Best 10 Love Poem in Marathi। मराठी प्रेम कविता। Marathi love poem
“प्रेम” हा असा शब्द आहे की त्याच्याबद्दल ऐकताच आपण आपल्या विचारांच्या दुनियेत हरवून जातो आणि आपल्या आयुष्यात ज्या व्यक्तीवर आपण सर्वात जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीची आठवण करून देतो.
‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं.. तुमचं आणि आमचं एकदम सेम असतं’ प्रेम म्हटलं की, मंगेश पाडगावकरांची ही कवितेची आठवण होतेच . (Marathi Prem Kavita) प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेग-वेगळी असली तरी मनातील भावना या नेहमीच त्या एकमेकाणसाठी सेम असतात. मनातील प्रेमाची भावना कवितेतून मांडली गेली तर त्यातून प्रेमाचा अधिक वर्षाव होतो. चला तर प्रेमवीरांसाठी जाणून घेऊया मराठी प्रेम कविता. (Prem Kavita In Marathi) प्रेम ही शब्दात व्यक्त होऊ न शकणारी भावना शब्दात मांडण्याचा केलेला प्रयत्न आपण केला आहे त्यासाठी आपण अनेक कवीच्या कविता येते मांडल्या आहे .
प्रेम म्हणजे तू
प्रेम म्हणजे तुझा मेसेज,
प्रेम म्हणजे माझा फोन,
प्रेम म्हणजे रात्र वेडी,
प्रेम म्हणजे वेडे दोन,
प्रेम म्हणजे तुझा आवाज,
प्रेम म्हणजे तुझं हसणं.
प्रेम म्हणजे तुझं असणं,
प्रेम म्हणजे तुझं रुसण
प्रेम म्हणजे ‘काय बोलू?,
प्रेम म्हणजे ‘बोल ना
प्रेम म्हणजे ‘माहित नाही:
प्रेम म्हणजे ‘काहीच नाही :
प्रेम म्हणजे माझे प्रश्न,
प्रेम म्हणजे तुझे प्रश्न.
प्रेम म्हणजे उत्तर असणं,
प्रेम म्हणजे शब्द नसणं.
. – भावनि
Marathi prem kavita
तुझं माझं नातं
तुझ्या माझ्या नात्याला मी काय नाव देऊ
कारण नात्यांना नावं दिली, कि ति गुंतात,
अडकतात, तुटतात आणि क्षणात संपतात
तुझं माझं नातं जरा वेगळच आहे
ते गुंतलेलं नाही आहे नात्यांच्या जाळ्यात
ते तर खूप सुंदर छान आणि स्वतंत्र आहे
जे गुम्फलेलं आहे स्नेहाच्या धाग्यात
किती उबदार उठावदार असा नाजुक
जसं भर उन्हात गार वाऱ्याची झुळूक
तुझ्यासाठी मी कोण आहे ……
ह्या प्रश्नाचं उत्तर नसेलच तुझ्याकडे
पण तू माझ्यासाठी कोण आहे…..
हयाचं उत्तर मात्र आहे माझ्याकडे
आणि तेच पुरेसं आहे माझ्यासाठी
आणि माझ्या जगण्यासाठी….
. राकेश शिंदे
Marathi prem kavita charolya
ती आणि मी
तिला गर्दी हवी असते,
मला एकांत हवा असतो.
तिला शब्द हवे असतात,
मला शांतता हवी असते.
तिला बाल्कनी हवी असते,
मला कोपरा हवा असतो.
कॉफी दोघांनाही आवडते पण …
तिला कोल्ड हवी असते,
मला हॉट हवी असते.
आवड वेगळी
असली तरीही..
तिला मी हवा असतो,
मला ती हवी असते.
. # मनन
Romantic marathi prem kavita
सोबत
तू सोबत असताना,
आयुष्य किती छान वाटतं….
उनाड मोकळं,
एक रान वाटतं…..
सदैव मनात जपलेलं,
पिंपळपान वाटतं…..
कधी बेधुंद,
कधी बेभान वाटतं…..
खरचं,
तू सोबत असताना,
आयुष्य किती छान वाटतं……
. चित्रकविता
Marathi prem kavita for girlfriend
तुझ्याशिवाय
म्हणे नाती खूप अनामोल असतात
जितकी मजबूत बनतात
तितकीच लवकर तुटत असतात
खरचं ही नाती अतूट असतात का….?
जातांना म्हणालीस विसर मला
जमलेच तर आता सावर स्वत:ला
खरचं विसरणे सोपे असेल तर…..
मी खरचं तुला विसरु शकेन का ?
आज संपवतो आहे स्वत:ला
एक नवे आयुष्य जगण्यासाठी
जगलो होतो ते नाते जपण्यासाठी
खरचं मी तुझ्याशिवाय जगू शकेन का ?
