सत्यमेव जयते निबंध

सत्यमेव जयते निबंध

 

सत्यमेव जयते निबंध
  सत्यमेव जयते निबंध

 

‘सत्यमेव जयते।’ है स्वतंत्र भारताचे ब्रीदवाक्य आहे. भारत सान्या जगाला सांगतो की, शेवटी सत्याचाच जय होतो. लहानपणापासून हे आपल्या मनावर विसवले जाते की, ‘ खोटे कधी बोलू नये’. खोटे म्हणजे असत्याविषयीचा तिरस्कार त्यासाठी पुराणकाळापासूनच्या अनेक कथा आपल्या मनावर बिंबवल्या जातात. एक मात्र सत्य आहे की असत्याचा आधार हा काही काळापुरता आधार वाटला तरी तो फसवा असतो. त्याचा पाया भक्कम नसतो .

सत्यवचनी व्यक्तीला अनेकदा त्रास होतो. त्याचे यश त्याच्यापासून दूर जाते आहे असे वाटते; पण अंतिम विजय त्याचाच होतो. सत्यासाठी रामाने वैभवाचा त्याग केला आणि वनाचा रस्ता धरला. रामाचा मार्ग सत्याचा होता आणि रावणाचा मार्ग असल्याचा होता. शेवटी समाचाच जय झाला .

राजा हरिश्चंद्र हा सत्याचा पूजक होता. त्याने स्वप्नात दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी स्वत:चाही लिलाव करून घेतला. राजा युधिष्ठिराने आयुष्यभर सत्याचाच अवलंब केला. युद्धाच्या वेळी रणनीती जपण्यासाठी सत्यपरायण युधिष्ठीर अर्धसत्य बोलला ‘नरो वा कुञ्जरो वा’ आणि त्याची शिक्षा त्याला परलोकात जाताना सहन करावी लागली.

सत्याचा त्याग करून असत्य स्वीकारले तर एका असत्यासाठी पुनःपुन्हा असत्यच बोलावे लागते. एका खोट्यासाठी सात वेळा खोटे बोलावे लागते. विद्यार्थी आपली एखादी चूक कबूल न करता एखादी थाप मारतो. क्षणभर त्याचा बचाव होतो. पण ती थाप, ते असत्य पचवण्यासाठी त्याला पुनःपुन्हा थापा माराव्या लागतात.

माणूस असत्य का बोलतो. कारण सत्य बोलण्याचे त्याला धाडस नसते. सत्य बोलण्याने कदाचित आपल्याला त्रास सहन करावा लागेल, पण तो त्रास सहन करण्याचे धैर्य बाळगले पाहिजे. कारण ‘साहसे श्रीः प्रतिवसति । “

महात्मा गांधीजीनी आयुष्यभर सत्याचाच आग्रह धरला. आपली झालेली प्रत्येक चूक त्यांनी कबूल केली. गांधीजीनी आपल्या आत्मवृत्ताला ‘सत्याचे प्रयोग’ हे नाव दिले आहे. जोतीराव फुले यांनी पण सत्याचीच कास धरण्याचा संदेश दिला. समाजातील असत्य, पाप, अन्याय यांना समाजाबाहेर काढण्यासाठी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ असे संत तुकाराम संगितात. कारण या महात्म्यांच्या मते ‘सत्य हाच परमेश्वर’ आहे. आजच्या जागतिक राजकारणातही शेवटी सत्याचाच विजय होईल, याबाबत शंका नाही.

 

टीप :

1 ) सत्यमेव जयते निबंध हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0 वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 

 

अधिक माहितीसाठी ..


 

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद

Leave a Comment