज्या गोष्टी अपरिहार्य वाटतात, अटळ वाटतात त्या नसल्यास काय होईल, याबद्दल स्वैर कल्पना आपण करू शकतो, क्वचित कल्पनाचमत्कृतीलाही वाव देऊ शकतो.

अशा निबंधाची सुरवात एखादया परिचित दैनंदिन प्रसंगातून करावी. कल्पना वेगवेगळ्या असल्या तरी त्या एका सूत्रात गुंफल्यास आपला निबंध बांधेसूद होईल, विस्कळित होणार नाही .

नदी बोलू लागली तर निबंध विडियो माध्यमातून 

Video credit : SANJAY NANANDKAR Youtube channel

 

वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता 

नदी बोलू लागली तर निबंध 
Nadi Bolu Lagali Tar Essay In Marathi
मी नदी बनलो / बनले, तर…

टीप :

1 ) नदी बोलू लागली तर  हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 

आमच्या इतर निबंध पोस्ट :

परीक्षा नसत्या तर निबंध । Pariksha Nasatya Tar Essay In Marathi 

मी आमदार झालो तर निबंध। Mi Amadar Jhalo Tar Essay in Marathi 

रंग नसते तर निबंध । Rang Nasate Tar Nibandh 

मला लॉटरी लागली तर निबंध

 


 

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद . 

 

Leave a Comment