लिहीलेल्या तुझ्याचसाठी
अशा अनेक कविता…
आज धूळ खात पडल्या आहेत……
कदाचित तू त्या वाचल्या असशील………
कदाचित नसशील ही……
heart touching marathi kavita on life
प्रेम…
प्रेम नाही; हवी असते एक जखम फक्त
ज्याच्यायोगे गरम राहील धमन्यांमधले रक्त
ओल्या आठवणींचे काही क्षण हवे असतात
चाकोरीला उध्वस्ताचे घण हवे असतात….
तसे काही चेहऱ्यावरती अधिक उणे नसते
पण मनात दु:खी असणाऱ्यांचे हसणे वेगळे दिसते !
ओठांत नाही हवी असते डोळ्यांत एक कथा
हवी असते षड्जासारखी सलग, शांत व्यथा….
गाणे नाही; गाण्यासाठी उर्मी हवे असते
वरून खाली कोसळणारी मिंड हवी असते
स्वर नाही, हव्या असतात स्वरांमधल्या श्रुती
प्रेम नाही, हवी असते मला चौथी मिती !…
प्रेम नाही दुःखासाठी तारण हवे असते
स्वतःवरच हसण्यासाठी कारण हवे असते
मनासाठी हवा असतो अस्वस्थाचा शाप
आत्म्यासाठी हवा असतो निखळ पश्चात्ताप !…
. संदीप खरे
Prem kavita marathi text
प्रेम कर भिल्लासारखं
पुरे झाले सुर्य चंद्र, पुरे झाल्या तारा,
पुरे झाले नदीनाले, पुरे झाला वारा
मोरासारखा छाती काढून उभा राहा
जाळासारखा नजरेमध्ये नजर बांधून पहा,
सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा
पुरे झाले सुर्य चंद्र, पुरे झाल्या तारा
शेवाळलेले शब्द अन यमक छंद करतील काय?
डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधील काय?
उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत,
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय?
डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधील काय?
म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापुर्वी वेळ,
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं,
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवून सुध्दा मेघापर्यंत पोचलेलं
शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस,
बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफान सारं काळजामध्ये साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेल!
. – कुसुमाग्रज
तुझ्या नयना
तुझ्या नयना मधी स्वताला न्याहाळून घ्यावे
रोज नव्याने तुला पहावे
पाहताच तुला रिमझिम सरी बरसावी
वाऱ्याची गिरकी हळूच यावी
धुंद व्हावी दिशा सारी
तु माझ्या मिठीत यावी
पक्षांची किलबिल गाणी कानी पडावी
माझ्या राणीला न्याहाळत नजर काढावी
ओल्या रेशमी केसांचा पसारा
माझ्या चेहऱ्याला हळुवार स्पर्श व्हावा
इशकाचा गारवा अंगी चढावा
हातात हात चेहऱ्यावर हसू असावा
क्षणाची धारा थांबून जावी
मनमोकळ निवांत बसून
आठवणींचा खजिना रिकामा करावा
गमती जमती गप्पा मारत
आयुष्याच्या प्रवास असाच सरकत जावा
. – भाग्यराज
उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे
उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे
अजून ही उशीवरी टिपूर चांदणे पडे
उगीच वेळ सारखी विचारतोस काय तू
पुन्हा पुन्हा मिठीतही शहारतोस काय तू
पुन्हा अशी हवी तशी कुणास रात्र सापडे
अजून कुंतलात या तुझा न जीव गुंतला
अजून पाकळ्यांतला मरंदही न संपला
अजूनही कसे तुझे लबाड ओठ कोरडे
अजून थांब लागली जगास झोप आंधळी
दिसेल या नभातही हळूच रात्र सावळी
तुला मला विचारुनी फुटेल आज तांबडे
. सुरेश भट
short love poems in marathi
जीव..
मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल,
अन् माझी हाक तुझ्या अंतरात हुर-हुरेल.
मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नात चुर,
तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल.
विसरशील सर्व सर्व आपले रोमांच पर्व,
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल.
सहज कधी तू घरात लावशील सांज वात,
माझे ही मन तिथेच ज्योती सह थर-थरेल.
जेव्हां तू नाहशिल दर्पणात पाहशील, माझे अस्तित्व तुझ्या आस-पास दरवळेल.
जेव्हां रात्री कुशीत घेशील माझे गीत,
माझे तारुण्य तुझ्या गात्रातून गुण-गुणेल.
मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद,
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टप-टपेल.
. – सुरेश भट.
marathi prem kavita marathi prem kavita charolya romantic marathi prem kavita prem kavita marathi text marathi prem kavita for girlfriend short love poems in marathi heart touching marathi kavita on life
आमच्या इतर काही कविता :
Kusumagraj Kavita। कुसुमाग्रज कविता । Marathi Kavita Kusumagraj
बाप कविता ।Bap Kavita in Marathi। बाबा कविता
Marathi Poem। मराठी कविता
मित्रांनो या कवितांमध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.
धन्यवाद
Nice. Best collection of Love Poem in Marathi
Very Nice. thanks for sharing
nice poem ..i like it